घाव तुलनेचा


शांताराम पवार


सुजाण पालक होण्याच्या दृष्टीने ज्या काही बाबी प्रकर्षाने टाळायच्या असतात. त्यातील एक प्रधान्याची बाब म्हणजे ‘तुलना.’ आपण अगदी नकळत मुलांच्या बाबतीत ही तुलना करतो. शेवटी एखादी चूक कळत केली काय, किंवा नकळत केली काय तिचा परिणाम हा होतोच. तुलना करणं ही तशी सहजप्रवृत्ती आहे.आपले मित्र, सहकारी, नातेवाईक यांच्याबरोबर आपण बऱ्याचदा तुलना करत असतो.( आणि सुखातही हाताने दुःखी होत असतो.)

मुळात आपण करत असलेली तुलना ही कायमच अयोग्य पातळीवरची असते.

Advertisement

उदाहरणार्थ –

समजा एक क्ष व्यक्तीने विशिष्ट यश मिळवल्याचे समजले, की आपण आपल्याशी या यशाची तुलना करतो व दुःखी होतो.
अशा प्रसंगी एक लक्षात घेतले पाहिजे की तुलना केले जाणारे दोन्ही घटक समान आहेत का?

एक घटक आहे क्ष चे यश. हा घटक केवळ प्रासंगिक आहे, बाह्यरंगातला आहे. त्या यशामागची त्याची धडपड, त्याने भोगलेल्या यातना, बरं हे यश मिळूनही तो एकंदर आयुष्यात सुखी आहे का? यातलं काहीही आपल्याला पुर्णपणे माहीत नसतं.

Advertisement

दुसरा घटक आपण स्वतः, आपल्या आयुष्याशी,अंतरंगाशी आपण परिचित असतो.

म्हणजे दुसऱ्याच्या प्रासंगिक बाह्यरंगाशी आपल्या स्थिरभावी अंतरंगाची आपण तुलना करतो.(बहोत नाईंसाफी है, ये!) अशाप्रकारे तुलना मुळातूनच असमान घटकांची असते त्यामुळे ती सदोष ठरते, बाद ठरते.

धावण्याच्या स्पर्धेत जिथे वातावरण, भौतिक साधने,धावपट्टी, संधी, सापेक्ष वेळ हे सर्व समान असते तिथे तुलना होऊन सर्वोत्तम धावपटू कोण? हे ठरवता येते, म्हणून ती तुलना मान्यताप्राप्त होते. उसेन बोल्ट( बापरे! काय धावतो तो, सेकंदाला ३०फूट!) जगातील सर्वात वेगवान धावपटू आहे असे ठामपणे म्हणता येते, परंतु अमुक व्यक्ती जगातील सर्वात यशस्वी माणूस आहे असं म्हणणं एकांगीच ठरू शकते.

Advertisement

तुलनेचा एक नकारात्मक प्रभाव म्हणजे आपल्या यशाचा आनंद नष्ट होणे.आपण आपल्या आयुष्यात जे काही यश मिळवलेले असते ते इतरांशी तुलना करताच नगण्य होऊन जाते.(सतत रडणारांचा हा ही एक आवडता उद्योग!)

अशा पध्दतीने तुलना करणं किती चुकीचं आहे हे आपल्या लक्षात येतं. ही बाब पालक म्हणून आपल्या स्मरणात कायमची कोरून घ्यायला हवी. एका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करणं वरवर कितीही सामान्य वाटलं तरी तू जसा आहेस तसा मला आवडत नाहीस हा भाव त्यातून मुलांपर्यंत जातो. मुलांच्या स्वाभाविक संवेदनशीलतेमुळे या तुलनेने अनेक न्यूनगंड त्यांच्यात निर्माण होतात व आयुष्यभर रुतून बसतात.

मुलांना दुसऱ्याचे यश जरूर दर्शवावे परंतु त्या यशासाठी त्याने केलेली साधना अधोरेखित करावी, त्यातील तंत्र समजावून द्यावे तरच ती प्रेरणा ठरेल. अन्यथा ‘त्याने बघ हे केले, तू मात्र करत नाहीस’ हे नाराजीचे तुलनात्मक बोल त्याच्या उमलत्या मनावर लहानसहान का होईना घावच ठरतील, तुमचा तो हेतू नसला तरी.

Advertisement

तुलना हा विचार नष्ट होणारा नाही. तो सहज मनात येईलच पण त्याला विवेकाचा आणि संयमाचा बांध घातला तर आपलं घरच नाही तर पूर्ण जगच सुखी होण्याच्या दिशेने थोडंस तरी सरकेल.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.Online Career Counseling साठी !

??

Advertisement

क्लिक कराकरीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

Advertisement

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.