मानसिक आरोग्य दिन
सौ.सविता दरेकर
नाशिक
“मनाच्या लहरीवर, स्वप्नांच्या झुल्यावर,कल्पनेच्या जगात जेव्हा मानवी मन भिरभिरतं तिथेच सर्वात सुंदर आपलंस आनंदी जग वाटतं”…
पण हे काल्पनिक जग काही क्षणच आनंद देवून जातं..तो आनंद हसतखेळत वास्तवातही टिकवता यायला हवा ..तेव्हा कुठे मानवी आरोग्य सुखकर होईन..हेच आजच्या मानसिक आरोग्य दिनाला सांगावसं वाटतय….आनंद शोधा,आनंद वाटा…!
आजकाल छोट्या छोट्या कारणावरून खूप लवकर उदासी येतेय प्रत्येकाच्या आयुष्यात … सगळंच लवकर आणि मनासारखं हवय प्रत्येकाला…त्यासाठी होणारी धावाधाव, संघर्ष कुठेतरी मानसिक आरोग्य ढासळायला कारणीभूत होत आहे हे लक्षातही येत नाही ….
नात्यामधे माणूस माणसावर सुखासाठी अवलंबून राहू लागलाय…काही ना काही सुख मिळवण्यासाठी, पैशासाठी धडपड करु लागलाय…कौटुंबिक आरोग्य चिडचिडीत रुपांतर होतय…एकाकीपण वाढून त्यातून आपुलकीचा ,प्रेमाचा ,विश्वासाचा आधार शोधला जातोय…
सुशिक्षित बेकारी,गुन्हेगारीची वाढ होतेय..सामाजिक स्वास्थ्य बिघडतय .वैचारीकता, संयमाच्या अभावाने मानसिक विकृती जन्माला येतेय. भय वाढतय ,मनोरुग्ण संख्या वाढतेय…या सर्व कारणामुळे मानसिक आरोग्य धोक्याचा इशारा देत चाललय…
यातून प्रत्येकाने स्वतःचे मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवलं पाहीजे..त्यासाठी योगा, प्राणायम, ध्यानधारणा,व्यायाम,फिरणे,चांगले विचार वाढवायला हवे…आति विचार,आपल्या मानसाचा विरह,तिरस्कार,राग द्वेश न करता संयमाने, संवादाने समस्यांचे निराकरण करत कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवायला हवे…
आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंद देता घेता जगता आले पाहीजे….कधीकधी नशिबाने खूप चांगल्या व्यक्ती आपल्या आयुष्याचा भाग होवून जातात..अशी नाती कायम जपायला हवी…विचारांची देवाणघेवाण करत सकारात्मक उर्जा वाढवत रहायला हवे.कधीकधी आपल्या चुकीच्या वागण्याने,चिडचिडेपणामुळे,मी पणाच्या अहंकारामुळे जवळची माणसं दुरावतात…जी परत हवी असतानाही कायमची हरवून जातात…ते दुःख पचवता यायला हवे…व सुखाचा शोध घेत नात्यांचा धागा सावरायला हवा.
“कुणाच्या आयुष्यात सुख देता नाही आले तर कुणाला आपल्या वागण्याने दुःख ही देवू नये..याची प्रत्येकानेच काळजी घ्यायला हवी”…परोपकार ,मदतीला धावणे,सुख दुःख समजुन घेत अनेक कार्यात ईतरांना सामावून घेणे जमले कि, कधी आपण ईतरांच्या हृदयात घर करतो कळतही नाही …आणि हीच आयुष्यातील कमाई आहे …
माणूसकी हाच खरा दागिणा आहे …पण तो सांभाळताना संघर्षही कठीण असतो आणि समाधानही तेवढेच उंचीचे असते…यामुळे चांगल्या विचारातून मानसिक आरोग्यही संतुलित रहाते…
शेवटी काय तर …माणूस माणसाशिवाय अपुर्ण आहे ..त्यासाठी कुंटुंबसंस्था निर्माण झालीय..ज्यांत दोनाचे चार सहा होत एकमेकांना आयुष्यभर आधार देत संसाररथाची चाके होत ..मानसिक आरोग्य जपत जपत आयुष्याचा आनंद मिळवत जाणेच मानवाचं या कर्मभुमिवरचं खरं कर्म होय…!


