Skip to content

चॅनेल वरच्या मालिका आणि त्यातून निर्माण होणारी मानसिकता !

सोनाली जोशी


चॅनेल वरच्या मालिका आणि त्यातून निर्माण होणारी मानसिकता !


मी महाराष्ट्रात राहते , म्हणून मी केवळ मराठी चॅनेल विषयीच बोलत आहे
मराठीडेली सोप्स ची जदा चलती आहे ,मी तर म्हणते हे डेली सोप्स हे नाव योग्यच , रोज आंघोळ करताना कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात साबण कसा लावतो तसेच हे डेली सोपं ,??कधी जास्ती मालमसाला तर कधी रोजचेच ते रडगाणे, गाऱ्हाणे , बहुतांश या मालिका सासू सून , नवरा बायको , भांडणे , वैर , छळ , त्रास , सासुरवासहेच
नाही तर काही मालिकांमधून कपट , कारस्थान हेच मग ऑफिसमधले असेल , संपत्ती विषयी असेल , नवरा बायको किंवा त्यांच्यातल्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल असेल,

रोज या डेली सोपं मधून त्यातले तेच तेच विचार हमरिंग च नाही का????
जसे सतत त्याच त्याच जाहिराती बघितल्या की मुले आणि मोठे यांच्यात ही मानसिकता साहजिकच येते की अरे हे एकदा घेतले पाहिजे आणि सतत ते हमरिंग होऊन आपसूकच आपणाकडून ती वस्तू खरेदी केली जाते , किंवा मुलांचा हट्ट म्हणून त्यांना घेऊन दिली जातेच,?
तसेच आहे हो , या डेली सोपचे तेच तेच विचार , कृती , सतत दुसऱ्यावर डाव करणे आणि वर मंडल्याप्रमाणे इतर गोष्टी सतत बघून मोठ्यांच्याच काय मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होतोच ,

कालचीच गोष्ट माझी धाकटी मुलगी आणि मी बोलत होतो विषय काय तर शेजारी एक बाई काही तरी खरेदी करत होती पण तिचा नवरा तिला म्हणाला हे घ्यायलाच पाहिजे का , असे करून ती वस्तू घेतली नाही त्यानं तर माझी मुलगी म्हणते कशी , बायकोला नाही म्हणाला हेच शनया सारखी असेल तर घे ना घे असे लगेच म्हणेल ,

मी क्षणभर दचकलेच , की त्यांच्यावर होणाऱ्या या मालिकांचा परिणाम , त्यातून लहान वयात ही दोन व्यक्ती मध्ये केले जाणारे भेद , आणि त्यातून दिसलेला confidence की शनया सारखीला नक्कीच घेणार ती वस्तू आणि त्याच बरोबरीने जानविलेले सत्य की या 9 वर्षाच्या मुलीला बायको आणि मैत्री हुन अधिक असलेल्या नात्याबद्दल माहीती?

मी निःशब्द झाले पण ती मात्र किती सहजगत्या बोलून गेली हे, आणि तिने मला या मराठी मालिकांचे विदारक रूप आणि त्यातून पुढील पिढी किती बेफिकीर आणि निर्ढावत चालली आहे हे दाखविले

यात शनया फक्त आनंद आणि चैन करण्याकरिता या गोष्टी करत असते पण खरच असे किंवा अशी गरजू स्त्री जिने खूप टक्केटोंनपे खाल्ले आहेत , जी केवळ एक मानसिक आधार , शारीरिक गरज आधार यातून जवळ आली असेल तिचे struggle दाखविले तर या मुलांच्या मानसिकतेत आणि विचार सारणीत फरक पडेल ना???

आणि या मालिकांच्या प्रभावाने घरोघरी होणाऱ्या वाद विवाद , आणि बाहेरील परिस्थिती मध्ये दाखविलेले खोटेपणा आणि प्रसंगी आपले साध्य साधण्याकरिता केलेली खून , मारामारी आणि सध्याच्या पिढीत होणारे ते अनुकरणप्रिय action आणि आणि विचार , हे याच मुळे ना?

उलट गंगाधर टिपरे , रामायण , महाभारत , अगदी अलीकडे चला हवा येऊ द्या असे दर्जेदार कार्यक्रम दाखविले तर नक्की निर्दोष मानसिकता रुजेल ना , हो ना ??

चॅनेल ला ही सेन्सॉर बसवला तर नक्कीच अतिशय दर्जेदार निर्मिती होईल ना??


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!