Skip to content

उगाचच सल्ले देऊ नका, प्रत्येकाला त्याची स्पेस द्या !!!

उगाचच सल्ले देऊ नका, प्रत्येकाला त्याची स्पेस द्या !!!


अमोल प्रकाश पालकर


ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान

माणूस अपेक्षा बाळगणारा प्राणी आहे.आणि त्याला होणार अपेक्षाभंगाच दुःख झेलत त्याची होरपळ सुरू असते.

जीवन जगत असताना प्रत्येकाची प्राथमिकता वेगळी असते.ज्याला आपण खूप जवळचे मानत असतो.त्याच्या सुखासाठी आपण झटत असतो.तुमची वेळ जेव्हा येते त्यावेळी त्या माणसाची प्राथमिकता तुम्ही नसता.तुम्ही सदैव त्या व्यक्ती साठी उपलब्ध असता, त्याच्या तुमच्याकडून असणाऱ्या सगळ्या अपेक्षा प्राथमिकतेने तुम्ही पूर्ण करता.

तुम्ही ज्यावेळी समोरच्याला जाणीव करून देता मला गरज आहे तुझी त्यावेळी तुम्ही स्वार्थी आहात असा समज करून दिला जातो.इथेच अपेक्षाभंग होतो.आपण सारखी काळजी करतो.सारखे सल्ले देतो.त्यावेळी आपली कटकट दिसते लोकांना.त्यामागची कळकळ नाही कळतं.

बोलणाऱ्याचे तोंड दिसतं.लहान मुलांना सुद्धा आपण रागावतो मारतो ही, त्यांच्या मनात पण आपल्या विषयी अढी निर्माण होते. मोबाईल सारखा घेवू नको अशी बोलणारी माणस, अशी माणसं जवळ आलीं तरी दहशत दरारा निर्माण होतो त्या मागची विशुद्ध भावना कोणच नाही समजून घेत.

वारंवार औषध घेण्याची आठवण करून देणारा, हात धुतले का विचारणारा,थोड काही झाल्यावर दवाखान्यात नेणारा माणूस सगळ्यांना कटकट वाटतो.प्रसंगी त्याचा उपहास केला जातो.

आत्ता आपणच सगळ्यांनी थोड आत्मचिंतन केलं पाहिजे…….दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवायचच नाही.आपण नसल्याने काही फरक पडत नाही.तुम्ही नसलात तुमच्यावर अवलंबून असणारे काही दिवसात दुसरा पर्याय शोधतील.आज उद्या तो भेटतोच. अन् तो भेटला की तुमची आठवण पण धूसर होत जाते.कोणाचंच कोनामुळ काही अडत नाही .आपल्याला उगाच वाटत आपण नसलो तर यांचं काय होईल.

उगाचच सल्ले नका देवू,प्रत्येकाला त्याची स्पेस द्या,सारखे नका डोकावूं नाहीतर तुमच्या काळजी ला संशय म्हणतील लोक.धडपडतील स्वतः अनुभव घेतील शिकतील आपण ,ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान. या उक्ती प्रमाण जगावे आणि हो आपली दुसऱ्याच्या आयुष्यातील जागा आपल्याला ओळखता आली पाहिजे.त्या मूळ अपेशभंगाच दुःख कमी होईल.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!