Skip to content

मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणजे काय? आणि त्याची पात्रता काय?

मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणजे काय? आणि त्याची पात्रता काय?


राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


सर्वसाधारपणे दैनंदिन जीवन जगताना असंख्य मानसिक समस्यांना आपल्याला सोमोरे जावे लागते. त्यासंबंधित सल्ला आपण दैनंदिन जीवनात अनेकांकडून घेत असतो. पती-पत्नीचे किंवा भावंडांचे एकमेकांशी पटत नसेल तर कुटुंबातील एखाद्या वडिलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला घेणे, त्याचप्रमाणे संसारात संकटकाळी मन:स्वास्थ्य बिघडल्यास मन:शांतीसाठी एखाद्या धर्मगुरूंचे मार्गदर्शन घेणे, हे नेहमीच घडत असते.

म्हणजेच माणसे एकमेकांच्या संगतीत राहतात आणि कठीण समयी एकमेकांना साह्य करतात. परंतु एखादी समस्या उभी राहीली, तर योग्य वेळी योग्य सल्ला मिळेलच असे सांगता येत नाही. कोणापाशी आपले मन मोकळे करावे, कोण आपल्याला समजून घेऊन नीट दिशा दाखवेन हेच कळेनासे होते. अशा वेळी माणसे एकटी पडतात, निराशेने खचतात. अशावेळी प्रशिक्षित मानसशास्त्रीय समुपदेशकाची भेट घेतल्यास मनाला उभारी येते, संकटातून मार्ग काढण्याचा आत्मविश्वास उत्पन्न होतो.

अशाप्रकारची मदत मिळू शकते याची माहीती सर्वांनाच असते असे नाही. त्याचप्रमाणे ही मदत कोठे मिळू शकते, समुपदेशकाची शैक्षणिक पात्रता काय असते, कशा प्रकारच्या समस्या असल्यास त्याची भेट घ्यावी, कोण-कोणत्या उपचार पद्धती असतात याविषयी ज्ञान सर्वसामान्य माणसाला नसते. आणि हेच ते कारण आहे, ज्यामुळे बाकीचा फाफट पसारा हल्ली खूपच वाढतोय. ते म्हणजे कोणतेही मानसशास्त्रीय शिक्षण आणि अनुभव नसलेली मंडळी केवळ १० – १५ दिवसाचे कोर्सेस करून स्वतः ला या क्षेत्रातले नामवंत म्हणवत आहेत. याबद्दल त्या सर्व मंडळींना मी अजिबात दोष देणार नाही. कारण सर्वोच्च पदावरचा विचार मांडला तर आम्हीच सर्व सध्याचे तज्ञ मंडळी मानसशास्त्राचा प्रसार आणि प्रचार करायला कमी पडतोय.

कोणत्याही विषयातील तज्ञ किंवा अभ्यासक होण्यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षणक्रम आखणे आणि मग त्या-त्या विषयातले तज्ञ निर्माण करणे, हे आजच्या काळाचे वैशिष्ट्य आहे. (डिग्रीशिवाय जुन्या काळात कोण कसं होतं, काय करत होतं ही बाब प्रेरणादायी जरी असली तरी काल्पनिक आहे) केवळ मानसशास्त्रच नव्हे तर अभिनय, व्यवस्थापन, पाकशास्त्र, पत्रकारीता, वकील, जाहीरातशास्त्र इ. विविध क्षेत्रांचा सुद्धा त्या-त्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास होतो आहे. ही मुलभूत माहीती आपणा सर्वांना माहीत असणे अत्यावश्यकच आहे.

समजा जर ही मुलभूत माहीती आपल्याला माहीत नसेल, तर काही दिवसांपूर्वी रेल्वेने प्रवास करताना “३० दिवसात पत्रकारीता शिका” या जाहीरातीला आपण सर्व भुलून बसू, किंबहुना बसलोय. मग त्यातनं जो पत्रकार बाहेर पडतो. त्याची कल्पनाच न केलेली बरी.

मानसशास्त्रीय समुपदेशकाची पात्रता :-

१) ‘मानसशास्त्र’ या विषयातील विद्यापीठीय म्हणजेच Post Graduation आवश्यक आहे. या शिक्षणात समुपदेशनातील विविध पद्धतींचे ज्ञान (Theory) व त्यांचा व्यवहारातील अनुभव (Practical Experience) यांचा अंतर्भाव असतो.

२) ‘मानसशास्त्र तज्ज्ञ’ आणि ‘मानसोपचार तज्ज्ञ’ या दोघांतही फरक आहे. ज्या सेकंडरी, क्रिटिकल किंवा क्लिनिकल केसेस असतात, त्या सर्व मानसोपचार तज्ज्ञ मंडळी सांभाळतात. त्यांना RCI रजिस्ट्रेशन अनिवार्य केलेले आहे.

३) ‘समाजशास्त्र’ या विषयात एम.ए ही पदवी घेऊन पुढे ‘समुपदेशन’ हे specialization केल्यासही सल्लागार होता येते.

४) विद्यापीठांद्वारे समुपदेशन संदर्भात सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत, त्यात सुद्धा विशिष्ट निकषांची पूर्तता करून शिक्षण घेता येते.

या पोस्टद्वारे सर्वसामान्यांना “मानसशास्त्रीय समुपदेशक” म्हणजे काय ? आणि त्याची पात्रता काय ? हे कळावं, जेणेकरून यापुढे गैरसमज होऊ नये, केवळ इतकाच याचा उद्देश आहे.

आणि तज्ञ मंडळींकडे वरीलप्रमाणे चौकशी करणे, हा तुमचा मूलभूत अधिकार आहे.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??


छंद जोपासण्यासाठी

क्लिक करून सामील व्हा!

??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!