सोनाली जोशी
आयुष्यात एकदा तरी मुन्नाभाई भेटावाच…
मुन्नाभाई m.b.b.s.माझा एक आवडता पिक्चर , किती ही वेळा बघितला तरीही प्रत्येक वेळी नव्याने खूप पोसिटीव्हीटी देऊन जातोच,
खरा डॉक्टर नसेल पण प्रत्येकाच्या मनाचा मात्र चांगलाच डॉकटर म्हणता येईल , छोट्या गोष्टीतून समोरच्या व्यक्ती पर्यंत तो प्रत्येकाला समजून घेतो , आनंद देतो, काय केले कसे वागले म्हणजे समोरच्या व्यक्ती च्या वागण्यात बदल होईल, समोरच्या व्यक्तीला आपल्या बद्दल विश्वास वाटेल ,याचा परिपूर्ण अभ्यास आणि त्या करीता परिस्थिती मध्ये बदल करण्याची कोणतीही तयारी
अगदी स्वीपर असेल तरी त्याच्याशी जी माणुसकी ठेवून एक जादूची झप्पी असेल , आनंद भाई सारख्या निर्जीव व्यक्तीला पुन्हा सजीव करणारा , कधी कॅन्सर ग्रस्त झहीर भाई च्या शेवटच्या काळात त्याला समजून घेऊन टिलेले स्वातंत्र्य आणि आयुष्यातला सर्वोच्च आनंद असो , पप्पांच्या समोर कॅरम खेळून पप्पांना त्यात सामील करून queen जिंकल्यावरही कव्हर नही जायेगा अशा बोलण्यातून पेटवून उत्साहाने किंवा जिद्दीने ते कव्हर मिळवून ज्युस प्यायला लावणारा मुन्नाभाई
इतका विश्वास की “तुम कूछ भी कर सकते हो मुन्नाभाई असे म्हणणारे इतर ”
प्रत्येकालाच वाटते ना असाच आपल्याला समजून घेणारा, कधी आपल्याला नुसती एक जादूची झप्पी देऊन मी आहे सोबत हे आश्वासन देणारा , तर कधी आपल्या दुःखात तुन बाहेर काढणारा , कधी आपल्या आनंदात सहभागी होणारा , टेन्शन नही लेनेका असे म्हणणारा , असा मुन्नाभाई आपल्याही आयुष्यात असावा असे नक्कीच वाटते ना
????
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
