Skip to content

मानसिक दुःख….? चला समजून घेऊया !

मानसिक दुःख….


मृणाल घोळे मापुस्कर

(क्लिनिकल सायकोलॉजिस्ट)


सामान्यतः आपण असे समजत असतो की, आपल्यावर कोसळलेल्या दुःखाचे मूळ कारण ही एखादी व्यक्ती अथवा परिस्थिती असते; परंतु, बहुतांशी वेळा आपल्या दुखांचे मूळ कारण हे आपले विचार व एखाद्या घटनेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असतो.

थोडक्यात सांगायचे झाल्यास कोणी आपली प्रशंसा केली, आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचा सहवास लाभला, कोणी आपल्याशी दोन शब्द गोड बोलले तर आपण आनंदी होतो परंतु; जर एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे दुर्लक्ष केले, कोणी आपल्याबद्दल अनुदार उदगार काढले, आपण एखाद्या कामात अयशस्वी झालो किंवा आपली अपेक्षा पूर्ण झाली नाही तर आपण संतप्त अथवा दुःखी होतो.. म्हणजेच अप्रत्यक्षपणे आपण आपल्या सुखदुःखाची दोरी कोणा एका व्यक्तीच्या तसेच परिस्थितीच्या हातात सोपवतो.. यावरून आपल्या लक्षात येते की, मुळात हर्ष वा दुःख हे आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांवर अवलंबून नसते तर ते आपण बाह्य जगातील घटनांकडे अथवा एखादयाच्या वर्तनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो त्यावर अवलंबून असते.

डॉ.अल्बर्ट एलिस यांच्या REBT थेरपीनुसार:-

उदहारण अर्थ; आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला टाळत असल्यास आपल्याला वाईट वाटते आणि आपण दुःखी होतो; आपल्या दुःखी होण्याला आपण समोरील व्यक्तीस कारणीभूत ठरवतो आणि क्षणार्धात आपल्याला राग, द्वेष, अस्वस्थता, खिन्नता, अशा भावना ग्रासून टाकतात.. उलट अशा परीस्थितीमध्ये तर्कशुद्ध विचार करणे आवश्यक असते; म्हणजेच घटना आपल्याला हव्या तशा न घडणे म्हणजे दुःख नव्हे ह्याची सतत उजळणी करणे गरजेचे असते.. अर्थात परीस्थितीत जेवढा बदल करणे शक्य असेल तेवढा जरूर करावा परंतु ती आवाक्याबाहेरील असल्यास त्याचे खापर इतरत्र फोडू नये..

चला दृष्टिकोन बदलूया.. विचार, भावना आणि वर्तन ओघानेच बदलेल…..



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

11 thoughts on “मानसिक दुःख….? चला समजून घेऊया !”

  1. Tumhi je bollat Te brobr aahe but Mg ya situation mdhe Nakki Kay kraych te sangitlSangitl Ast tr .. ….

  2. अशा लेखामध्ये एखादं दैनंदिन जीवनातील उदाहरण घ्यावे आणि त्यामध्ये त्यानं कसा विचार करावा हे हे समजून सांगावे ..म्हणजे ते लोकांना नीट समजेल..आता वरील लेखात तर्कशुद्ध विचार करायचा म्हणजे नेमकं कसा करायचा ते सांगायला पाहिजे..नुसती पुस्तकी उदाहरण देऊन नीट समजत नाही

  3. Pravin Gavankar

    तुम्ही मुद्दे संपूर्ण मांडले नाहीत.. सुख दुःखाची उजळणी कशी करावी हे तर तुम्ही नाही सांगितले..

  4. Very nice it is way of living and gain full peace in your further successful happy life.

    Thanks to you

  5. खूप चांगला लेख आहे, व्यवस्थित पणे मुद्दे मांडले गेले आहेत..

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!