Skip to content

आपण तणावात आहोत कि नाही हे ओळखण्याचा एक सोपा मंत्र!

मनातलं बोलू काही…


ज्ञानेश्वर वाघचौरे


कोरोनाचा संक्रमण काळ त्यातून ढासळती आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्थेची अनिश्चितता, शिक्षण, रोजगार आणि एकूणच जगणं असह्य झाल असताना समाजमन अस्वस्थता आणि हतबलते कडे वाटचाल करत आहे. पूर्व तयारी असेल किंवा संकटाशी पूर्व चाहुल असेल तर लढण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होता येत. मात्र अचानक प्रतिकूल परिस्थिती उद्भवली व तिचा अवधी जास्तीचा असेल तर स्वतःला सावरण खूप कठीण जातं.

ताणतणावाची पातळी वाढत जाते, त्यातून उदासीनता, नैराश्य या भावना मनात घर करू लागतात. या भावना नियंत्रणाच्या बाहेर गेल्या की माणूस आपलं मानसिक संतुलन हरवून बसतो.

खरंतर आपल्या भोवती घडणार्‍या 90% घटनांवर आपलं कुठलेही नियंत्रण नसतं. तरीही ते आपल्या मनाप्रमाणे व्हावं अशी आपली अपेक्षा असते . जसं आजार होऊ नये, अपघात होऊ नये ,आर्थिक अडचण येऊ नये, सगळ कसं अगदी मनासारखा व्हावं अशी अपेक्षा असते.

म्हणजेच कुठल्याही प्रतिकूल गोष्टीशी लढण्याची आपली मानसिक तयारी नसते. मग प्रतिकूल काही घडलं की आपण तणावाखाली येतो. या तनावाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कोरोना संक्रमण काळात वाढलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना, लहान मुलांना मारहाण करण्याच्या घटना, पती-पत्नीतील वाद विवाद आणि घटस्फोटाच्या घटना, सहनशीलता कमी होण,पटकन राग येण अशा प्रकारच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

असं कोणालाही विचारलं की तुम्ही तणावात आहात का? तर त्याचे उत्तर नाही असच दिल जात. मात्र एक रितेपणा ची मानसिक सल सतत मनाला बोचत राहते. त्यातून भावनांचा अवेग (इम्पल्स) वाढतो. मग माणूस आपली मानसिक शांती हरवून बसतो.

आपण तणावात आहोत कि नाही हे ओळखण्याचा एक सोपा मंत्र मी आपल्याला सांगतो. तुम्ही जिथे कुठे राहता कुटुंबात, मित्रपरिवारात, व्यवसायाचा जागेवर किंवा नोकरीच्या जागेवर तुम्ही तिथे जाण्यापूर्वी तिथलं वातावरण जर आनंददायी आणि मोकळ असेल, हलकफुलक असेल आणि तुमच्या तिथे जाण्याने ते चिडीचूप होणार असतील, तुमच्या प्रवेशा बरोबर तिथला आनंद जाऊन जर वातावरणात तणाव प्रवेश करत असेल तर तुमचे व्यक्तिमत्व हे तणावदर्शक व्यक्तिमत्व आहे असे म्हणता येईल. आणि याची जर जाणीव तुम्हाला नसेल तर याचा उपस्थित सर्वांच्याच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

पहिला प्रयत्न म्हणून कुठलाही पूर्वग्रह न ठेवता मनमोकळेपणाने सर्वांशी संवाद साधायला हवा, मनमोकळेपणाने सर्वांशी बोलायला हवा. मुलांसोबत मुलांसारखं तरुणांसोबत तरुणांसारख स्वतः पुढाकार घेऊन बोललो मन मोकळ केलं तर आपली तणावाची पातळी खाली येऊ शकते. यासाठी संवाद हा सुसंवादाकडे जाणारा असावा.

संपूर्ण ऐकण्याची तयारी असावी. समोरच्या व्यक्तीच बोलण लक्षपूर्वक ऐकावं, विचारपूर्वक प्रतिक्रिया द्यावी म्हणजे वादविवादाचे प्रसंग खूप कमी होतात . या काळात आपण इतके जरी करू शकलो तरी आपला वर्तमान सुसाह्य होईल येईल.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजच्या नवनवीन लेखांसाठी आत्ताच मोबाईल ऍप डाउनलोड करा!

??

क्लिक करा


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!”

1 thought on “आपण तणावात आहोत कि नाही हे ओळखण्याचा एक सोपा मंत्र!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!