ज्ञान आणि विज्ञान यामध्ये फरक काय?
मयूर जोशी
यासाठी मी नेहमीप्रमाणेच अद्वैत वेदांत याचा आधार घेऊन सांगण्याचा प्रयत्न करेन.
एखादी गोष्ट काय आहे हे समजणे म्हणजे ज्ञान.
व ती गोष्ट कशी काय झाली यामागचे कारण समजणे म्हणजे विज्ञान.
आता सोपे करून सांगण्याचा प्रयत्न करतो.
आपण स्वप्न बघून झाल्यानंतर झोपेतून उठतो. त्यानंतर आपल्या लक्षात हे येते कि जे काही घडले स्वप्नांमध्ये सुखकारक किंवा विस्मयकारक किंवा भितीदायक ते सर्व खोटे होते. किंवा ते एक केवळ स्वप्ना मध्येच बघितलेले होते खरोखर घडलेले नाहीये. ह्याला म्हणतात ज्ञान.
परंतु यापुढे जाऊन स्वप्नामध्ये जे काही मला दिसले ते खरे तर माझ्या मनानेच तयार केलेले होते. म्हणजेच माझ्या स्वप्नातील प्रत्येक गोष्ट, झाड, माणसे, भितीदायक प्राणी किंवा आकार हे सर्व माझ्या मनानेच रूप घेतलेले होते. म्हणजेच मी स्वतःच ते स्वप्न तयार केले त्यामध्ये जगलो परंतु मला याची जाणीव नव्हती की मीच ते तयार केलेले आहे आणि त्यामुळे मी घाबरलो किंवा दुःखी झालो किंवा आनंदी झालो. म्हणजेच ते स्वप्न त्यातील प्रत्येक गोष्ट ही माझ्यापासूनच तयार झालेली होती व मी जागा झाल्यानंतर ती माझ्यातच संपली. याला म्हणतात विज्ञान.
आता जसे आपण वरती स्वप्ना बाबत बघितले तसेच आपल्या खऱ्या आयुष्यात देखील घडत असते. आपल्या जागृत अवस्थेमधील जगामध्ये जेव्हा हे कळून येते की आजूबाजूला प्रत्येक चालणारे गोष्ट ही मायाजाल आहे. त्यामध्ये काहीही खरे नाही ना सुख-दुःख ना कोणतीही माणसे किंवा नातेवाईक किंवा पैसा गाडी बंगला यापैकी काहीच खरे नाही. ज्याप्रमाणे स्वप्नांमध्ये आपण आपल्या आजूबाजूला सर्व गोष्टी स्वतः तयार करतो आणि विसरुन जातो की आपणच तयार केलेले आहे आणि त्यामुळे आपण त्यांना घाबरतो किंवा त्यापासून आनंद मिळवतो. त्याच प्रमाणे आपल्या जागृत जगामध्ये देखील हेच होत असते. फक्त तिकडे फरक इतकाच आहे की स्वप्नाच्या जगामध्ये केवळ आपल्या मनामुळे ते स्वप्न तयार झालेले असते तर जागृत अवस्थेमध्ये अनेक लोकांच्या मनापासून तयार झालेले हे जग आहे. इंग्रजीमध्ये मला हे सांगणे जास्त सोपे जाईल असे वाटते. this world is the manifestation of the cumulative minds of the individuals.
म्हणजेच जागृत अवस्थेमध्ये आपल्या आजूबाजूला घडणारे प्रत्येक गोष्ट ही illusion असते. अर्थात ज्या प्रमाणे आपण स्वप्नामधून जागे झाल्यावर आपल्याला कळते की ते स्वप्न होते सत्य नव्हे त्याच प्रमाणे आत्मसाक्षात्कार किंवा या जागृत जगातून देखील जो माणूस असतो त्याला हे कळते की हे सर्व चालू आहे ते फक्त भुलभुलैय्या.
म्हणजेच वरील उदाहरणांमध्ये आजूबाजूला जे काही चालू आहे ते सत्य नव्हे हे कळणे म्हणजे ज्ञान.
व जे काही चालू आहे ते केवळ माझ्यामुळेच. I have manifested everything around me. everything around me is the result of manifestation of the Brahman (ब्रम्हन – ब्राह्मण नाही) who resides in this body. everything is created within myself and everything will go again inside myself.
प्रत्येक गोष्ट ही माझ्यापासूनच तयार झालेली आहे व ती माझ्या आत मध्येच संपेल हे झाले विज्ञान.
सध्याच्या आधुनिक युगामध्ये quantom मेकॅनिक्स चा अभ्यास किंवा त्याची प्रगती कोणी वाचत असेल तर त्यांच्या लक्षात येईल की क्वांटम मेकॅनिक्स किंवा मेटा फिजिक्स हे याच गोष्टी सांगायचा प्रयत्न करीत आहे.
वेदांता नुसार व मेटा फिजिक्स नुसार आपल्या आजूबाजूचे प्रत्येक गोष्ट किंवा आपल्याबरोबर घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपणच तयार केलेली आहे.
असो, प्रचंड क्लिष्ट विषय आहे. मीदेखील अत्ता अत्ता या गोष्टी जाणतोय परंतु जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय जास्तीत जास्त आत जाऊन. त्यामुळे जितके लक्षात येते किंवा जितके मेंदूला कळतय इतकं सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये त्रुटी असू शकतात कारण मी काही आत्मसाक्षात्कारी नाही तर केवळ बुद्धीच्या जोरावर जे काही कळत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणारा एक सामान्य व्यक्ती आहे.
त्यामुळे जर काही चुका आणि त्रुटी असतील तर मी एक अतिसामान्य आणि मंदबुद्धी व्यक्ति आहे हे समजून त्या मला समजावून द्यायचा प्रयत्न करा. मला समजावून घ्यायला आवडेल.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

