मी डीप्रेशन मध्ये आहे………?
संकेत कांबळे
सगळ्यात आधी डीप्रेशन म्हणजे काय? हा प्रश्न स्वत:ला विचारा.
माझ्या आयुष्यात घडलेली घटना खुप लोकांच्या बाबतीत घडलेली आहे मग मी कशाला एवढं घाबरत आहे! त्या लोकांनी यातून मार्ग काढून आधीपेक्षा जास्त आनंदी जीवन जगत आहेत मग मी का नाही.
मला ही स्वत:ला खुष ठेवलं पाहिजे आणि हे सगळं माझच काम आहे इतरांना कशाला सांगतोय मी की मला यातून बाहेर काढा plzzz plzzzz
मला आनंदी ठेवणे हे माझच काम आहे.
मला कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे?
यात चुकी कुणाची आहे?
माझी चुकी नसेल तर विनाकारण मी स्वत:ला का त्रास करुन घेत आहे?
हे प्रश्न स्वत:ला विचारले आहेत का???
सतत ते ओरडून सांगण्यापेक्षा शांत राहून स्वतःसोबत चर्चा करा.
मला काय हवंय? काय नको? याचा विचार करा.
खुप जण बोलतात मी खुप प्रयत्न करतोय पण डोक्यातून जात च नाही आहे! कसं जाईल डोक्यातून तोच तोच विचार करत असल्यावर ते रिविजन केल्यासारखं पाठ करत आहात तुम्ही.एक लक्षात ठेवा डोक्यात येतोय ना विचार,येऊदे स्वत:वर चिडू नका स्वत:शी बोला नक्की काय घडलं आहे स्वत:ला सांगा घडलेली घटना स्वत:ला शांतपणे समजावून सांगा ओरडू नका स्वत:वर!
यातून मला कसे बाहेर पडता येईल? हा प्रश्न स्वत:चा एक चांगला मित्र समजून स्वत:ला विचारा.तुम्हाला तो नक्की सांगेल.करुन तर बघा.
“मी खुप वेळा ठरवलं आहे पण होत च नाही आहे” हे असं स्वतःवर ओरडुन तुम्ही प्रॉब्लेम अजुन वाढवत आहात.
मला खुप काही करायचं आहे पुढे, माझे कुटुंब आहे,मोठी स्वप्न आहेत,आयुष्यात एवढं सगळं करायचं आहे मग मी याचा कशाला विचार करतोय? बास्स! खुप झालं रडणं खुप पश्चाताप केला पण आत्ता नाही आत्ता माझ मन माझ्यासोबत आहे. आत्तापासून नेहमी स्वत:ला आनंदी ठेवणार मी. मान्य आहे सुरवातीला कठीण आहे थोडं,
पण! प्रयत्न तर करा आणि विचार मनात आला तर निराश होऊ नका स्वत:शी बोला घडलेली घटना स्वत:ला समजावून सांगा,स्वत:सोबत वेळ घालवा आणि लक्षात ठेवा कोण तुमची मदत करणार नाही “तुम्हीच स्वत:” यातून मार्ग काढू शकता आणि तुम्ही ते नक्की कराल.सुरवात तर करा.??


