Skip to content

मन की बात…..सकारात्मक विचारांची सजावट !

मृणाल घोळे मापुस्कर
आज पुन्हा एकदा साफसफाई केली.. हो साफसफाई.. 
नको असलेल्या त्या जाणिवांची आणि विचारांची.. 

अनेक दिवसांपासून साठलेल्या त्या नकारात्मक विचारांची अडगळ कचऱ्यात फेकून दिली..
निराशा, अवाजवी अपेक्षा यांची मनावर साठलेली जळमटेही स्वच्छ केली..
गंज चढलेले गैरसमज मोडीत घातले..
माझ्यात असलेला चांगुलपणा, प्रेमळपणा यांसारख्या असंख्य गुणांना शोधून, त्यांना घासून पुसून लक्ख केले..
मनाच्या जंगलात माजलेल्या अहम् ची मशागतही केली आणि मनाच्या दारापुढे आशेची सुंदर रांगोळी रेखाटली..

वाह!! आता किती चकचकीत आणि प्रसन्न वाटते आहे माझे हे मनालय..
प्रत्येकाने आपले हे मन नामक सुंदर घर असेच वरचेवर साफ करत रहाणे गरजेचे आहे कारण एकदा का त्यावर नकारात्मक विचारांची पुटे चढली की मग जाता जात नाहीत..
नकारात्मक विचारांची साफसफाई करा आणि सकारात्मक विचारांची सजावट करा..
***
आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत पोर्टलला  भेट द्या आणि सामील व्हा !

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!