या कारणांमुळे व्यक्तीला मानसिक तणाव निर्माण होतोय.
अनुजा शिंगाडे
आयुष्यात एखाद्या व्यक्ति ला मानसिक तणाव जर कोणत्या गोष्टी मुळे येत असेल तर त्यात..लोक काय म्हणतील…? या वाक्यामूळे.
जर लहान पणापासुन विचार करायला सुरुवात केली तर जेव्हा एखाद लहान मुल त्याच्या मनाने एखादी गोष्ट करायला जाते तेव्हा बाकिच्या पालकांची मुले ती गोष्ट करत नसतात म्हणून…चार लोक काय म्हणतील या वाक्यावर त्याला थांबवले जाते जर ती गोष्ट योग्य असेन तर ठिक आहे पण प्रत्येक वेळी दुसरया व्यक्ती बरोबर स्पर्धा करयला शिकवले जाते..
त्यामुळे ते मुल मोठे होईपर्यंत त्याच्या विचारावर तो स्वतः च बंधने घालायला लागतो…लोक काय म्हणतील…? या विचाराने तो जसे बाकी चे व्यक्ती आहेत त्याना आवडेन तस वागण्याचा प्रयत्न करतो..कधी काही वेगळ करण्याच त्याच धाडस होत नाही…
जर ती व्यक्ती चार लोक काय म्हणतील..? या विचाराने जगायला लागली तर स्वतः च अस्तित्त्व विसरुन जाते. जर मग कधी या लोकांची म्हणजे विचाराची चौकट ओलांडली तर मग तो व्यक्ती वेगळा वाटतो अन जर व्यक्ती वेगळया वागण्याने जर समाजात चांगला आदर्श तयार करत असली तरी तिला या विचारातून जावे लागते….
ती चार लोक नक्की कोन असतात मला पण अजुन समजली नाहीत पण ती तुमच्या आमच्या पेकि च असणार …
लोक जर काय म्हणत असतील तर त्याच्या मागच मुळ कारण त्याना आलेला अनुभव व त्याचा नकारात्मक दृष्टीकोन असतो
उदाहरण
१) एखाद व्यक्ति ने काही नव्या शेली चे कपडे घातले तर तिला नाव ठेवणारी अश्या व्यक्ती असताना त्याना कधी या गोष्टी करयला मिळाल्या नसतात
२) समजा एखाद्या व्यक्ती इंग्रजी मधे बोलत असेन अन जर बाकी च्या व्यक्तीना इंग्रजी येत नसेन तर जी बोलते तिला नाव ठेवली जातात. पण कोण व्यक्ती च मन कौतुक कराव किवा तिच्याकडे ते knowledge आहे ते शिकाव अशी इच्छा होत नाही…आपल नाव ठेवण्यात च वेळ जातो..(चार लोक पेकि एक असलो तर )
३) समजा कोणी व्यक्ती ने प्रेम विवाह केला मग आंतर जातीय किवा जातीय विवाह असू मग त्या लोक नाव ठेवतात पण कधी परिस्थिती चा विचार करुन वागत नाही स्वतःच्या अनुभवाने पडताळणी केली जाते…
या अश्या खुप गोष्टी आहेत त्यात या लोक काय म्हणतील?या विचाराने तणाव निर्माण करत असतो.
त्यावर उपाय मला तरी एक वाटतो कोणती ही गोष्ट करताना ती आपल्या साठी योग्य आहे का..? आपल्या समाजासाठी व आपल्या चरित्र ला साजेल अश्या आहेत का याचा च फक्त विचार करावा त्या चार लोकाचा नाही…
लोगो का काम हे केहना …
और हमारा काम हे भुल जाना
और आगे भड़ना……


