Skip to content

मुलींनो, होणाऱ्या नवऱ्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवताय का??

होणाऱ्या नवऱ्यांकडून अवास्तव अपेक्षा ठेवताय का?


Adv. Shahin Shinde
Pre / Post Marriage Counselor.

9689889089


काहीही लिहण्याचा आधी सर्व प्रथम एक गोष्ट स्पष्ट करते कि, मागच्या लेखात मी ठराविक पुरुषांच्या दृष्टिकोना बद्दल लिहिले होते. तसे आज मी ठराविक स्त्रियांच्या दृष्टिकोना बद्दल लिहिणार आहे. कृपया कोणीही ते वयक्तिक घेऊ नये हि विनंती…

आजचा लेख अश्या उपवर मुलींवर आहे, जे स्वतः फारशे लायक नसतांना होणाऱ्या नवऱ्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवतात.
असा असावा तो… देखणा, Tall, Dark and Handsome, चांगली permanent नोकरी, मोठाले पगार, स्वतःचे घर, एकटा राहणारा…

थोडक्यात काय तर सासू सासऱ्यांची कट कट नको…
कित्त्येक वेळेला हि अपेक्षा “तिच्या” आई वडिलांची असते कारण बऱ्याच वेळेला आपल्या कडे मुलींना जास्त काही विचारले जात नाही…(Arranged Marriage मध्ये )

अर्थात आता परिस्थिती बदलत आहे, आणि आता मुलींचे विचार नक्कीच विचारात घेतले जातात. पण त्या जे नेहेमी त्यांच्या आई वडिलांच्या तोंडून ऐकत असतात तेच त्यांच्या डोक्यात बसते. आणि, खूप कमी मुली स्वतःचा निर्णय स्वतः घेतात. होणाऱ्या नवऱ्याकडून अश्या अवास्तव अपेक्षा करतांना मुली हे विसरून जातात कि आपण त्या व्यक्तीचे खरंच लायक आहोत का…? आणि ज्या मुलीचे आई वडील किंवा स्वतः मुली असा विचार करतात, कि सासू सासऱ्यांची कट कट नको, ते सपशेल पणे हे विसरतात, कि आपण पण वयस्कर झालेलो आहोत आणि आपल्याला पण उद्या सून आल्यावर, तिने पण आपल्या मुला कडून हि अपेक्षा ठेवली तर, आपल्याला हे आवडणार आहे का…? नक्कीच नाही …

म्हणूनच आपल्याकडची एकत्र कुटुंबाची संकल्पना नष्ट व्हायला लागली आहे. तेंव्हा पालकांनी आपल्या मुलींना हि शिकवण आणि संस्कार देणे गरजेचे आहे कि घरात ज्येष्ठ लोकांचा सहभाग किती गरजेचं आहे. (अर्थात नंतर काही त्यांच्या कडून मुलीची छळवणूक झाली आणि म्हणून वेगळे व्हायची वेळ आली तर गोष्ट वेगळी )
आता एकत्र कुटुंबाचे किती फायदे आहेत ह्या विषयात मी इथे बोलणार नाही कारण तो एक वेगळा विषय आहे.

मुलगी देखणी असेल, तर नक्कीच तिला वाटते कि तिचा जोडीदार पण देखणा असावा आणि तिला शोभणारा असावा आणि असे वाटण्यात काही गैर नाही पण अशी अपेक्षा ठेवताना मुलींनो हे विसरू नका कि त्याचा स्वभाव जाणून घेणे पण फार गरजेचे आहे.

मुली आता मुलांच्या बरोबरीने कमवायला लागलेत. अगदी लाखात पगार घेतात. मग त्यांच्या, होणाऱ्या नवऱ्या कडून खूप अपेक्षा असतात. पण अपेक्षा पण कश्या…तर नवऱ्याने तिच्या कुठल्याच व्यवहारात लक्ष घालायचे नाही, तिला कुठलीच आर्थिक व्ययहारां बद्दल विचारणा करायची नाही…तिला कुठले ही घरगुती कामे सांगायची नाहीत….इत्यादी…!

मुलगी जे काही कमावते त्या बद्दल तिला तिचे आर्थिक निर्णय घायची मोकळीक नक्कीच असावी, पण त्याच बरोबर जर दोघांनी मिळून दोघांचा येणारा पैसा, ह्याचा दोघांनी एक मेकांना विश्वासात घेऊन योग्य नियोजन केले तर नक्कीच कुठले क्लेश होणार नाहीत.

त्याच बरोबर मुलांनी पण हे लक्षात घेतले पाहिजे, कि, जर का मुलगी तिच्या आई वडिलांना एकुलती एक असेल, आणि त्यांना तिच्या शिवाय दुसरे कोणी Financial Support करणारे नसतील, तर ते साहजिकच मुली कडून अपेक्षा ठेवणार आणि मुलगी कमावती असेल तर तिला तिच्या आई वडिलांना ठराविक रक्कम त्यांच्या महिन्याच्या खर्चा साठी, अर्थात त्यांच्या उदर निर्वाहा साठी मदत करता आली पाहिजे.

