समाजमन
मधुश्री देशपांडे गानू
कसं असतं ना! आपण आयुष्यात अचानक आलेल्या दुःखाला अडखळत धडपडत सामोरे जातो.. सावरत असतो.. कसे ते फक्त आपल्यालाच माहित असते. पण समाजात जसे अगदी काहीच मित्रमैत्रिणी नातेवाईक आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतात.. त्याच समाजात काही आपले जवळचे?? आणि एरवी ज्यांना आपल्या आयुष्याशी काहीही देणेघेणे नव्हते असे काही अचानक आपल्या प्रत्येक कृती वर लक्ष ठेवू लागतात. त्यावर मत व्यक्त करण्याचा जणू काही त्यांना अधिकारच मिळालेला असतो.
जर आपण दुःख व्यक्त केले तर, अरे झाले की आता खूप दिवस! किती वेळ तेच धरून बसणार..? पुढे पहायला हवे.. असे म्हणणारे हेच लोक असतात.. आणि आपण जर आनंद व्यक्त केला आनंदी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले तर, अरे हिला/ ह्याला काहीच कसे वाटत नाही ? एवढं सगळं करायची काय गरज होती?? साधं रहायच ना! असे म्हणणारे ही .हेच लोक असतात..
आम्हांला माहित आहे हो की आमचा कोणताच आनंद आता निर्भेळ नाहीये. पण म्हणून आमच्या प्रत्येक कृती वर बोलण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला????
आणि जर तुम्ही कोणाचीही मदत न घेता ( कोणतीही खास करून आर्थिक ) खंबीरपणे उभे राहू पाहात असाल तर तुम्ही खूपच खटकता अशांना.. एक वेळ तुमच्या दुःखात सहभागी होतील कारण तुम्ही दुबळे आहात याचं एक प्रकारे अशा माणसांना समाधान मिळत असावं. पण तुम्ही खंबीरपणे टाकलेल्या पावलांना, केलेल्या कृती ला, व्यक्त केलेल्या आनंदाला निखळ कौतुकाचे दोन शब्द ही मिळत नाहीत..
एकूण काय तर तुम्ही कसेही वागलात तरी अशी रोगी समाजमनं तुमचा न्यायनिवाडा करणारच..
यावर उपाय एकच आपणच आपल्याला पूर्ण ओळखत असतो. आपला प्रवास आपल्यालाच माहित असतो. आपल्या वाटेवरुन कोणीही चालणार नसतं. आपण समर्थपणे आपले निर्णय घ्यायचे.. त्याची जबाबदारी ही आपलीच. आणि अशांचा अजिबात विचार न करता पूर्ण सकारात्मक विचारांनी आपला प्रवास पुढे चालू ठेवायचा..
आत्मविश्वासाने……….
करायला सुरवात करा.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


कसे जगायचे ते आपण आपले ठरवले पाहिजे. लेख खुप सकारात्मक वाटला.