Skip to content

सर्वच काही आपल्या अपेक्षेनुसार घडत नाही !!

सर्वच काही आपल्या अपेक्षेनुसार घडत नाही.


सौ. सुलभा घोरपडे


आपल्या आजूबाजूला , आपल्या कुटुंबात , नातेवाईकात , असं बरेचदा ऐकण्यात येते की मला स्वतःला इतका त्रास , कष्ट आहे तरी मी इतरांकरता इतके केले पण माझ्यावेळी माझ्याकरता एवढेपण इतरांनी केले नाही .

खरंतर या तक्रारी आणि या सर्वाचा हिशेब करता करता अनेकांच पूर्ण आयुष्य जाते . काही मोजकेच या हेव्यादाव्यातून बाहेर पडून पुढे जातात.

खरंतर प्रेम आणि आपुलकी आपल्या व्यक्तीमत्वाचा एक घटक आहे. आपल्याला इतरांनी चांगले म्हणावे म्हणून जरी आपण दुसऱ्याशी चांगले वागत असलो तरी ती मुख्यत्वे आपल्या” स्वतःच्याही प्रेमाची भूक असते”. म्हणून तर आपण सर्वांशी चांगले राहण्याचा प्रयत्न करतो.

जरी समोरचा आपल्याशी चांगला वागला नाही म्हणून आपण त्याच्याशी तसेच वागलो तर आपल्यात आणि त्याच्यात मग काय फरक! मग आपणही त्याच्यासारखे बनणार….

जरी सुरूवातीला आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना नातेवाईकांना खूष करण्यासाठी , त्यांची मर्जी संभाळण्याकरीता चांगले वागत असलो तरी ‘ चांगुलपणा’ आपल्या व्यक्तीमत्वाचा भाग होऊन जातो आणि स्वतःच्या आधी इतरांचा विचार करण्याची सवय लागते.

याचे फायदे पण अनेक आहेत , आपल्याला प्रेम आपुलकी मिळते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतरांच्या गरजा आपल्यापेक्षा जास्ती आहेत हे समजते त्यामुळे आपल्या गरजांची मनाला लागणारी टोचनी कमी होते शिवाय स्वकेंद्रित वृत्ती होणार नाही .

आपण चांगले आहोत हे पटत आणि स्वतःबद्दलचा आदर वाढीस लागतो.

इतरांकडून अपेक्षा बाळगणे हा मनुष्य स्वभाव असतो हे खरं आहे आणि त्यात गैर काही नाही पण सर्वच आपल्या अपेक्षेप्रमाणे वागतीलच असे नाही आणि मग अपेक्षाभंगाचे दुःख वाटते. कितीही आपल्याला वाटले तरी सर्वच आपल्यासारखे वागतीलच असे नाही हा विचार केला तरी मग एवढं दुःख होणार नाही …

मग तेव्हा या सर्व तक्रारी सोडून आपल्या वाट्याला आलेली प्रेम ,आपुलकी पुरेशी आहे असे समजून समाधानी झालो तरच आपल्या जीवनाची पुढील वाटचाल विश्वासाने चालू होईल..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजच्या नवनवीन लेखांसाठी आत्ताच मोबाईल ऍप डाउनलोड करा!

??

क्लिक करा


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!”

1 thought on “सर्वच काही आपल्या अपेक्षेनुसार घडत नाही !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!