Skip to content

निसर्गाने आयुष्य दिलंय, पण वाटा आपल्यालाच शोधायच्या आहेत.

मी जगून दाखवेन…


सुलभा घोरपडे


जीवनात अनेक संकटे येतात , दुःख येतात , एकामागून एक अशी संकटे येतात .

कधी कधी एखादं अपयश , एखादं दुःख किंवा एखादं संकट माणसाला पार दुबळ करून टाकत….अगदी जीव नकोसा होतो , कितीही काळोख दाटला तरी कुठेतरी प्रकाशाचा किरण दिसतोच.

प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात किंवा येऊन गेलेले असतात.
अशा वेळी संकटाचा पाढा वाचून घायाळ होण्यापेक्षा शांतपणे विचार केला तर कळते अनेकांच्या आयुष्यात अशी स्थिती होऊन गेलेली असते . काहीजण अशा परिस्थितीला तोंड देऊन पुढे जातात , तर काहीजण अशा वेळी परिस्थितीपुढे हार मानून निराशेने घेरले जातात….

पण आपल्याला अशा वेळी परिस्थितीशी तोंड देऊन पुढे गेलेल्या माणसांचा विचार करणे महत्त्वाचे आहे .

आपल्याला माणसाच्या शक्तीचा अंदाज येत नसतो. आपण संकटात असलोकी फक्त नकारात्मक विचार करतो त्यामुळे दुसऱ्या बाजूला असणाऱ्या जीवनाचा अंदाज येत नसतो कारण त्याबाजूने आपण कधी विचारच करत नसतो.

खरतर अपयश आणि दुःख , संकट नको म्हटलं तरी येणारच … त्यासाठी सकारात्मक विचार , स्वतःवर विश्वास , प्रयत्न करत राहणे हे महत्त्वाचे …

पण मुळात माणसाने हरून चालणार नाही …माणूस हरला नाही म्हणून तर चंद्रावर …मंगळावर पोहोचला …अजूनही भरारी घेत आहे.
म्हणून आयुष्य खूप सुंदर असतं….काही वेळा आपल्या इच्छेविरूध्द त्यावर अपयशाची , दुःखाची आवरण चढतात …ती आपली आपणच बाजूला सारून जगण्याला खळाळून वाहू द्यावे.

निसर्गाने आपल्याला आयुष्य दिलंय , पण चालायला आपल्याला वाटा तयार केल्या पाहिजेत .

एकदाच हे आयुष्य मिळते म्हणून आयुष्याच्या वाटेवर जगून दाखवून, सुंदर छटा उमटवायच्या..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजच्या नवनवीन लेखांसाठी आत्ताच मोबाईल ऍप डाउनलोड करा!

??

क्लिक करा


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!”

2 thoughts on “निसर्गाने आयुष्य दिलंय, पण वाटा आपल्यालाच शोधायच्या आहेत.”

  1. मस्त कारण जन्माला येताना एकटेच आलो होतो आणि जातानाही एएकट्यालाच जायचे असते इथं koniकोणी कोणाचा नसतो स्वतःच आयुष्य स्वतःच्याच पद्धतीने जगलं पाहिजे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!