स्वाती अनंत देशपांडे
(क्लिनिकल सायकाॅलाॅजिस्ट & स्कुल कौंन्सलर)
परभणी.
रिजल्ट इक्वल मुलं
आज 12वी चा निकाल जाहिर होणार आहे तसेच काही दिवसात 10वी चा निकाल पण जाहिर होईल .
अनेक विद्यार्थी आपल्या अपेक्षापूर्तीची स्वप्न पहात असतील ( खर तर यात पालकांच्या अपेक्षा अधिक असतात ).
अनेक विद्यार्थ्यांच्या अपेक्षा (पालकांच्या ) पूर्ण पण होतील पण ज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत त्यांचे काय?
मागिल पूर्ण वर्षभरात घरात लागलेला कर्फ्यु , आवर्जून पूर्ण केलेल्या गरजा, सण-वार , लग्नकार्य , इ.ना दिलेला कट ,एवढे करुनही साधे …% मार्क नाही मिळवू शकला सगळे काही एका क्षणात धुळीला मिळाले ,ही पालकांची पहिली प्रतिक्रिया .
पालकांनो खर सांगा, आपण मुलांची मेहनत मागिल वर्षभरापासून पहात असाल , त्याने घेतलेले कष्टाचे आपण साक्षिदार असाल मग अशा वेळी आपण मुलांच्या मनाचा थोडा विचार करुया ……
आपण आपल्या मुलाकडून अवास्तव अपेक्षा तर करीत नाहीत ना.
त्याला बळजबरीने त्याच्या नावडत्या क्षेञात तर ढकलत नाहीत ना
त्याची आवड एक आणि आपण त्याच्याकडून करुन घेतोय दुसरच अस तर होत नाही ना ….इ. प्रकारचा संवाद ज्याला सेल्फ टाॅक अस म्हटल्या जाते तो स्वत:सोबत करा .
कारण प्रत्येक मुल वेगळ असत प्रत्येकाची कल्पनाशक्ती वेगळी असते आणि पालकांच्या अपेक्षा साधारणत: सारख्या असतात
समजुतदार पालक होऊ या….
पालक बनने सोपे नसते आणि समजुदार पालक तर आपल्या समाजात अभावानेच आढळतात .
एक चिनी म्हण आहे
मडक उपयुक्त ठरते ते मातीमुळे नव्हे तर, तर आतमध्ये असलेल्या पोकळीमुळे…
पालकांचे मुलासोबत असलेले नाते कायम असते पण यामध्ये कुठेतरी रिजल्ट वादळाप्रमाणे येतो आणि हे नाते कधी कधी कायमचे धुऊन काढतो.
पालकांनो,
मुलांच्या मार्कांपेक्षा त्यांच्याशी असलेल नात अधिक गरजेच आहे आणि हे सुरळीत हव असेल तर मुलांना मार्कांच्या तराजुमध्ये तोलू नका.
आधुनिक जगात अनेक क्षेञे अशी आहेत की जिथे आपल मुल आवडीच्या क्षेञात काम करु शकेल.
काय कराल
आपल्या पाल्यास जर अपेक्षेपेक्षा कमी मार्क आले तर सर्वप्रथम स्वत: शांत रहा .मुलांवर दडपण न आणता त्यांचे आधार बना .अपयश हा आयुष्यातील अनुभव आहे .
मुलाला प्रत्येक वेळेस यश मिळत नसत त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेस अपयशही मिळत नसत हा विश्वास द्या.
मुलाचा आत्मविश्वास टिकविणे हे पालकांचेच काम आहे
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.