Skip to content

मुलामुलींचं लग्न वेळेत होत नाहीत आणि झालंच तर टिकत नाहीत….असं का ?

मुलामुलींचं लग्न वेळेत होत नाहीत आणि झालीच तरी टिकत नाहीत.


सुलभा घोरपडे


हल्ली मोठा आणि गहन प्रश्न , तो म्हणजे, मुलामुलींची लग्न वेळेत होत नाहीत आणि झालीच तरी टिकत नाहीत .काही मुलामुलींची वये ३० तर काहींचे ३५ वर्षे तर काही त्यापुढेही गेली आहेत असे चीत्र पहायला मिळते आहे.मुलांचे करियर, मुलीही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. उच्चशिक्षीत आहेत त्यामुळे होणाऱ्या जोडीदाराबद्दल त्यांच्याही अपेक्षा वाढल्यात.
मुलगा शिकलेला , दिसायला देखना,सुंदर , एकुलता एक असावा, कमवणारा, जास्त पगारवाला, स्वतःचा फ्लॅट , शहरात राहणारा अशा एक ना अनेक अपेक्षा असल्यामुळे लग्न जमण्यास विलंब होत आहे.मुलांना नोकऱ्याचे प्रमाण कमी असल्यामुळे तसेच व्यवसाय करण्यासाठी अपुरे ज्ञान ,किंवा आर्थिक बाजू कमकुवत असणे , शेती करणाऱ्याला तर मुली नकोच म्हणतात .त्यामुळे लग्न जमणे अवघड झाले आहे.त्यापेक्षाही मोठा गहन प्रश्न झालेली लग्ने टिकणे अवघड होत आहे.
लव्हमॕरेज असो किंवा अरेंज मॕरेज असो, किंवा स्वतः अगदी मनापासून पसंत केलेला मुलगा किंवा मुलगी असो . काही दिवसातच दोघांचे पटत नाही .अगदी किरकोळ भांडण झाले तरी घटस्फोटा पर्यत मजल जातेय.
याची कारणे म्हणजेएकमेकांनबद्दल गैरसमज, संशय, तसेच व्यसन , शारीरिक , मानसिक आजार, लैंगिक समस्या आणि मोबाईलच्या सतत च्या वापरामुळे संवाद कमी आणि वादच वाढत चाललेत.कुणी कुणाच ऐकाव, त्याने बदलले पाहिजे ,मी नाही बदलणार असे ठाम विचार .मुलीच्या संसारात तिच्या आईवडीलांची नको इतकी ढवळाढवळ तर मुलाच्या संसारात त्याचे आईवडील नको इतके लक्ष घालतात.सर्वात महत्त्वाचे म्हणजे
दोघांचे वेगवेगळे स्वभाव.आता स्वभावाबद्दल सांगायचे झाले तर , दोघांवर निरनिराळ्या वातावरणात संस्कार झालेले असतात.ते दोघे एकमेकांसारखे असतीलच कसे? एकसारख्या स्वभावाच्या, गुणांच्या दोन व्यक्ती एकत्र येतीलच कशा?आपल्याला हवा तसा जीवनसाथी कसा मिळेल.सरळ सोप आयुष्य देवालाही मिळालं नाही . मग आपल्याला कस सर्व मनासारख मिळेल .आपल्याला हवी तशी परफेक्ट व्यक्ती मिळणे म्हणजे स्वप्नातल्या परीकथेसारखच नाही का!या पिढीच्या आधीच्या लोकांनी संसार केलेत की! त्यांच्यामध्ये तरी कुठे सर्व बाबतीत परफेक्ट होते! तुमच्या आईवडीलांनी संसार केलेत हे आत्ताची पिढी बघत आली आहे. मग या मुलामुलींनी त्यांच्याकडून शिकून घेतले पाहिजे आणि त्यानीही शिकवले पाहिजे .संसारात थोड्याफार फरकाने तडजोड करावीच लागते. कोणत्याही जोडप्यात किरकोळ मतभेद, दोषारोप, होतच राहतात.
वाद होत असतात.पण ते तुटेपर्यंत ताणायचे नाहीत .थोडा तू बदल , थोडी मी बदलते असे दोघांच्या सामोपचाराने बदल घडवून , वाद न करता संवादाने, एकमेकांना समजून घेऊन . जे मिळालं त्यात आनंद मानून एकमेकांचा स्वीकार करून एकमेकांच्या स्वभावाला थोडीशी तडजोड करून , न जुळणार्या गुणांना एका वेगळ्या प्रेमाच्या रंगाच्या धाग्यात बांधून आयुष्य जोडत गेलो तर नक्कीच तेच प्रेमाचे धागे मजबूत होऊन . पतीपत्नीचे नाते घट्ट होईल.एकूणच आपल्याला सर्वच परफेक्ट मिळणार नाही ,जे मिळाले त्याचा आनंदाने स्वीकार करणे.अशा प्रकारचे समुपदेशन करणे ही आजच्या काळाची गरज आहे.



online counseling घेऊन मिळालेली प्रतिक्रिया नक्की वाचा आणि अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

4 thoughts on “मुलामुलींचं लग्न वेळेत होत नाहीत आणि झालंच तर टिकत नाहीत….असं का ?”

  1. छान वाटला, यांमध्ये जी तडजोड संगितली ती बहुधा मुलीनांच करावी लागते. त्यामुळे पुर्वी स्ञीया परावलंबी होत्या म्हणून तडजोड करत, आज माञ नोकरी करणाऱ्या मुलीकडून सुपरवुमन अपेक्षा मुळे संसार तुटतात हे दिसून येते.

  2. Pankaj rajendra chulbhare

    माझ 20 फेब्रुवारी 2018 लग्न झाल 10 जुन 2018 घटस्फ़ोट झाला. माझ्या पण चुका झाल्या पण माझा घात केला.माझ पुर्ण आयुष्यच वाटुळ झाला ??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!