Skip to content

गरज नसताना आपणच काही दुःख विकत घेतो!

काही दुःख विकत घेतो आपण.


डॉ. सोनाली गायकवाड


काही दुःख विकत घेतो आपण, गरज नसताना.

आणि मग आपल्याच विचारांच्या गर्तेत खोल फसतं जातो. इतके की इच्छा असूनही बाहेर पडताच येत नाही त्यातून.

मन हे एखाद्या भुंग्या सारखं असतं. ज्या विचारांच्या गर्तेत आपण हमखास अडकणार आणि बाहेर पडायचे मार्गही बंद पडणार हे स्पष्ट दिसत असतं, नेमके त्याच विचारानं भोवती फिरत.

मनात सलत असलेलं दुःख जेव्हा सांगून ही कुणी समजायला तयार नसतं तेव्हा मग साधावा लागतो स्वसंवाद. आपल्या मनापासून आपल्या मनापर्यंत पोहोचणारा. कारण,

सुखी असणाऱ्या(लोकांच्या दृष्टीने) व्यक्तीला दुःखी होण्याची परवानगी नाही. म्हणजे निदान अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. सुखी असण्याच्या काही ढोबळ व्याख्याही आहेत. त्या व्याख्येमध्ये बसणाऱ्यला दुःखी होण्याची परवानगी नसते.

सगळं छान आहे मग कशाला उगाच दुःख करायचं? असा प्रश्न विचारल्या जातो.

पण सुखी असणाऱ्या व्यक्तीलाही, एखादी न व्यक्त करता येण्या सारखी सल, बोच खोलवर अस्वस्थ करून सोडते. कितीही सुखात असलो तरी खोल मनावर उमटलेले एखाद्या घटनेचे पडसाद, व्यक्तीला अस्वस्थच नाही तर अत्यावस्थ करू शकतात. हे कुणाला समजूनच घ्यायचे नसते.

अपमानाचे आणि फसवणुकीचे दुःख माणसाला स्वस्थ बसू देत नाही. त्यातून कितीही बाहेर येण्याचा प्रयत्न केला तरी मन पुन्हा पुन्हा त्या घटने भोवती घिरट्या घालीत असतं. जुन्या जखमा उकरून काढत. त्या जखमा भरायला आल्या असं वाटत असतानाच एखादी घटना ती उकरून काढून भरत असलेली जखम पुन्हा उघडी करून रक्तबंबाळ करत असते, आणि आता पर्यंत केलेल्या सगळ्या प्रयत्नांना विफल ठरवतात.

सगळे विसरून पुढे जावे तर मन विसरायला तयार नसतं. इतक सोपं जर असतं झालेल्या फसवणुकीला, अपमानाला विसरणं तर इतक महाभारत घडलंच नसतं.

चांगुलपणाच्या पांघरुणाने फसवणुकीचे घाव कितीही झाकण्याचा प्रयत्न केलाही. तरी वर्तमान परिस्थिती त्या पांघरुणालाच हवा देत पुन्हा जखमा उघड्या करते. आणि मग कितीही संयम, सदवर्तुणीकीचा पोशिंदा पांडवांन प्रमाणे युद्धला सज्ज होतो.

कधी कधी ही आग इतकी दाहक असते की स्वतःलाच जाळून घेऊ की काय असे वाटत असते. स्वतः तयार केलेल्या क्रोधाच्या अग्नीत स्वतःलाच एक वेळ जाळणे सोपे पण अन्याय किंवा फसवणूक विसरणे कठीण अशी परिस्थिती उत्पन्न होते.
आणि मग सुरु होतं, ते वादळ.

आपल्याच मनात आपल्याला उध्वस्त करून टाकण्याच सामर्थ्य असणारं. वादळ ही अशीच असतात.

क्षणात सगळं बदलून टाकण्याची क्षमता असणारी.
तळपणाऱ्या सूर्यला नभात दडवणार . शांत आकाश गडगडवणार.
सगळ्यांचं अस्तित्व मग शुल्लक ठरत.
असतं ते फक्त आणि फक्त वादळ.

होत्याच नव्हतं करणारं. आणि असंख्य धारांनी थैमान घालणार.

‘वादळ’, मग ते निसर्गाचं असू दे की मनातलं उलथापालथ करून सोडणार हे नक्की !!!!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

1 thought on “गरज नसताना आपणच काही दुःख विकत घेतो!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!