Skip to content

साधी राहणी उच्चशिक्षित विचारसरणी…याचं जिवंत उदाहरण…म्हणजे डॉ. हेमा साने !

डॉ. हेमा साने यांनी समाजाला कृतीतून दिलेली एक अनमोल देणगी !

अस्सल निसर्ग प्रेमी, उच्चशिक्षित आणि प्रेरणादायी स्त्री…. डॉ. हेमा साने…

पुण्यातील वनस्पती शास्त्राच्या अभ्यासक डॉ. हेमा साने M.sc, Ph.D in Botany आणि M.A, M. Phil in Indology आहेत. त्यांनी गरवारे कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख म्हणून काम केलंय. त्यांचा इतिहासाचा देखील गाढा अभ्यास आहे. पुण्यनगरीची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून तुळशीबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शितालादेवीचा पार आहे. शहराच्या मध्य भागेतील अगदी जुनाट आणि पडका वाटावा असा वाडा (१२१ बुधवार पेठ) हे हेमा ताई साने यांचे निवासस्थान. वाड्यामध्ये पाऊल टाकल्यानंतर एकाच कुटुंबातील छार मांजरे आणि भारद्वाज, साळुंकी, नाचण, द्याळ अशा पक्षांचा कानावर पडणारा सूर साठवत पुढे गेले कि वनस्पती शास्त्र विषयाच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक आणि लेखिका डॉ. हेमा साने यांचे घर आपल्याला दिसते.
गेल्या साठ वर्षापासून त्यांच्या घरामध्ये विजेचा वापराच केला गेलेला नाही. त्यामुळे घरात साधा दिवा म्हणजे बल्बदेखील नाही, वीजच नाही. त्यामुळे दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजरेटर, वोटर हिटर, मायक्रोव्हेव, मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणे आणि त्यांचा वापर ही तर अतिदुरची गोष्ट.
त्या पाणी विहिरीतून आणतात. त्यांनी टेलिफोन वापरलेला नाही. त्यांनी वनस्पती शास्त्रीशी संलग्न काही पुस्तके लिहिलीत, पाठ्यपुस्तके लिहिलीत, तीही कंदिलाच्या उजेडात ! केवळ वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे तर इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर मिळून तीसहून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे आणि नुकतेच त्यांनी ‘सम्राट अशोक’ या विषयावरील पुस्तकाचे लेखन पूर्ण केले.
निसर्गाशी सन्मुख होऊन पक्षी आणि प्राण्यांसमवेत सहजीवन जगण्याचा आनंद लुटणारे आणि त्यासाठी प्रसंगी जन निंदेलाही सामोरे जाणारे असे पुण्यातील एक अस्सल निसर्गप्रेमी व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ वनस्पतीतज्ञ डॉ. हेमा साने.
आता त्या सौर उर्जेचा दिवा वापरतात. नोकरीतील शेवटची १० वर्ष जबाबदरी असल्याने त्यांनी लुना वापरली. तोपर्यंत त्या पायीच जात होत्या. त्यानंतर देखील नोकरी व्यतिरिक्त इतरत्र त्या पायीच जात.
या अशा वेगळ्या जीवनशैलीबद्दल त्या म्हणतात, “निंदकाचे घर असावे शेजारी” असे तुकाराम महाराजांनी म्हणूनच ठेवले आहे ना ! त्यामुळे अशा टीकेची मी फारशी दखल घेत नाही, असे त्या सहजपणे सांगून जातात. प्रत्येकाची आनंदाची मानके ही वेगळी असतात.
लेखन ही माझी विश्रांतीच आहे. ‘चेंज ऑफ एक्युपेशन इज रेस्ट’ म्हणजे कामातील बदल हीच विश्रांती असते. त्यामुळे वाचन करून दामले कि लेखन आणि लेखन करून दमले कि शास्त्रीय संगीताचे श्रवण हीच माझी विश्रांती असते. आपण फक्त बोलतो, त्या प्रत्यक्ष आचरणात आणतात. 
साधी राहणी आणि उच्च विचारांचे तंतोतंत उदाहरण असलेल्या वयाची ७८ वी ओलांडलेल्या या उच्चशिक्षित आणि प्रेरणादायी स्त्रीच्या निसर्गाप्रती समर्पणाला साष्टांग दंडवत !!!!
***
आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत पोर्टलला  भेट द्या आणि सामील व्हा !

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!