Skip to content

कायम लक्षात राहणारा “लक्ष्या”…आजही हसवतो !

रितेश राजाराम काळोखे
“२ दशकांपुर्वी शनिवार-रविवार आला की लहानांपासुन-थोरांपर्यंत ज्या  अभिनेताच्या चिञपटांसाठी ४ वाजण्यांची वाट प्रत्येकजण आतुरतेने बघत असे तो म्हणजेच महाराष्ट्रांतील तमाम मराठी-गैरमराठी रसिकजणांवर एकाहाती अधिराज्य गाजवणारा आपला लाडका ‘ लक्ष्या ऊर्फ लक्ष्मीकांत बेर्डे ‘………८०- ९० च्या दशकांत सगळ्यांना खळखळुन हसवणाऱ्या लक्ष्याची आज आठवण जरी झाली तरी सामान्यमाणसांपासुन सिनेसृष्टीपर्यंत प्रत्येकांचे डोळे पाणवल्याशिवाय  राहत नाहीत………….. ज्या दिवशी लक्ष्यामामा हा या जगातुन निघुन गेला तेव्हा संपुर्ण महाराष्ट्र पोरका झाला ………. महाराष्ट्रांतील कितेकांनी आपलाचं कोणीतरी गेला म्हणुन  त्या दिवशी अन्नही वर्ज केले नाही  ऐवढे अफाट प्रेम -माया-जिवाळा-श्रध्दा लक्ष्मीकांत बेर्डेच्यांवर महाराष्ट्रांतील रसिकजणांची होती “…………….!!!!

” लक्ष्मीकांत बेर्डेचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ ला मुंबईतील गिरगावमधील मध्यवर्गीय कुटुंबात झाला ……….त्यांचे शालेय शिक्षण हे खेरवाडीतील युनियन हायस्कुलमध्ये तर B.A पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण हे भवन महाविद्यालयांत झाले……… लहानपणापासुनचं त्यांना अभिनयांची आवड होती पण बेस्ट कंडक्टरकडे लहानपणी दिसणारे पैसे बघुन त्यांना बस कंडक्टर होण्यांचे स्वप्न लहानपणी मनी बाळगले होती पण त्यांना जेव्हा लक्षांत आले की कंडक्टरनी गोळा केलेले पैसे हे त्यांचे नसतात तेव्हा त्यांनी पुन्हा अभिनयांची कास पकडली ………… विद्यालयीन-महाविद्यालयीन अनेक आंतरमहाविद्यालयिन स्पर्धेत सहभाग घेऊन कितेक पारितोषके मिळवली …….. गणेशात्सवांमध्ये ते आणी विजय कदम दिवसांस १०-१० प्रयोग सादर करत असे……..आपले शिक्षण संपल्यानंतर पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘ टुर-टुर ‘ या नाटकांअतर्गत व्यावसयिक रंगमंचावर पदार्पण केले………..१९८५ साली ‘ लेक चालली सासरला ‘ या चिञपटांद्वारे मराठी चिञपटसृष्टीत लक्ष्मीकांत यांचे खऱ्या अर्थाने पदार्पण झाले………….यानंतर महेश कोठारे यांचा ‘ दे देणा दण ‘ या चिञपटांत  सहाय्यक अभिनेता म्हणुन भुमिका मिळाली व त्यानंतर महेश कोठारे यांचा धुमधडका या चिञपटांतील अशोक सराफ व महेश कोठारे यांच्याबरोबर हास्यविनोदांची भुमिका त्यांंना खऱ्या अर्थाने प्रसिध्दी करु दिली………. येथुनचं अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे या विनोदी जोडी जमली व त्यानंतर या जोडीने महाराष्ट्रांच्या चिञपटसृष्टीला अनेक हिट चिञपट दिले …………. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे धुमधडका ,धडाकेबाज ,झपाटलेला ,शेम-टु-शेम , बनवाबनवी , थरथराट ,हमाल-दे- धमाल ,बजरंगाची कमाल या चिञपटांनी महाराष्ट्रांत प्रचंड धुमाकुळ घातला ……….लक्ष्याचा चिञपट आला की सर्व चिञपटगृह बुकींग हौसफुल असायची …….. संघर्षाच्या काळांत त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नी रुही बेर्डेचा खुप मोठा पाठींबा होता पण ……..रुही बेर्डे यांचे अकास्मित निधन झाले व त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे हे एकटे पडले त्यांच दरम्यान ‘ प्रिया अरुण ‘ शी संबध वाढले त्यानंतर त्यांनी प्रिया अरुणशी लग्न केले………. मराठीतील सुपरस्टार झाल्यानंतरही लक्ष्या आपल्या जुन्या साथीदारांना शेवटपर्यंत कधीचं विसरला नाही किंबहुना त्यांच्या आर्थिक व सामाजिक अडचणीमध्ये पहिला धावुन जाणारा पण लक्ष्याच होता ………..मराठीतील प्रसिध्दीच्या शिखरानंतर त्यांना सुरज बडजात्याचा ‘ मैंने प्यार किया ‘ हा सलमान खान मुख्य भुमिका असलेला चिञपट मिळाला व त्यानंतर त्यांनी हम आपके है कौन , अनाडी ,डान्सर ,मासुम ,बेटा , आरजु ,साजन ,चाहत ,जानम समझा करो ,घरगृहस्थी यांसारख्या अनेक हिंदी चिञपटांत काम केले ……. आपल्या असाधारण विनोदी अभिनयांच्या जोरावर लक्ष्मीकांत बेर्डेनी मराठी रसिकजणांच्या हद्रयांत वेगळे श्रध्देचे स्थान निर्माण केले होते म्हणुनचं लक्ष्मीकांत गेल्यानंतर आज १४ वर्षानंतरही त्यांच्यावर मनांपासुन प्रेम करणाऱ्या प्रेक्षकवर्गांची संख्या कमी होताना दिसत नाही “……….!!!!

        
” आपल्या विनोदाच्या अचुक टायमिंगने सगळ्यांना खळखळुन हसणावणारे हे असाधारण व्यक्तीमत्व १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘ एक होता विदुषक ‘ या चिञपटांच्या अपयशानंतर मानसिकदृष्टया पुर्णपणे खचुन जाऊन व्यसनाच्या आहारी गेले ………….. यांमधुनच किडनी(मुञपिंडा)चा विकार बळकवला……….लक्ष्मीकांत बेर्डे यांना ज्या वेळेस आपण केलेल्या चुकांची जाणीव झाली तेव्हा त्यांच्या हातांत होता तो फक्त पाश्चाताप ………. अखेरच्या कालखंडामध्ये विजय कदम ,जयवंत वाडकर ,विजय पाटकर व विनय येडेकर या सिनेसृष्टीतील मिञमंडळीनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रचंड साथ दिली………या दुर्धरा आजारांमुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांची प्राणज्योत १६ डिंसेबर २००४ साली मावळली व संपुर्ण  महाराष्ट्र दुखांच्या अखंड सागरांत बुडाला “………..!!!!

             
” शेवटी काय आपल्या आयुष्यांच्या सर्वोच्च शिखरावर असताना ही ज्या माणसांनी कधीचं गर्व केला नाही किंबहुना आपल्या वास्तविक व कलात्मक जिवनांत  प्रेक्षकवर्ग आणी मिञमंडळीना सतत हसत ठेवले अश्या मराठी चिञपटसृष्टीतील असाधारण व्यक्तीमत्वांस महाराष्ट्रांतील तमाम मराठी रसिकजणांकडुन मानाचा मुजरा “…………..!!!!

***
आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत पोर्टलला  भेट द्या आणि सामील व्हा !

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!