Skip to content

आपली बुद्धिमत्ता ही आपल्यासाठी किती महत्वाची आहे बघा!

मानवी बुद्धी


प्रियांका सारंग

(मानसशास्त्र विद्यार्थी)


बुद्धिमत्ता ही माणसाची खूपच महत्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी निसर्गदत्त शक्ती आहे. दैनंदिन जीवनात व्यक्तीचे वर्णन करताना किंवा तिची तुलना करताना बुद्धिमत्ता या घटकाचा वारंवार वापर केला जातो, तसेच तो वेगवेगळ्या संदर्भात व्यापक अर्थाने केला जातो. हुशारी, चालाखी,चांगली स्मरणशक्ती,कामातील कौशल्य, विनोदबुद्धी, इतरांवर छाप,संभाषणचातुर्य इत्यादी अनेक घटकांना आपण बुद्धीचे निदर्शक मानीत असतो. बरयाचं वेळा व्यक्तीच्या विशिष्ट प्रकारच्या वर्तनावरून बुद्धिमत्तेचा अंदाज केला जातो.

बुद्धिमत्ते विषयीच्या सिद्धांतच्या आधारे बुद्धिमत्तेचे स्वरूप समजून घेणे सोपे झाले आहे. त्या सिद्धांताच्या आधारे बुद्धिमत्तेच्या स्वरूपाविषयी पुढिल प्रमाणे विधाने करता येतील-

१. बुद्धिमत्ता ही बहुतांश अनुवंशाद्वारे ठरत असते. ती जन्मदत असते. पण एखाद्या मुलाला आनुवंशिकतेमुळे जन्मदत चांगली बुद्धी मिळाली तरी त्या बुद्धीची योग्य ती वाढ होण्यासाठी योग्य ते वातावरण आणि योग्य ते संस्कार हवेत.

२. वेगवेगळ्या अनुभवांतून ज्ञान मिळविणे आणि त्यातून शिकणे बुद्धिमत्तेमध्ये अध्ययन करण्याची क्षमता असते. इतकेच नव्हे तर अध्ययन आणि अनुभवांची बुद्धिमत्तेच्या विकासाला मदत होत असते.

३. भोवतालच्या सतत बदलणार् परिस्थितीला तोंड देता येणे : बुद्धिमत्ता म्हणजे प्राप्त बरेवाईट परिस्थितीशी समायोजन करून घेण्याची क्षमता होय.

४. निरनिराळ्या प्रकारच्या समस्या सोडवण्याची क्षमता बुद्धिमत्तेमध्ये अभिप्रेत असते.

५. सखोल विचार व कल्पना आणि योग्य तर्क करण्याची
क्षमता बुद्धिमत्तेत असते. बुद्धिमत्ता ही अनुवंशिक घटकांवर अवलंबून असली तरी ती केवळ आईवडिलांच्याच बुद्धिमत्तेवर अवलंबून असते असे नाही. आईवडिलांच्या आधीच्या पिढीतील पूर्वजांकडूनही मुलांना जन्यूंद्वार बुद्धिमत्ता मिळू शकते.

बुद्धिवर्धन

आपल्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी, अशी बहुतेकांची इच्छा असते. पण बुद्धिमत्तेचा बहुतांश भाग हा अनुवंशिक असल्याने केवळ निम्याचाही निम्मा भाग बालपणापासून वयाच्या १८-१९ वर्षापर्यंत आकार-उकार घेत असतो. मधल्या काळात काही शारीरिक किंवा मानसिक आजार झाला किंवा मेंदूला इजा झाली तरच त्यात फरक पडतो. एरव्ही नाही.

आपल्या मुलांनीही बुद्धिमान व्हावे, अशी पालकांची इच्छा असते. अशा वेळी किंवा परीक्षा जवळ आली की, पालक वर्तमानपत्रे, टीव्ही, इत्यादींवरच्या जाहिराती पाहून मुलांच्या बुद्धिवर्धनाकरिता औषधे विकत आणतात. ब्रेनटाॅनिक्सच्या मागे लागतात, बदाम, अक्रोडवर भर देतात. मेंदू तल्लख करण्यासाठी मुलांना मिळतील ती औषधे देतात.

मुलांची अभ्यासाच्या बाबतीत खूप काळजी घेणारा पालकवर्ग डोळयांसमोर ठेवून अनेक कंपन्या आपल्या ब्रेनटाॅनिकच्या उत्पादनाची जाहिरात अतिशयोक्ती पूर्ण करीत असतात. पालकही या जाहिराततंत्राला बळी पडतात. पैशापरी पैसा खर्च करून औषधे आणतात, पण त्यातून काहीच फायदा होत नाही. तेव्हा बुद्धिवर्धनासाठी कोणत्याही औषधाच्या कोणी नादी लागू नये असे मला व्यक्तीश वाटते. मात्र मुलाची बुद्धी वाढली नाही तरी त्याच्या असलेल्या बुद्धीचा योग्य तो वापर करण्यासाठी योग्य, एकाग्रतेसाठी ध्यान, विपश्यना, तसेच स्वयंसूचनातंत्र काही प्रमाणात नक्कीच उपयोगी ठरू शकते.

माणसाच्या शरीराच्या वजनाच्या २% इतके माणसाच्या मेंदूचे वजन असते. इतर प्राण्यांच्या तुलनेत शरीराच्या मानाने मेंदूचे वजन माणसाचेच जास्त आहे. त्यामुळे बुद्धीचे वरदान मानवजातीला इतर प्राण्यांपेक्षा जास्त लाभलेले आहे. मात्र तल्लख बुध्दीसाठी उपजत गुण महत्वाचे असले तरी प्रयत्नाचे आणि परिश्रमाचे महत्व कमी लेखून चालणार नाही…….


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.



Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!