Skip to content

कोणीतरी आपल्यासाठी जगतोय..खरंच आपण किती नशीबवान!

प्राथमिकता (priority)

मिनल झंवर, जळगाव

(चित्रकार)

आपण खूपदा ऐकतो, ती/तो माझ्यासाठी माझ्या प्रायर लिस्ट मध्ये पहिल्या नंबर वर आहे !! कोणाला आपली प्राथमिकता बनवणे किंवा कोनाच्या जीवनात आपण प्राथमिक स्थानावर असणे ही खूप जबाबदारीची जागा आहे…

कधी कधी आपण ज्यांना प्राथमिक ठेवतो त्या व्यक्तींना आपण कमी जास्त प्रमाणात आपलं पूर्ण विश्वच दिलेलं असतं , आपल्या दैनंदिन जीवनात करणारे कामं आपण त्यांना डोळ्याच्या पुढं किंवा त्याच्यासाठी किंवा त्यांना विचारून किंवा परवानगी घेऊन केलेले असतात…हिच्या/ह्याच्या शिवाय मला दुसरं कोणी ही नकोत इतकं त्यांच्याबद्दल आपण “स्पेसिफिक” होतो. पण कधी कधी ज्या लोकांना आपण आपल्या जीवनातील प्राथमिक स्थान दिलेलं असतं त्यांना ते पेलवल्या जात नाही , त्यांना त्या प्राथमीकतेचा मान राखता येत नाही…ते समोरच्याला “granted” घेतात. 

हं ! हा/ही कुठं जाणार आहे मला सोडून, आपचं येईल परत !!  आणि होतं ही तसंच आपण ज्यांना प्रथमिकतेवर ठेवलंय त्यांच्या  चुका, गर्व, मूर्खपणा, सगळं बाजूला करून त्यांना प्रत्येक वेळेस सांभाळून घेतोजाऊ दे चुकून बोलला/वागला असेल..काही प्रॉब्लेम मध्ये असेल आपण समजून घ्यायला पाहिजे..आपला समजतो म्हणून आपल्यावर ओरडतो.. ह्या वेळेस ह्याला/हिला नक्की स्वतःची चूक समजणार मग येईल की मला  मनवायला..पण, तसं कधीच होत नाही.

दिवस,महीने, वर्ष निघतात आणि त्याची/ तिची अशी वागायची सवय घट्ट होऊन गेलेली असते…आणि, कालांतराने आपल्यातला समजदारीचा बळ कमी झालेला असतो, आणि प्रत्येक वेळेस आपणच समजून घेतोय किंवा समोरच्याला आपण आहोत काय आणि नाही काय ह्याचं काही ही फरक पडत नाहीये… 

जो पर्यंत वापरता येईल तोपर्यंत वापरून घेऊ ही समोरच्याची भूमिका आता आपल्या लक्षात यायला लागते…आणि मग सुरू समजावण्याचा,भांडणाचा, रागाचा, आपले इतके वर्ष किंवा आपल्या भावना वापरल्या गेल्याचा संताप…कधी कधी (क्वचितच) समोरचा समजतो, चूक कबूल करतो आणि सगळं काही छान होतं पण बहुतेक वेळा समोरच्याला आपली चूक आहे हेच वाटतं नाही आपण कसं बरोबर तू कसा चुकीचा/ची हा ब्लेम गेम खेळण्यात समोरचा खिलाडी निघतो…

आणि जो प्राथमिकता देतो त्याचं उभं आयुष्य ह्या खेळात हारण्यात जातं…आपल्यामुळे समोरच्याला किती मानसिक त्रास होतोय हे समजून घेणं हे त्याला/तिला अजिबात गरजेचं वाटत नाही. तसंच , आपणही कोणाच्यातरी जीवनात प्रायर आहोत हे आपल्याला माहिती झाल्यावर त्याच्या भावनाना मान देणं हे आपलही कर्तव्य असलं पाहिजे…कधी कधी जो आपल्याला खूप मान देतोय, प्रेम करतोय त्याला आपल्याशी बोलल्याशिवाय होत नाही हे माहिती झाल्यावर आपणही हीच चूक करत असतो. कधी समोरचा आपल्याला वेडा वाटतो कधी तो आवडत नाही कधी कधी आपल्याला समोरच्याला दुखवायचं नसतं म्हणून आपण फक्त प्रेम असल्याचा दिखावा करतो आणि वेळ मारून घेतोपण, जेव्हा समोरचा  आपल्यासाठी करून थकतो तेव्हा त्याची आपण तीच गत करतो जी आपली कोणीतरी केली आहे…

प्रायरीटीझ वेळेनुसार नक्कीच बदलतात, वेळेनुसार आपल्या एकमेकांबद्दल असलेल्या भावनाही बदलतात पण त्या आपसूक किंवा सहजतेने बदलायला पाहिजे…ह्याच्या/हिच्या जीवनात आपण किती महत्वाची व्यक्ती आहोत ही फिलिंगच किती छान आहे , कोणीतरी सतत तुमचा विचार करतो तुमच्यासाठी जगतोय असा व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही खुप नशीबवान आहात असं समजून तुम्हाला दिल्या गेलेल्या प्रथमिकतेचा मान राखा ज्यानी दिली आहे त्याचा आदर राखा

कारण, आजकालच्या जीवनात लुप्त होत चाललेली एक “दुर्मिळ” भावना तुम्हाला मिळालेली आहे. तसेच, योग्य तोच व्यक्ती तुमच्या प्रायरीटी मध्ये ठेवा कारण ज्याला “स्पेशल” होणं जमत नसेल, तिथे ती ट्रीटमेंट देऊन स्वतहाच्या भावनांचा अपमान करून आपला वेळ वाया करू नका.

Because  “PRIORITIES MATTERS”

Online Counseling साठी !

क्लिक करा

रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!