Skip to content

इथे प्रत्येकजण एका मानसिक ताणतणावात जगत आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष


डॉ. माधुरी मिसाळ
drmadhurimisal@gmail.com


दरवर्षी 10 ऑक्टोबरला जगभरात वर्ल्ड मेन्टल हेल्थ डे म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती हा त्यामागचा उद्देश.

गेल्या काही वर्षांमध्ये मानसिक आजारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे . सध्याच्या परिस्थितीमध्ये तर प्रत्येक जण एका मानसिक ताण तणावात जगत आहे.तरुण पिढी मध्येही आता मानसिक आजारांची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. स्पर्धात्मक युगात तरुण अनेक मानसिक आजारांना सामोरे जात आहे. डिप्रेशन, अॅंगझायटी सारखे प्रॉब्लेम येत आहेत. दुर्लक्षित मानसिक समस्यांमुळे कधीकधी आत्महत्येसारखे पावले उचलली जातात.

आपण नेहमी निरोगी शरीराबद्दल बोलत असतो पण निरोगी मन, मेंदू याबद्दल बोलत नाही. जसं शरीरात कुठल्याही आजाराची लक्षणे आढळून आली की आपण डॉक्टरांना कन्सट करतो. तसे आपण मानसिक समस्या बाबत करत नाही. मानसिक आजारांना आपण नेहमी दुर्लक्षित करत राहतो. त्यामुळे लवकर बरा होऊ शकणारा मानसिक आजारही वाढत जातो. आपल्याकडे मानसिक तान तनाव मानसिक समस्या यावर योग्य उपचार करण्यासाठी मानसोपचार तज्ञ आहेत. आपण योग्य वेळी त्यांच्याकडे जाऊन योग्य तो सल्ला घेतला पाहिजे.

सततच्या टेन्शनमुळे मानसिक ताणतणावामुळे चिडचिड रागावर नियंत्रण न ठेवता येणे यामुळे आपण हार्ट डिसीजेस ला आमंत्रण देतो. सततच्या मानसिक तणावामुळे शरीरात काही हार्मोन्सचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होत राहते. त्यामुळे तुमच्या व्हायटल ऑर्गन्स वर ह्या गोष्टींचा परिणाम होतो आणि बाकी आजारांना निमंत्रण मिळते.

जर मन, मेंदू निरोगी असेल तर पूर्ण शरीर सुदृढ राहते. मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी आपण काही चांगल्या सवयी अंगिकारले पाहिजे. जसे की जेवन हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. पण तो फक्त पोट भरण्यापूताॆ न ठेवता समतोल आहार कसा होईल यावर लक्ष दिले पाहिजे.

समतोल आहार ज्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, जसे, ओमेगा थ्री, ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड, विटामिन्स, मिनरल्स या सर्वांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला आहार घ्यावा. नेहमी ताजे आणि आणि स्वच्छ जेवण घ्यावे.

शारीरिक आणि मानसिक स्थिती योग्य ठेवण्यासाठी फिजिकल ॲक्टिविटी यांचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात करावा. योगासने एक्झरसाइज चा समावेश करावा. रात्रीची झोप आपली मानसिक स्थिती योग्य ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कमीत कमी सात ते आठ तासांची झोप आपल्याला आवश्यक आहे.

व्यसनांना कमीत कमी बळी पडावे. कुठल्याही गोष्टीचा अतिविचार करणे टाळावे. चांगल्या सवयींचा हॉबींचा समावेश आपल्या जीवनात करावा. वाचना सारखी सवय ही नेहमी उपयोगाची असते. बुक्स आर लाईक व्हायटामिन्स फोर द ब्रेन.

काही स्टडीज नुसार रोजचे सहा मिनिटे एकाग्र होऊन केलेल्या वाचनामुळे तुमचा स्टॆॖस सिक्सटी एट पर्सेंट ने कमी होतो. काही स्टडीज नुसार वाचनामुळे मेमरी प्रॉब्लेम सारखे आजार कमी होतात अल्जाइमर सारख्या आजारांचे प्रमाण कमी होते.

प्रेरणादायी पुस्तके वाचल्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन मिळतो. वाचनामुळे आपल्या सोशल जीवनात फरक पडतो. आपण समाजात कॉन्फिडन्स ने वावरतो.

सकारात्मक जीवन हे निरोगी शरीर घडवते.

ह्या मानसिक आरोग्य दिनाच्या दिवशी आपण सगळ्यांनी एक शपथ घ्यावी शारीरिक आरोग्या सोबतच मानसिक आरोग्याची पण काळजी घेऊ.

निरोगी मन निरोगी शरीर.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!”

1 thought on “इथे प्रत्येकजण एका मानसिक ताणतणावात जगत आहे.”

  1. Ganesh naikwade

    खरंच खूपच सुंदर आणी सगळ्यांसाठीच महत्वाचा ठरणारा हा लेख आहे, यातून मानसिक आरोग्य किती महत्वाचे आहे हे कळले, आपले मनापासून आभार व सुंदर लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन……

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!