सोशल मिडीया आणि मैत्री
विनया कविटकर
अनेक माणसं आयुष्यात येतं जातं असतात, पण मोजक्या व्यक्तींशीच मनाची नाळ जोडली जाते. यालाच आपण ऋणानुबंध म्हणतो. काही माणसं कायमस्वरूपी आपल्याशी जोडली जातात. तर काहींच येणं हे खुप कमी कालावधीसाठी असतं.
आजकालच्या सोशल मिडीयाच्या जगात नाती पटकन जोडली जातात तशीच पटकन तोडलीही जातात. कारण इथे क्षणाक्षणाला नवीन ओळखी होत असतात. आपण म्हणतो माणूस ओळखता आला पाहिजे पण इकडे किती माणसं खरा चेहरा घेऊन वावरत असतात, हा खुप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. इथे एकच माणूस अनेक माणसांशी वेगवेगळा चेहरा घेऊन वावरत असतो. एकासाठी एक असतो तर दुसऱ्या साठी वेगळाच असतो. समोरचा माणूस पाहून प्रत्येक जणं कोणाशी कसं वागावं हे ठरवत असतं. एखाद्या प्रामाणिक व्यक्तीकडेही संशयाच्या नजरेने पाहिलं जातं, आणि तेही चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही. हल्ली सोशल मीडियावरही अनेक फसवणुकीच्या घटना कानावर येत असतात. शंभर वेळा पारखून मगच एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला जातो. स्वतःच्या सुरक्षेच्या द्रुष्टीने ते योग्यच आहे. यातच कितीतरी चांगली माणसंही आपल्या हातातून निसटून जातं असतील. पण याला पर्याय नाही. कारण सतर्कता बाळगणं ही काळाची गरज झाली आहे. वरपांगी गोडबोल्या लोकांची संख्याच खुप जास्त झाली आहे. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही हेच काही वेळा कळत नाही. इथे लोकांचा एकमेकांच्या ओळखी काढून स्वार्थ साधून घेणं हाच एकमेव उद्देश झाला आहे असं बहुतेक वेळा दिसून येते.
मैत्री या विषयावर ही लोकं मोठमोठ्या गोष्टी करत असतात. कर्ण.. दुर्योधनासारखी मैत्री असावी. कृष्ण सुदाम्यासारखी मैत्री असावी. मोजकेच मित्र असावेत पण कायम ढाल बनून सोबत राहतील असे असावेत. सगळ्यांनाच असे मित्र हवे असतात पण कोणावर विश्वास ठेवावा इथेच गाडं अडतं. तशातही काही प्रमाणिक माणसं भेटतातही पण अशांना ही निरखून पारखून घेण्यात खुप वेळ निघून जातो. पण उशिरा का होईना आपण चांगले असू तर आपल्याला चार चांगली माणसं मिळणं काही अवघड नाही. शंभरातून चार अशी माणसं भेटतात की जी आपल्या निस्वार्थ मैत्रीच्या व्याख्येत बसतील.
हजार मित्र असण्यापेक्षा चारच जीवाला जीव देणारे मित्र असलेले चांगले. असे मित्र की स्वतःपेक्षा जास्त विश्वास त्याच्यावर असेल. त्याचं बोट पकडून, डोळे मिटून चाललं तरी आपण आपल्या ठिकाणापर्यंत सुरक्षित पोहोचू याची शंभर टक्के खात्री असेल. पण या जगात वाईट अनुभवच जास्त येतात त्यामुळे अशी चांगली माणसं किंवा मित्र असू शकतात यावर काही जणांचा विश्वासही नसतो. पण आपण दुसऱ्या कडून अपेक्षा ठेवतो तेव्हा आपणही समोरच्या व्यक्तीच्या विश्वासास पात्र असणं तेवढंच गरजेचं आहे. ही माफक अपेक्षा तर प्रत्येकालाच असते किंवा असावी.
कोणतंही नातं एका बाजूने जोडलं जातं नाही. समोरून ही तेवढाच प्रतिसाद मिळाला तर कोणतही नातं फुलतं, बहरतं. कायम स्वरूपी टिकतं. त्या नात्याची आपल्या ह्रुदयात एक स्वतःची हक्काची जागा निर्माण केलेली असते. अशा नात्यांना कितीही संकट आली तरीही कोणी हलवू शकत नाही. शेवटपर्यंत सोबत राहतात. आयुष्यभर साथ देतात.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

