निराशा एकदम नाहीशी होणार नाही!
सुरेखा मोंडकर
आशा आणि निराशा ह्या आपल्याच भावना आहेत. माणसाची सहज प्रवृत्ति आहे की तो सकारात्मक भावनांचा तत्परतेने स्वीकार करतो आणि नकारात्मक भावना दूर लोटायचा, नाकारायचा प्रयत्न करत राहतो!
ह्या प्रयत्नात त्याची खूप उर्जा खर्च होत राहते! त्यातून त्याला भावनिक, वैचारिक दौर्बल्य येत राहतं. तो अधिकाधिक असहाय होत राहतो! त्यातून तयार होतात psychosomatic आजार, मनोकायिक विकार!
सतत आपण +ve राहूच शकत नाही, कधीना कधी -ve विचार येणार! ह्या वस्तुस्थितिचा आधी स्वीकार करायचा! Acceptance!
आता ह्यातून बाहेर कसं पडायचं…
तर ह्यावर सर्वसमावेशक, त्रिकालाबाधित असा कोणताही उपाय नाही! उपाय व्यक्ति सापेक्ष असणार… प्रत्येकाचा वेगळा… त्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे!
सुमित्रा भावे एकदा म्हणाल्या होत्या, ” मी निराश झाले की कपड्यांचं कपाट संपूर्ण रिकामं करते, नव्याने पुन्हा लावते. मी मग फ्रेश होते! ”
माझी आई म्हणायची, ” बागकाम केल्यावर, माझ्या डोक्यातील सर्व जळमटं साफ होतात! ”
मी स्वतः निराश झाले की एकटीच लांब फिरायला जाणं पसंत करते. तासभर काही किलोमीटर चालले की माझं डोकं शांत होतं!
मग आता कोरोनाच्या काळात मी काय करते… गच्चीत walk घेते. सुदैवाने गच्चीला छप्पर आहे. भर पावसात पण चालू शकते. आधी परिस्थितीचं नीट आकलन होत नव्हतं तेव्हां sports shoes घालून घरातच जलद चालत होते!
निराशा एकदम नाहिशी होणार नाही. म्हणजे आत्ता होती , मी walk घेतला आणि ती शून्य झाली, असं होणार नाही! हळूहळू डिग्री कमी होत जाईल!
विचारच नाही करायचा,… हे नाही होणार! मेंदूचं कामच विचार करणं हे आहे. त्याला त्याच्या कामापासून थांबवता येणार नाही, म्हणून त्याला डायवर्ट केलं पाहिजे! त्रासदायक विचार येत असताना त्यांना हुसकून प्रयत्नपूर्वक मेंदूला आनंददायक विचार करायला प्रवृत्त करायचं.
हे कठीण आहे पण अशक्य नाही! प्रयत्नाने हळूहळू जमतं!
Practice makes a man perfect
जे टाळणे अशक्य
दे शक्ति ते सहाया।
जे शक्य साध्य आहे
निर्धार दे कराया।
मज काय शक्य आहे
आहे अशक्य काय,
माझे मला कळाया
दे बुद्धि देवराया!
कदाचित ह्या प्रार्थनेचा उपयोग होईल! हे REBT चं… विवेकनिष्ठ विचारसरणीचं सार आहे!
( जर एखादा मुद्दा अधिक स्पष्ट करायला हवा असेल तर विना संकोच विचारा! -ve भावनांना घाबरु नका! प्रत्येकाच्या… अगदी मनोविकारतज्ञांच्या, समुपदेशकांच्या आयुष्यात पण कधीना कधी त्या येऊन गेलेल्या असतात)
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

