सोनाली जोशी
7 च्या आत घरात??
पूर्वी वातावरण खूप स्ट्रिक्ट असायचे , स्त्रिया तर संध्याकाळी फारशा बाहेरही पडत नसत, तसे बऱ्यापैकी ऑर्थोडॉक्स विचार असत पण काही वेळा ते चांगले होते , शिस्तीचे होते असेच वाटते.
पूर्वी तेवढी कंमुनिकेशन ची साधने ही नव्हती , जसे टेलीफोन , मोबाइल, इंटरनेट मग व्हाट्सएप , fb ,skype, हे आज आहेत म्हणून डायरेक्ट बघू शकतो , बोलू शकतो.
तेव्हा रस्त्यावर light सुद्धा फारसे नसत,
चांगल्याघरातल्या संस्कारित स्त्रिया रात्री बाहेर पडणे म्हणजे वाकडे वळण , किंवा काही तरी गैर असेच विचार येत असत डोक्यात लोकांच्या
एवढेच काय पुरुष ही लवकर घरी येत 9च्या आत जेवण , मुलांचे अभ्यास आणि चिडीचूप , त्यामुळे झोप ही व्यवस्थित पूर्ण होत असे , आरोग्य चांगले राहत होते , आणि घरातले सर्व काही काळ तरी एकत्र घालवीत असत,
आज काल 7 म्हणजे अरे फक्त 7च वाजलेत असे विचार, तसे safe ही असते पण काही वेळेस नसतेही.
मुलांच्या बरोबरीने मुली बाहेर जास्ती वेळ असतात , कधी अभ्यास , क्लास इतर activities असतात तर काही जण किंवा जणी त्याचा गैरफायदा ही घेतात , या फ्रीडम च्या नावाखाली इतर ही गोष्टी होत असतात , झगमागती दुनिया झाली त्यामुळे वेळ , काळ आणि विचार यावर बंधने ही नाहीत असेच झाले , तरी अजून ही काही ठिकाणी 7च्या आत घरात ही प्रथा, शिस्त कायम आहे , त्या मुलांना त्या families ना नावेही ठेवली जातात किती बुरसटलेले आहात ,
सध्या दोन्ही दृष्टी पटतात कामाचे तासही काही वेळेस विविध असतात त्यानुसार काम , तर क्लास अभ्यास इतर गोष्टी या शाळा कॉलेज नंतर त्यामुळं तो उशीर होतोच
पण अजूनही बर्याच घरी पुरुष ही 7 च्या आत घरात हा नियम पाळणारे आहेत , एक तर घराची मुले बाळे ,बायको , आई वडिलांची ओढ आणि कामाचे स्वरूप जर खूप हेक्टिक असेल तर थकल्यासारखे होते हा थकवा आपल्या लोकांच्या मध्ये क्षणात नाहीसा होतो आणि परत बॅटरी रेचार्जे होते , टकाटक,
थोडक्यात काय 7 च्या आत घरात येणे ज्यांना शक्य ते अवलंबतात , ते आवर्जून ते करतातच पण 7 नंतर ही बाहेर गरजेमु ळे ही काही बाहेर राहतात त्यांना पर्याय नसतो , काही मुद्दाम राहतात , काही थ्रिल म्हणून
असे हे 7 चे कधी 10 , 11 झाले की सवयीच्या कुटुंबात लगेच काही तरी घडले , काही तरी बिनसले किंवा काही तरी आहे असे संशय निर्माण होतात,
आणि आजच्या पिढीला मात्र काहीच वाटत नाही बिनधास्त आहे , झाला उशीर त्यावर explaination देण्याची गरज वाटत नाही , कारण सगळेच बिनधास्त
7च्या आत घरात असणारे कुटुंबीय खरे एकमेकांना जपणारे ,वेळ देणारे , एकमेकांची काळजी घेणारे खास कुटुंबच म्हणावे लागेल????????
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
