Skip to content

आपल्या आजुबाजुची प्रत्येक गोष्ट ही तरंगांनी बनलेली असते.

विचार तरंग – (परामानसशास्त्र)


शिल्पा सातपुते


आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट हि तरंगांनी बनलेली असते. तरंग अनेक प्रकारचे असतात. तसच आपल्या मेंदूच्या अवतीभोवती विचारांचे अनेक नदिसणारे तरंग (वेव्ह्ज ) असतात. त्यातील काही तरंग हे तुमचा मेंदू catch करतो आणि मग त्या वर तो विचार करू लागतो.

हि क्रिया ईतकी आपसूक असते की आपल्या मेंदू मधे असे विचार येऊ शकतात किंवा विचारांचा जन्म अशा पध्दतीने होतो हेच आपल्याला माहीत नसत. एका वेळेस माणूस अनेक गोष्टींचा एकदम विचार करू शकतो. म्हणजेच एका वेळी अनेक विचारांचा जन्म होऊ शकतो. पण काही काही विचार हे मेंदू मधून निसटून जातात म्हणजेच कायमचे निघून जातात म्हणजेच जन्माच्या आधीच मरतात.

तर काही विचार हे किती प्रयत्न केले तरी जात नाहित किंवा मरत नाहीत. कधी कधी हेच सेम विचार एकाच वेळेस दुसर्‍या तिसर्‍या चौथ्या अशा अनेक माणसांच्या मेंदू मधे जन्म घेऊ शकतात. आणि मग वेगवेगळी माणस त्यावर एक सारखा विचार करताना दिसतात . मी बर्‍याच वेळा एक सारखी विचार करणारी माणसं बघते. बँकेत एकाच प्रकारच्या प्रोजेक्ट वर अनेक वेगवेगळ्या लोकांकडून प्रोजेक्ट रिपोर्ट आलेले मी पाहीले आहेत. ईतकच नाही तर बर्‍याच वेळेला एकाच पध्दतीच्या शिव्या देणारे पुरूष ही दिसतात.

आपण अजुबाजुच्या लोकांच जर निरीक्षण केल तर हि गोष्ट नक्की लक्षात येईल. एकाच घरामधील लोकांचे विचार तर बर्याचदा एक सारखेच असतात. याला एखाद्या विचारांची लाट येण म्हणतात. अशी लाट काही दिवस किंवा काही वर्षे सुध्दा रहाते. कोणत्याही कृतीचा जन्म हा आधी विचारांमधेच दडलेला असतो. ज्याचे विचार जास्त त्यांची क्रिएटिव्हीटी जास्त.

नवनवीन विचार हे नवनवीन कल्पनेला जन्माला घालतात. छोट्या मोठ्या विचारांच्या मुळाशी त्या व्यक्ती बरोबर घडलेल्या घटना आणि कधी कधी मोठी मोठी कारण दडलेली असतात. मनामधे विचार आलाच नाही तर योग्य कृती घडणारच नाही. योग्य विचार करायला मेंदूला सवय लावावी लागते. नुसती सवय नाही तर ही गोष्ट का अशी आहे असे सतत प्रश्न पडावे लागतात. किंवा असे मेंदू खुप खोल विचार करायला सक्षम लागतात.

हिच लोक पुढे शास्त्रज्ञ होतात. शास्त्रज्ञ होण्यासाठी बुध्दीला आणि विचारांना एक प्रकारचा पोच लागतो. ती पोच वय परत्वेच येत असते . म्हणून लहान मुल ही कधीच शास्त्रज्ञ झालेली दिसत नाहीत. क्वचितच कधीतरी ज्ञानेश्वरां सारखी मुल जन्माला येतात. पण हे फार क्वचित घडणार उदाहरण आहे. पण नेहमी पहाण्यात पण बरेच वेळा लहानपणी एक पाठी असणारी मुल ही नंतर नंतर अभ्यासात मागे पडलेली दिसतात. कारण त्यांच्या मेंदूला अभ्यासा व्यतिरिक्त आणखीन वेगवेगळ्या प्रकारची खाद्य मिळाली असतात. जितकी attractions मेंदूला जास्त मिळतील तितके मेंदूचे काम विखूरलेल असत.

म्हणजे प्रत्येक आवडलेल्या गोष्टींवर मेंदू विचार करतो. माणसांच्या मेंदूचा एक कंफर्ट झोन असतो. ज्या विचारांनी मेंदू, मन आणि शरीर जास्त रिल्याक्स रहात तेच विचार माणूस सगळ्यात जास्त आणि खोल करतो. या करता प्रत्येकाच्या आवडीच्याच विषयांवर मेंदू जास्त आणि खोल विचार करतो. न आवडत्या विषयांवर कमी विचार केले जातात. तरी पण खोल नसले तरी विचार करण्याची प्रक्रिया थांबत नाही. …….

एक उदाहरण पाहू आपण…….. लहान असताना हा प्रयोग आपण सगळ्यांनी केलेला आहे. आपल्याला सुर्य किरणांनी एक कागद जाळायचा असतो. म्हणून आपण एक भिंग घेतो. आणि ते कागद आणि सुर्य प्रकाश यांच्या मधे धरतो. जो पर्यंत आपण नुसत ते भिंग धरलय तो पर्यंत कागद जळत नाही पण जेंव्हा एका विशिष्ट angle ला आपण ते भिंग सेट करतो तेंव्हा आजूबाजूची किरण एकत्र येऊन तो कागद जळू लागतो कारण ती किरण एकत्र झाल्यानी उष्णतेची तीव्रता कागद जळण्या ईतपत वाढवलेली असते. अगदी तसच बुध्दीच असत…. जेवढ मेंदूमधे एकाच प्रकारचे विचार जास्त तितका मेंदू ते काम चांगल्यातील चांगल काम करायला सक्षम होतो. पर्यायाने अस केल्यास माणसाचे प्रत्येक काम हे क्वालिटी वाईज चांगले होऊ लागेल ………

हा लेख आवडला असल्यास पुढच्या लेखात आपण विचार शुन्य आवस्था आणि फायदे या बाबतीत समजून घेऊयात.


Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

 ? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

 ? ?
Whatsapp | Telegram

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!