Skip to content

आपण आपलीच दुःखे कवटाळत बसतो !!!

??मानसिक आरोग्य??


सौ.सुधा पाटील


आपण नेहमी म्हणतो की, आनंदी रहायचं असेल तर आपले विचार सकारात्मक हवेत.पण हे विचार सकारात्मक असण्यासाठी आपलं मानसिक आरोग्य हे देखील तितकंच उत्तम असावं लागतं.मला असंच एकदा कोणीतरी उलटा प्रश्न विचारला की, सकारात्मक रहा असं म्हणून तसं राहता येत का? आहो,ज्याच्या दैनंदिन गरजा भागत नाहीत,त्या भागवण्यासाठी काही जणांना सतत संघर्ष करावा लागतो,त्यानी सकारात्मक कसं रहायचं? त्यांच्या डोक्यात सतत त्यांच्या किमान गरजा असतात.तुम्ही सकारात्मक रहा असं सांगितलं तरी ते साऱ्यांनाच शक्य नसतं.

मी विचार केला की, सकारात्मक राहणं आणि गरजा अपूर्ण असणं याचा खरंच सहसंबंध आहे का? सकारात्मक रहायला काय लागतं? आपल्या मनाची तयारी! मनाची शक्ती प्रचंड मोठी असते.पण ती ओळखता आली पाहिजे.खर तर सकारात्मक विचारसरणी लगेचच तयार होत नाही.त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.शरीर आजारी पडू नये यासाठी जशी आपण काळजी घेतो अगदी तशीच काळजी मन आजारी पडू नये यासाठी घ्यावी लागते.यालाच तर मानसिक आरोग्य असं म्हणतात.ते जपलं की, शारिरीक आरोग्य देखील आपोआपच उत्तम राहतं.

खुपदा माणूस जगणं म्हणजे पैसा, भौतिक गोष्टी असंच समजतो.खरं तर माणसाच्या किमान गरजा भागविण्यासाठी पैसा लागतोच.आणि तो मिळवण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात.पण ज्याला आपल्या गरजा, त्यासाठीचे कष्ट,जीवनाचा आनंद, आपलं आरोग्य,दु:खावर मात करणं याचं समायोजन करता येत तो माणूस नक्कीच जीवन उत्तम जगतो.पण आपल्याच जीवनाचं समायोजन आपणास करता आले नाही की मग मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य बिघडतं.जगात कोणीच माणूस परिपूर्ण नसतो.प्रत्येकाच्या व्यथा,कथा वेगवेगळ्या असतात.

फक्त आपण आपलंच दु:खं कवटाळतं बसतो.त्यामुळे आपणंच आपलं हे सुंदर आयुष्य वाया घालवतो.आयुष्यातील अनेक गोष्टी जाणीवपूर्वक कराव्याच लागतात.सकारात्मक विचारसरणी क्षणात मनात निर्माण होत नाही.मानसिक आरोग्य उत्तम पटकन होत नाही.त्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू झाले की मग हळूहळू मनाला तशी सवय लागतं राहते.आणि यातूनच सकारात्मक विचारसरणी तयार होते.एक म्हण आहे ना… “थेंबे थेंबे तळे साचे”.

अगदी तसेच हळूहळू मनाला सकारात्मक विचारसरणीची सवय जडत जाते.आणि यातूनच मानसिक आरोग्य उत्तम राहू लागतं.आणि एकदा का मानसिक आरोग्य उत्तम ठेवता येऊ लागले की, जीवनातील समस्या शांतपणे सोडवल्या जाऊ शकतात.अनेक समस्या ह्या मनाचा दुबळेपणा यातूनच निर्माण होतात.

म्हणूनच प्रयत्नपूर्वक मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी.ज्यांच्या गरजा कमी असतात किंवा जे केवळ दैनंदिन गरजांच्या मागे असतात ते उगाचंच हव्यास न करता केवळ त्या गरजांचा विचार करून जीवन संतुलित करु शकतात.

अशी बरीच उदाहरणे आहेत.पण ज्यांना गरजा आणि हव्यास यातील फरक कळतो, ज्यांना कुठे थांबायचे ते कळते ते जीवनाचं उत्तम समायोजन करुन जीवनाचा आनंद घेतात.एवढ मात्र खरं की, कोणतीही गोष्ट प्रयत्न केल्याशिवाय स्थिर होत़च नसते.

म्हणूनच जीवन आनंदमय करण्यासाठी, सकारात्मक राहण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करावेच लागतात.पण एकदा प्रयत्नपूर्वक मानसिक आरोग्याची काळजी घेता आली की, सकारात्मक विचारसरणी आपोआप निर्माण होतं जाते…..

So let’s try.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

1 thought on “आपण आपलीच दुःखे कवटाळत बसतो !!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!