समोरचा सुखी तर मी का नाही हीच भावना आपल्याला नैराश्येत ढकलते…
शरीराला जपता जपता कधी मानसिक आरोग्याचा पण विषय चर्चेचा भाग होऊ लागला हे कळलचं नाही लहान असताना आजोबा नेहमी म्हणायचे खाऊन पिऊन नेहमी मजेत राहायचं आणि तसच काम पण करायचं आजी आजोबा शेतकरी असल्याने त्यांना नेहमी शेतीच्या कामात मदत असायची आमची भावंडांची.
त्यामुळे मानसिक ताण तणाव कधी आमच्या गावी सुद्धा नव्हता पण जसं जस मोठं होत गेली तसं तसे ह्या दुनियेत स्वतःच अस्तित्व निर्माण करायच्या स्पर्धेत मानसिक तणाव काय असतो हे पहिल्यांदा कळलं.
खरंतर जागतिक मानसिक आरोग्य दिन हा 1992 पासून त्याची सुरवात झाली म्हणजे जेव्हा जग जागतिकीकरणा कडे जात होतं आज 2020 ला त्याला 29 वर्ष पूर्ण होतील जितकी तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तितकीच माणसामध्ये नैराश्याच प्रमाण वाढत गेले.
आजच्या घडीला ह्या दिवसाच महत्व का वाढले आहे हे आपल्या ला माहीत आहेच. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या, हे सांगावं लागत आहे. खरंतर ह्याची आपल्याला खरच गरज आहे का?
आपलं मानसिक संतुलन बिघडण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यावर उपाय पण आहेत. म्हणतात ना आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या आजूबाजूलाच फिरत असतात आपल्याला फक्त त्याला शोधायचं असतं तसंच मानसिक तणावातून जाताना आपल्याला नक्की आपलं काय हरवलंय आणि आपल्याला काय शोधयच आहे हे फक्त माहीत असले पाहिजे.
बरं हे मानसिक आरोग्य वैगरे आधी हे आपल्या मागच्या पिढीला माहीत ही नव्हतं कारणं त्यांची स्पर्धा ही फक्त स्वतःशी होती जगाशी नव्हती. कोरोना आल्यापासून जगातील 264 मिलियन लोग नैराश्येत आहेत. समोरचा किती सुखी आहे मीच नाही. जे त्याच्याकडे आहे ते माझ्याकडे का नाही .
आपल्याला येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जायचं असेल तर सर्वप्रथम मी ह्या जगातला सर्वात सुखी माणूस आहे हे मनाला नेहमी सांगत राहायचं. निसर्गाने कोणाचीच झोळी ही रिकामी ठेवलेली नाही. त्यात काही ना काही आहे ते आपल्याला शोधता आलं पाहिजे.
एका प्रसिद्ध चित्रपटातला माझा एक आवडता डॉयलॉग आहे
“life main kitna bhi try karlo bunny kuch na kuch to chut hi jata hain”
त्याच प्रमाणे आपण कितीही प्रयन्त केले तरी हातात काही सगळेच मावणार नाही …..


