Skip to content

घटस्फोट देताना कायदा जेवढा सतर्क असतो तेवढा सतर्क तो लग्नं लावताना नसतो.

विनय भालेराव
घटस्फोट देताना कायदा नवऱ्याच्या आणि बायकोच्या प्रत्येक विधानाची सत्यता तपासून बघतो.
सतराशे साठ पुरावे तपासतो, लग्न कुठल्या मॅरेज ऍक्ट मध्ये बसते ते तपासून बघतो आणि कुठल्याही बेकायदेशीर गोष्टीचा त्या जोडप्याला फटकाच बसतो, आयुष्य बरबादीच्या मार्गाला लागतं.
आशा आकांक्षा प्रेम सुखं यांची खेळणी कायद्याच्या चरक्यात फेकून देऊन त्यांची भ्रमनिरास अपेक्षाभंग दुःख हि भुकटी भरून नेतात.
या ऐवजी लग्न बंधनात अडकतानाच अनेक गोष्टींचा खुलासा कायद्यानेच त्या जोडप्या कडून करून घेतला तर?
१) दोघांनी मेडिकल चेक अप केले आहे का? त्याचे सर्टिफिकेट.
२) दोघांचा प्रेमविवाह आहे का? घरच्यांची संमती आहे का? नसल्यास संरक्षण हवे आहे का?
३)आंतरधर्मीय विवाह आहे का? निव्वळ विवाहासाठी कुणी धर्म बदलण्यास प्रवृत्त झाले आहे का?
४) तुमच्या संसारात पत्नीची लग्नानंतर जबाबदारी काय असावी? ती तिला मान्य आहे का? तिने कोणतेही उत्पन्न मिळवायचे नसेल तर तुम्ही तिचे आयुष्य कसे सुरक्षित करणार? याचा खुलासा.
५) तुमच्या संसारात पती कडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? त्या त्यास मान्य आहेत का?
६) तुमच्या विवाहानंतर तुमची परंपरागत संपत्ती आणि उत्पन्नाचे वाटप कसे होणार?
७) तुमच्या मुलांची जबाबदारी तुम्ही कशी घेणार? त्यासाठी एकमेकांचे सहचर्य कसे असणार? त्याविषयी तुमच्या जोडीदाराकडून तुम्ही कोणत्या अपेक्षा करता?
८) तुमच्या संसारात तुमचे पटले नाही तर विभक्त होताना तुम्ही तुमच्या संपत्तीचे आणि मुलांच्या जबाबदारीचे वाटप कसे कराल? याची अंदाजे रूपरेषा मांडा.
९) तुमच्या विवाहापूर्वी असणाऱ्या कौटुंबिक सदस्यांची जबाबदारी तुम्ही कोणती आणि कशी घेणार आहात. या विषयी स्पष्टता द्यावी.
१०) विवाहानंतर तुम्ही मुलाकडे अथवा मुलीकडे एकत्र कुटुंबात राहणार आहात कि स्वतंत्र राहणार आहात? या विषयी स्पष्टता द्यावी.
११) दोघांनी आपले सध्याचे उत्पन्न आणि संपत्ती आणि कर्ज तसेच पूर्वीचे आजार व्यंग, आणि यापूर्वी विवाह/घटस्फोट झाला असल्यास त्याविषयी एक जाहिरनामा एकमेकांना द्यावा.
विवाह संस्थेने किंवा सरकारने दोन्ही बाजूंना समुपदेशक देऊन त्यांची विवाहासाठी पूर्ण मानसिक तयारी करून नंतरच लग्नास परवानगी मिळावी आणि त्या लग्नाचे रजिस्ट्रेशन व्हावे, या मताचा मी आहे.
अशाने अनेक भ्रमनिरास टळतील अनेक मुलींचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचतील अनेक मनं न दुखावता आणि वेळ न घालवता सेपरेट होऊ शकतील.
दुसरे लग्न करताना पुरेसे ज्ञान आणि अनुभव व्यक्तीकडे असेल.
घटस्फोटात वेळ वाया घालविण्या पेक्षा संसार करण्याचे तंत्र आत्मसात करण्यात वेळ वाया घालविणे अधिक व्यवहार्य असेल, असे माझे मत आहे.
***
आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत पोर्टलला  भेट द्या आणि सामील व्हा !

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “घटस्फोट देताना कायदा जेवढा सतर्क असतो तेवढा सतर्क तो लग्नं लावताना नसतो.”

  1. Exactly, this Rules and regulations compulsory before marriage. now a days need for a society .

  2. अगदी खरंय आधीच समुपदेशन झाले तर कित्येक घटस्फोट टळतील

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!