प्रतिक्रिया…..
मधुश्री देशपांडे गानू
आजूबाजूला घडणार्या प्रत्येक घटनेला , गोष्टीला माझ्या प्रतिक्रिये ची गरज नाही.. हे आता लक्षात आलंय माझ्या… खूपदा असं होतं किंबहुना नेहमीच असं होतं आपली जवळची माणसे , आपली प्रेमाची माणसे असतात.. अगदी सहज आपल्याला त्यांची काळजी वाटते.. त्यांच्या आयुष्यात सगळे सुरळीत छान असावं अशी आपली मनापासून इच्छा असते..
म्हणून आपला जीव वरवर होतो.. आपण नको इतके लक्ष देतो.. खूपदा समोरच्या व्यक्तीला फक्त कोणीतरी श्रोता हवा असतो.. त्याला कोंणताही सल्ला उपदेश नको असतो.. आपण त्याच्यासाठी आपल्याला वाटते तेवढे महत्वाचेही नसतो.. पण आपण मात्र या गैरसमजातून सल्ला देतो.. अगदी प्रेमाने , पोटतिडकीने..
पण समोरचा माणूस तुम्हाला समजून घेतोच असे नाही.. उलट तुमची किंमत कमी होते त्याच्या लेखी..
बर्याचदा आपण केवळ प्रतिक्रिया देण्यासाठी ऐकून घेतो.. तर असे न करता फक्त शांतपणे ऐकून घेण्याची सवय ठेवा.. कोणी विचारला तर आणि तरच सल्ला द्या.
तुमची माणसे तुमच्या साठी महत्वाची आहेतच.. पण तुम्ही स्वतःसाठी जास्त महत्वाचे आहात हे कायम लक्षात ठेवा.. ” अति परिचयात अवज्ञा ” अशी म्हण आहेच की.. तर कानांचा वापर तोंडापेक्षा जास्त करा..
कोणत्याही परिस्थितीत शांत रहायला शिका.. कठीण आहे. पण आवर्जून प्रयत्न केला तर सगळे शक्य आहे.. बघा…. नक्की जमेल…
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

