Skip to content

बालपणाची आठवण येणाऱ्या त्या प्रत्येकांसाठी !

मुसाफिर


Miss you… ना…!☺


वयानुसार आपण काय काय ..
गोष्टी सोडल्या..

आपण गाभुळलेली चिंच ..
अनेक वर्षात खाल्लेली नाही

जत्रेत मिळणारी ..
पत्र्याची शिट्टी ..
वाजवलेली नाही.

चटक्यांच्या बिया घासून ..
चटके द्यावेत ..
असं आता वाटत नाही

सर्कसमधला जोकर आपलं …
मन आता रिझवू शकत नाही.

तसंच कापसाची म्हातारी ..
पकडण्याचा चार्मही ..
राहिलेला नाही..
कारण ..
:
कापसाच्या म्हातारीने ..
उडता उडता आपला ..
बालपणीचा काळ सुखाचा..* *स्वत:बरोबर कधी नेला ..
ते आपल्याला कळलंच नाही.

आता त्या सहली नाहीत…

दोन दोन मुलांच्या ..
जोड्या करून ..
चालणं नाही..

विटी दांडू नाही…
गोट्या लगोरी

साबणाचे फुगे नाहीत..

प्रवासात बोगदा आला तर ..
एक अनामिक हुरहूर नाही..

त्या उडणाऱ्या म्हातारीने ..
हे सगळे आनंद नेले…
त्याच्या बदली ..
तिचं वार्धक्य तिने ..
आपल्याला दिलं…

म्हणूनच ती अजून उडू शकते…
आणि आपण जमिनीवरच आहोत.

लाटेने की काळाने …
नेला तो मातीचा किल्ला?

भोवऱ्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला…

हरवली कुठेतरी ती शाळेतली मूल्यशिक्षणाची वही,

इवलुश्या मार्कांच्या प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही….

गेले कुठे ते चालताना ..
पॅकपॅक” आवाज करणारे ..
पायातले बूट?

“मी नाही देणार जा माझं चॉकलेट”
म्हणत आवळलेली ती ..
घट्ट मूठ….

किती जिव्हाळा होता ..
डोकं टेकवलेल्या ..
आईच्या हाताच्या उशीत?
:
ब्लँकेटहून जास्त ..
ऊब होती त्या ..
मायेच्या कुशीत…

हरवला तो प्रेमाचा घास….
“चिऊताई” दाखवत आईने भरवलेला…

घरात न सांगता ..
लपवून लपवून ..
खाऊ खायचा तो ..
प्लॅन ठरवलेला?

गेले कुठे जत्रेतले ते ..
गोड गोड म्हातारीचे केस?

छोट्याशा बुटांची ..
आईने बांधलेली ती ..
सुटलेली लेस….

गेली कुठे ती ..
मामाच्या गावी जाणारी ..
झुकझुक गाडी?

शाळेत बडबडगीते गाताना ..
एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?

झोपताना पाहिलेला तो ..
चांदोमामा कुठे हरवला?

अ आ इ ई ..
पाटीवर लिहिणारा तो ..
खडू कुणी पळवला?

कशाला आलं हे …
आपल्याला शहाणपण????

हरवलं त्यात ते सुंदर बालपण..
खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना?

आयुष्यातील काही …
अनमोल क्षणांची आठवण …
ते क्षण निसटून गेल्यावरच प्रकर्षाने होते…

पण बालपणीच्या काही ..
आठवणी,
मनाच्या कोपऱ्यात ..
अजूनही दाटलेल्या असतात,

त्यांना हलकेच गोंजारलं असता ..
त्यांची सय अधिकच गडद होते…

आपलं मनही किती विचित्र असतं ना…

जेव्हा लहान असतो तेव्हा पटकन मोठं व्हावंसं वाटतं…

शाळा सोडून बाबांसारखं …कामावर जावंसं वाटतं…

मात्र आता मोठं झाल्यावर …
पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात ..
आणि नकळत डोळ्यात पाणी येतं..

आय मिस माय चाइल्डहूड यार
कोई लौटा दे मुझे…
बीते हुए दिन..

चला मन थोडे हलके झाले !


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!