Skip to content

…आणि ‘ते’ करण्यासाठी ती तयार होते…कास्टिंग काऊच चं उघड वास्तव !

संचालक, आपलं मानसशास्त्र
प्रत्येक क्षेत्रात “कास्टिंग काऊच” याचं वास्तव हळू-हळू फोफावतंय. काही दिवसांपूर्वी एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने याच्या विरोधात रस्त्यावर आपले कपडे उतरवून निषेध केला होता, याउलट आज सरोज खान या नृत्य दिग्दर्शिकेने “कास्टिंग काऊच” च एक प्रकारे समर्थन केले आहे.
असंही म्हटलं जातं की, ज्या मुलींना/महिलांना याबद्दल आक्षेप नाही, ज्या जुळवून घ्यायला तयार होतात अशांसाठीच ही प्रक्रिया लागू पडते. ज्या मुलींचा निषेध आहे, त्यांच्यावर बळजबरी करने चुकीचे, असं प्रत्येक क्षेत्रातील लोकांचं उघडपणे न आलेलं सामान्य मत आहे.
मुळात जुळवून घ्यायला तयार असो वा नसो “कास्टिंग काऊच” च समर्थन कोणीही केलं गेलच नाही पाहीजे. कारण वस्तुस्थिती पाहता ज्या स्त्रिया जुळवून घ्यायला तयार होत नाहीत, किंबहुना झाले नाही. अशा सर्वांना आपलं #CAREER समाधानकारकपणे घडवता आलं असेल का ? आणि ज्यांनी जुळवून घेतलंय त्यांच्यामध्ये खरच त्या पदासाठीचा #TALENT होता का ? कित्येक महीला तर करीअरसाठी संधी मिळावी म्हणून यांच्या आहारी गेलेल्या आहेत आणि हे उघड वास्तव आहे. आतातर ही एक मानसिकताच बनलीये की याच्यासाठी हे करावं लागतं.
आणि “करावं लागतं” यालाच आपला विरोध कायम असला पाहीजे. कारण हा आता निकषच बनला आहे. मग ते सरकारी कार्यालय असु दे नाहीतर मग अभिनय क्षेत्रातलं एक छोटसं काम असु दे. अगदी सगळीकडे हे प्रदूषण फोफावतंय. विषय हा स्त्रियांवरचा होणारा अत्याचार तर आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, एखाद्या पदावर एखाद्या महीला उमेद्वाराची नेमणुक करण्यासाठी यापुढे हा निकष सुद्धा स्त्रियांसाठी इतका महत्वाचा असायला हवा का ?
***
            लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात             
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक
______________________________________________________
फेसबुक पेज    फेसबुक ग्रुप    YouTube    संचालक     WhatsApp
 _______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!