आपण ….आपल्या साठी….
शिरीष जाधव
अहमदनगर
(९४२२०१७९५०)
आपण जगताना, वागताना, बोलताना आणि चालतानाही विचारांच्या सोबत असतोच. एखादी आपल्याला आवडती गोष्ट करायची म्हटलं तरी हमखास येणारा विचार लोक काय म्हणतील?
आपल्या पोस्ट ला, स्टेटस् ला हे शोभेल का? प्रश्न आपल्याशी निगडीत असतो आणि आपण उत्तर मात्र दुसरे काय म्हणतील ही फूटपट्टी घेऊन मोजणी करायला लागतो.लोक दुस-याबद्दल चर्चा करायला नेहमी उत्सुक असतात. पण माणसाने नेहमी स्वतःच्या वैचारीक बैठकीच्या अनुषंगाने हा विचार करावा.
आपल्याला काय हवे आणि काय नको या बाबत आपली स्वतःहाची मत असावीत. आपल्या स्वतःच्या विचारांवर आपण ठाम असणे हे आपल्याला यशाच्या शिखराकडे जाण्यासाठी आवश्यक असते.आयुष्यात माणसाला ध्येय असावेच.आपली स्वतःची स्वप्ने असावीत.आणि महत्त्वाचे म्हणजे आपण ही स्वप्ने जागेपणी पहावीत म्हणजे झोप उडून जाते. वारंवार आपल्या ध्येयांचा विचार केल्याशिवाय यश शिखराकडे आपण मार्ग क्रमण करूच शकत नाही. आणि हो प्रत्येक गोष्ट डोळसपणे पहा.प्रत्येक कारणाचा शोध घ्या.
गोष्टी अवघड असतील पण अशक्य कधीही नसतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे असतेच.यश संपादन करण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजन मात्र करायलाच हवे.योग्य नियोजन, वेळेचा काटेकोरपणे उपयोग, उद्योगी व्यक्तिमत्त्व, आणि स्वतः वर असलेला विश्वास या गुणांवरच आपले यश ठरते. संधी नेहमी नेहमी मिळत नसते.म्हणून मिळालेल्या संधीच सोनं करा.कारण आपल्याला जन्म एकदाच मिळतो आणि सर्वांना वेळदेखील सारखाच मिळतो. मात्र आपण आपल्याला मिळालेला वेळ कसा वापरतो यावर आपली यशस्वीता ठरते.
काही लोक डाव संपण्यापूर्वीच सोडून देतात.ते डाव खेळतच नाहीत. काहीजण म्हणतात आमच्या वाट्याला डावच आला नाही. पण असे काहीच नसते.डाव प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. मात्र तो वेगवेगळा असतो.कुणाला डाव अर्धा मिळतो तो त्याने खेळून पूर्ण करायचा असतो.
कुणाला डाव सोडून दिलेला मिळतो तो त्याने सुरूही करायचा असतो आणि संपवायचा ही असतो.डाव कसाही मिळूदेत डावाला कधीही सोडायचं नसत.आयुष्य जगताना पाय थकतील, आपल्याला पावलापावलांवर संकट भेटतील तरूण श्वासांशी असलेल नातं कधीच तोडायचं नसतं.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

