लिंगाचा आकारमान आणि त्याबद्दल गैरसमज
नागेश मादेशी
केस नंबर1
सर माझे लिंग माझ्या मित्रा पेक्षा खूप लहान आहे मला माझे लिंग वाढवायला काही उपाय सांगा
केस नंबर 2
सर माझे वय 25 वर्षे आहे माझे घरचे लोक लग्नासाठी मुलगी पाहत आहेत.परंतु मला माझे लिंगांचा आकार खूप कमी आहे असे वाटते. आपण लग्नासाठी लायक नाही, मला मूल बाळ काही होणार नाही, किंवा आपल्या भावी पत्नीला रती सुख देणार नाही असे वाटते कृपया मला योग्य ते सल्ला दया.
केस नंबर 3
सर माझे लिंग ब्लू फ्लिम मध्ये दाखवलेल्या नायकाच्या लिंगापेक्षा खूप लहान आहे मी तर मी तर लग्न करू शकत नाही ,मला आता संभोग जमू शकणार नाही . माझ्या जीवनात काहीच अर्थ राहिला नाही.
केस नंबर 4
सर माझे लिंग खूप लहान असल्यामुळे मी एका वैदू कडे गेलो होतो त्यांनी मला एक- दोन प्रकरच्या गोळ्या आणि बस्म दिला होता आणि त्यांनी माझे कडून 5000 रुपये पैसे घेतले मला यातून काहीच फायदा झालेला नाही उलट माझे पैसे बुडाले . तरी तुम्ही योग्य सल्ला द्यावे.
वरील समस्या असलेल्या लोकांना मला एकच सांगायचं आहे की, लिंग लहान असो की वा मोठा असो स्रीला लिंगाचे आकर्षण नसते.ती तर आपल्या पती सोबत भावनिक , मानसिक, आणि शारीरिक अश्या विविध पातळीवर सोबत असते . स्रीचा योनी मध्ये फक्त दोन ते तीन सेंटिमीटर भागातच तिला संवेदना असते. त्यामुळे तिचा तुलनेत लिंग ही नगण्य असते. पुरुषाला जसे लिंगाचे आकषण असते तसे स्त्रीला नसते. तिला परम्मोच्च आनंद (ऑरगासम) प्रणय आराधना (romance,body play,four play ) म्हणजे चुबंन घेणे, ओठ, डोळे, कान, स्तन, पोट इत्यादी भागात चुबंन केल्याने तसेच मांड्या मधीलभागात स्पर्श, शिस्निंकेला स्पर्श कीवा मर्दन केल्याने तिला सेक्सच्या परमोच्च बिंदू किंवा आर्गझम मिळू शकते .
महिला मध्ये estrogen आणि projestran हार्मोन्स असतात पण पुरूषात testosterone हार्मोन्स असतात त्यामुळे पुरुषाला स्री पेक्षा सेक्स भावना जास्त असतात(परंतु अनेक लोकांना असे वाटते की स्त्रीला जास्त सेक्स असते) .
म्हणून आपण आपला लिंग लहान आहे म्हणून जास्त विचार न करता आपल्या जोडीदाराला लैंगिक सुख कसे देता येईल याकडे लक्ष द्यावे. एखादया व्यक्तीचा कान मोठा आहे म्हणून त्याला जास्त ऐकयाला येईल आणि ज्याच्या कान लहान त्याला कमी एकायला येईल असे कधीच होत नाही. तसेच लींगाबददल पण आहे .
ब्लू फिल्म किंवा अश्लील व्हिडिओ मध्ये जे दाखवले जाते ते पूर्ण खोटे असते त्यात सत्यपणा नसते ते झूम करून दाखवली जाते आणि हो जर त्यांचे लिंग लांब आणि जाडा असेल तर तिथे सर्वात जास्त घटस्पोट का होतात ही पण गोष्ट विचार करण्यासारखी आहे. लिंग लहान असणे किंवा मोठा असने ही आपल्या हातात नसते म्हनून आपण स्वतः बद्दल न्यूनगंड न बाळगता, स्वतः बद्दल सकारात्मक विचार करून , स्वतःला स्वीकारून निरामय कामजीवनाचा आनंद घेतला पाहिजे म्हणून सदर जनजागृती पर लेख .
आपलाच समुपदेशक
ग्रामीण रुग्णालय चामोर्शि
जिल्हा. गडचिरोली
मोबाईल क्र_9403236439
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
धनंय़वाद
अस्तिर झालेली मन तरी जागेवर येतील
धन्यवाद सर. खुपच छान लेख आहे.
अर्थात वयक्तिक मलाही पडलेल्या प्रश्नच उत्तर या लेखामधून मिळालं आहे.
खरंच खूप छान आहे
खरोखर सुंदर लेख होता… या लेखामुळे आताच तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलांचे बरीच प्रश्नाची उत्तरे मिळतील
धन्यवाद सर मस्त लेख आहे.