Skip to content

“आई…. आज वरणभात खुपच मस्त आणि सॉलिड झालाय…”

राहुल जोशी


“आई…. आज वरणभात खुपच मस्त आणि सॉलिड झालाय…”


अगदी नकळतपणे मुलांनी आज ही प्रतिक्रिया दिलीच.
नेहमीच्या प्रमाणे मुल आज TV बघत नव्हती..
हातात मोबाईलवर गेमही खेळत नव्हते..
कानात हेडफोन घालुन गाणेही ऐकत नव्हते…
शिवाय खेळण्याचा पसाराही छानपणे आवरला होता.
आज आम्ही दोघांनी ठरवुनच हे सगळ बंद ठेवायचच अस ठरवले होते.
जेवायला घेतल्यानंतर हळुवारपणे त्यांना ज्या गोष्टींची आवड होती, तेच विषय आम्ही गप्पागोष्टीत अलगद घुसवले…
साधारणपणे प्रत्येक घासानतंर त्यांना वरणभाताच्या चवीची जाणिव स्पष्टपणे होऊ लागली…

पण हेच भातवरण आपण नेहमीच खातोत का?
असा प्रश्नार्थक भाव मुलांच्या चेहऱ्यावर दिसुही लागला…
आमचे नियोजन यशस्वी होत होते…
आईन विचारले…

“काय झाल… काही कमी पडलय का?”

मुलांनी माना जोरात हलवत नाही म्हणाले…
पण चव छानच लागत होती…

फक्त नेमके शब्द भावना व्यवस्थितपणे व्यक्त करायला सापडत नव्हते….
तरीसुद्धा आम्ही वाट पाहत होतोत…
पहीला भात झाला…
नतंर पोळीभाजी झाली…
पण परत मुलांनी भात नेहमीच्या पेक्षा जास्तच मागितला.

आणि परत मनपुर्वक वरणभात तुप.. वरुन लिबांची फोड पिळुन खायला लागले.
अचानकपणे दोघेही म्हणाले…

“आई..,, आज वरणभात खुपच मस्त आणि सॉलिड झालाय….”…

आणि आम्हालाही हसु आले…
खरच …

नेहमी आपण एखाद्या वस्तुंच्या ईतक्या आहारी जातोत… की आपल्याला ही कधी त्या वस्तुंचे गुलाम झालोत हेच कळत नाही…

असो…

पण…

कधी आईने रोजचा केलेला नवनवीन स्वयंपाक आपणही जर असाच चवीने खाऊन आईस प्रतिक्रिया दिली तर आईचा ऊत्साह ही नक्कीच वाढेल….
बरोबर ना….?


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!