मै बदल रहा हुं, ज्यादा जीना सिख रहा हुं l
विश्वास तांबे
एकदा स्वतःला ओळखायला शिकलं की, जगणं सोपं होऊन जात. मला काहीच प्रोब्लेम नाही. अशा खोट्या समजुतीत जगण्यापेक्षा मी एक माणूस आहे, मला प्रोब्लेम असणारच, मी त्यावर खोटा अहंकार बाळगन्यापेक्षा त्याचा योग्य पद्धतीने स्वीकार केला तर माझे आणि माझ्यापासून इतरांचे आयुष्य सुंदर होऊ शकेल. हा आत्मविश्वास जागृत केला तर येत राहणारे प्रोब्लेम योग्य प्रकारे हाताळता येतील. अडकून राहण्यापेक्षा मानसिक स्वतंत्र अनुभवता येईल.
हो, माझे प्रोब्लेम संपणार नाहीत कधी. ते नवीन नवीन रुपात येताच राहतील. त्यांना मी कसा हाताळणार यावर त्यांचे आयुष्य अवलंबून आहे.
आता माझा आग्रहाच नाही की समोरच्याने बदलावे. तो जसा आहे तसा त्याच्या बाजूने बरोबर आहे. त्याला judge करण्यात मी का वेळ घालवू? त्याच्या बद्दल माझा दृष्टिकोन काय असावा? मी त्याच्याशी कसे वागावे? यातच मला काम करता येईल. तो राग आणून देतो, हे जरी सत्य असले तरी त्या रागाचा मी स्वीकार कृं त्याला प्रतिसाद देतो, ही चूक त्याची की माझी?
एखाद्याच्या खूप कौतुकाने , प्रेमळ बोलण्याने मी हुरळून जातो. तो माझ्यासाठी खूप चांगला होतो. आणि मग मी सगळ्या जगाकडून अशाच वर्तनाची अपेक्षा करतो. आता यात पण त्याने हुरळून दिले, म्हणून मी हुरळून जायचे का? Realistic असण्यापेक्षा मला कौतुकाचे डोहाळे का? अतिप्रमाणात गोड लागणारी साखर ही आरोग्याला धोकदायक च की……
अति कौतुक, सतत कौतुक ऐकायची लालसा असणारा मी….. माझ्या या लालसे पोटी मला आयुष्यात योग्य मार्गदर्शन करणारे, खर बोलणारे, माझे हितचिंतक जे योग्य तेच बोलतात (खरे किंवा खोटे जे असेल तेच), शब्द ज्यांचे बहुधा कठोर असतात, पण त्यात आपुलकी, माझे भले व्हावे ही इच्छा असते. अशांना मी डावलून स्वतःचे नुकसान तर करून घेत नाही ना?
सर्वांनी विचार करायला हवा. प्रत्येकाच्या ‘ मी ‘ ने हा जाणीवपूर्वक विचार करायला हवा. हे प्रोब्लेम ओळखता आले तर, जास्त (चांगले ) जगता येईल…..? कारण आपल बहुतांशी आयुष्य या भोवतीच फिरत असत ना?
स्व – स्वभावाचा आरसा शक्य आहे.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

