Skip to content

सहवासाने प्रेम वाढते असं म्हणतात, हे खरंय का ??

सहवासाने प्रेम वाढते असं म्हणतात, हे खरंय का ??


सौ. सुजाता गंगातीरकर


सहवासाने प्रेम वाढते असे म्हणतात.
हे वाक्य परिस्थितीसदृश्य आहे असे मला वाटते.

कदाचित सहवासाची अजून काही जास्त छान उदाहरणे आणि व्याख्या जास्त समर्पक वाटतील.

जसे… शिक्षक विद्यार्थी, भक्त आणि त्यांचा परमेश्वर (मनातील भाव), सख्खे शेजारी, एकाच ठिकाणी काम करणारे सहकारी यांचा सहवास जास्त perfect वाटतो…

सहवास म्हणजे विश्वास, सहवास म्हणजे श्रद्धा. सहवास म्हणजे एकमेकांना दिलेली proper space. सहवास म्हणजे शुद्ध सात्विक प्रेम .
यात वय, लिंग, जात, नातं काहीच आड येत नाही. तु लढ , काही झालं तर मी आहे ना हे वाक्य सहवास दर्शवतो, हे वाक्य सहवास जाणवून देतो.

बऱ्याचदा आपले आपण रहात असून ही आपला आणि आपल्याच मनाचा सहवास नसतो.

आपल्या मनाला काय हवे, काय नको हेच माहीत नसते.

खूप सहज आपण ज्याच्याशी सुसंवाद साधु शकतो, ज्याला वेळेचं बंधन नाही, अंतराची सीमा नाही , शब्द कोणते आणि किती आणि कसे वापरायचे याचे भय नाही तो सवंगडी मनाने जवळ असला म्हणजे आपण छान सहवासात आहोत हे समजावे. अगदी स्वतः चे मनही चालेल.

असा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो ना प्रत्येकाला… अगदी छोटेसे रोपटे असू देत किंवा प्राण्यांचे पिल्लु नाहीतर माणसाचे बाळ किंवा वटवृक्ष अथवा वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असणारा मनुष्य प्राणी ( श्रीमंत अथवा सामान्य अथवा भिकारी)

फक्त कौतुकाची थाप, मी आहे कायम हे सांगणारा एक हात. याला सहवास म्हणता येईल.

मनामनातील सुसंवाद म्हणजे सहवास…
त्या नात्याला नाव नाही दिले तरी चालेल पण एक विश्वास मात्र हवा, त्यात समर्पण हवे, प्रेमभाव हवाच.

म्हणूनच एका प्रार्थनेत म्हटले आहे,

साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे…
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे..

नदीचे दोन किनारे अशाच सहवासाची अलिखित शपथ घेत असतील असे मला वाटते.?

अश्या आपल्या मनाचा सहवास हवा असेल तर फक्त शांत बसा. Meditation प्राणायाम काहीच नको शांत बसा आणि सहवास मिळवा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!