…..हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया
डॉ. सरिता सिन्नरकर
…..हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया
मजेत जगण्याचा मर्म एका वाक्यात इथे साहिर लुधियानवी यांनी सांगितला आहे.
आपण आपल्या आयुष्यात पुढे काय होणार या चिंतेनेच आपल वर्तमान जगू शकतं नाही. आपण नको असलेल्या परिस्थितीचा नुसता विचार करून स्वत त्रास करून घेतो. पण प्रत्यक्षात ती गोष्ट तेवढी त्रासदायक नसते. आपण ज्या वस्तुस्थितीला टाळत असतो पण त्याच वस्तुस्थितीला जेव्हा आपण समोर जातो तेव्हा आपल्या लक्षात येत की खरच ज्या परिस्थितीसाठी मी इतका काळजी करत होतो ती इतकी पण कठीण नाही आहे.
सुरवातीपासुन काही गोष्टींची आखणी आपण आपल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो पण बरेचदा आपण ठरवतो तसं होत नाही आणि मग आपली चिडचिड होते. म्हणून आखणी आणि विचार नक्की करा पण तो जर अमलात नाही आला तर प्लान B तयार ठेवा.
तसेच, कधी कधी तर आपण ज्या गोष्टींसाठी बराच वेळ आणि एनर्जी घालवतो ती वस्तुस्थिती काळच सोडवून देते. मग लक्षात येत की उगाचच या गोष्टीसाठी आपण इतका वेळ घालवला.
आता संशोधनातुन असे लक्षात येत की जास्तीतजास्त आजार होण्याचे मुख्य कारण म्हणजे stress कींवा टेंशन घेणे आणि सध्याच्या परिस्थितीत एखादी सुद्धा वाईट बातमी आपला stress वाढवायला कारणीभूत ठरू शकते.
म्हणून, खरचं आयुष्य जर मजेत जगायच असेल तर….चिंता, काळजी करण सोडा. काळजी घ्या…. काळजी करु नका. सगळ्या गोष्टीकडे पहायचा आपला दृष्टीकोन बदला.
“अरे बापरे! मी कस करु?” ला “ठीक आहे मी करून बघतो…” नी replace करा. नियमीत व्यायाम, मित्र मैत्रिणीं बरोबर मनसोक्त गप्पा, गाणे ऐका, घरीच थिएटर सारखा ambience बनवून weekend ला एखादी मूवी बघा……. पुस्तके वाचा…..आणि….मुख्य म्हणजे वर्तमानात जगा.
संत कबीर म्हणतात
“चिंता से घटे चतुराई
घटे रुप और ज्ञान।
चिंता बडी अभागिनी
चिंता चिता समान।
तुलसी भरोसे राम के
निर्भय हो के सोय।
अनहोनी होनी नही
होनी होय सो होय।”……..?
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!


खुप छान वाटला लेख काहीतरी शिकायला मिळाले