Skip to content

आपल्या गरजा सोडून कोणीही तुमच्यासाठी सतत धावून येणार नाही.

मन आणि आनंद


तेजस्विनी पांडव


आपल्याकडे जन्माला येताना प्रत्येक मन हे निर्मल आणि निरागस असतं आपण त्यात सर्व विषय घालून त्या मनाला कोणी मजबूत बनत कोणी हळवं होतं तर कुणी मजबूर आणि हो क्रूर सुद्धा….

जसे संस्कार होतील तसेच मन बदलत जातं मग आपण त्या मनाला फक्त आनंदी ठेवायला बघतो, त्याच समाधान होतय की नाही याच्याशी आपल्याला काहीच घेणं देण नसतं. कारणंच तस आहे, मी स्वतः किती तरी ठिकाणी ऐकलंय की आनंदी रहा पण फक्त 1% लोक आपल्यातील समाधान मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.

आपण जितकं स्वार्थी बनून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो ते प्रयत्न एवढे strong असतात की आपण सफल होतो 20% खुश……आणि हवं ते मिळवलं आपण या तंद्रीत असतो. पण कधीच स्वतःला आपण विचारत नाही की तुझं आता समाधान झालंय का?Self satisfaction हे फक्त तुमच्यावर अवलंबून असते आई -वडील, बहीण -भाऊ, नवरा -मुलं हे सगळी नाती आहेत जी तात्पुरता आनंद देऊ शकतील…. ही नाती तुमच्या हक्काची आहेत या एकाच गोष्टीचा आनंद तुम्हाला मिळेल.त्यांच्या स्वतःच्या गरजा सोडुन कधीच कोणीच तुमच्या मागे येणार नाही म्हणून नात्यांना वेळ देताना स्वतःला विसरून जाऊ नका तुमच्या आयुष्यात फक्त तुम्हीच महत्वाचे आहात हे कायम लक्षात ठेवा,स्वतःवर प्रेम करायला शिका,स्वतःला वेळ द्या, स्वतःच ऐकायला शिका, स्वतःला समजवायला शिका तुम्ही समाधानी असाल तर इतरांचे समाधान करायला सक्षम असाल हे माहिती करून घ्या. आपण तेंव्हाच एखाद्याला देऊ शकतो जेव्हा ते आपल्याकडे उपलब्ध असेल ??



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!