माझ्या कारकिर्दीत मी अशे किती केसेस बघितले, जिथे मुलींना सासू सासऱ्याबरोबर राहायचे तर नसतेच, पण कळस म्हणजे ते मुलाला, म्हणजेच त्यांच्या नवऱ्याला त्याच्या आई वडिलांना भेटायला पण जाऊ देत नाहीत. नवरा एखाद्या दिवशी त्याच्या घरी जाऊन आला तर त्याच्याशी भांड भांड भांडतात. अश्या वेळेला मुलांनी खंबीर भूमिका घेणे गरजेचे असते. आणि लग्न ठरवतांना काही गोष्टी एकमेकांशी स्पष्ट पणे बोलून घ्यावे. जेणेकरून पुढे जाऊन वैवाहिक आयुष्यात कट कटी नकोत. आणि अश्या गोष्टींकडे, तेवढ्यापुरते वेळ मारून नेण्यासाठी दुर्लक्ष केले, तर त्याचाच पुढे खूप मोठा स्वरूप होतो आणि मग तो Ego Issue होऊन विषय घटस्फोटा पर्यंत जातो.

आणि मुलींनो थांबा जरा, थोडं धीराने घ्या…लगेच लग्नाच्या आधीच मुलाचा स्वतःचा फ्लॅट असावा, त्याला खूप पगार असावा, त्याच्या कडे गाडी असावी…अश्या अवास्तव अपेक्षा ठेऊ नका. हां पण जोडीदार निवडतांना हे नक्कीच बघा, कि तो किती महत्वाकांक्षी आहे, किती होतकरू आहे, किती प्रामाणिक आहे, तुमच्याशी एकनिष्ठ राहील का….. हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आणि ह्या निकषावर नवरा मुलगा निवडा.

हे सगळे गुण त्यामध्ये असले तर तो नक्कीच लवकर सगळ्या सुख सुविधा तुमच्या पायाशी आणून टाकेल, ह्याची खात्री बाळगा …..! त्याच बरोबर हे हि विसरून चालणार नाही कि तुम्ही त्याचे भविष्य आहात, तर त्याचे आई वडील, ज्यांनी त्याला कष्टाने वाढवले आणि तुमच्या लायक बनवले, ते त्याचा भूतकाळ आहेत, आणि तो तुमच्या दोघां मधला दुआ आहे. त्याची दोन्ही कडून ओढा ताण होईल असे काहीही करू नका. आणि हा नियम दोघांवर लागू आहे …बायको आणि आई वडील… तेंव्हा आयुष्य सुखाने घालवायला साजेसा, आणि समजून घेणारा जोडीदार निवडा …ATM Machine न्हवे…!!

कहीं किसी रोज यूं भी होता, हमारी हालत तुम्हारी होती…
जो रात हमने गुजारी मर के, वो रात तुमने गुजारी होती…


 


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!”

2 thoughts on “मुलींनो, होणाऱ्या नवऱ्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवताय का??”

  1. Adv. Shahin Shinde

    माधवी जी…तुमची शंका वाचली. असे काही घडत असेल तर इथे मुलाची भूमिका फार महत्वाची ठरते. त्यांनी काही गोष्टींचे निर्णय ठामपणे घेतले पाहिजे आणि तसे आपल्या घरच्यांना समजाऊन सांगितले पाहिजे. नाही ऐकले तर इतर मार्ग पण आहेत. उदा. वेगळे राहणे.
    राहिला प्रश्न मुलीच्या सासरच्यांनी तिला त्रास देण्याचा तर इथे मुलीला एवढे सक्षम बनवा की तिला तिची बाजू योग्य रित्या मांडता आली पाहिजे आणि तिने तिच्या सासरच्या लोकांना समजाऊन सांगणे अपेक्षित आहे. त्यांच्या ही लक्षात येत नसेल आणि तिची काही छळवणूक होत असेल तर तिचे पालक म्हणून तिच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणे आणि मग कायदा आहेच की…

  2. मान्य आहे की घरात मोठे लोक असणे गरजेचे असते. परंतु जर तेच मोठे-वडीलधारी लोक जर पती-पत्नीला एकत्र येऊ देत नसतील तर…त्यांना मुलाच्या सुखापेक्षा त्यांच्या मुलीच्या सुखी संसाराचा विचार करत असतील तर….सुनेला आपल्या मुलीच्या आधी दिवस गेले…बाळ झाल तर आपल्या मुलीला तीचे सासरचे लोक दोष देतील म्हणून…..मुलाला व सूनेला एकत्र ..जवळ येऊ देत नसतील तर….आणि तसे करायला मुलाला त्याची ईच्छा नसूनही भाग पाडत असतील तर…मग काय करायचं???

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!