सगळ्या कंपन्या आप-आपल्या कंपन्यांचे ताळेबंद (Balance Sheet) टॅली करण्यात गुंतलेली असतील. जोपर्यंत ताळेबंद टॅली होत नाही तोपर्यंत कंपनीला आर्थिक फायदा / नुकसान झालेला समोर येत नाही.
त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचा ही ताळेबंद असतो. तो आपल्याला टॅली करावा लागतो प्रत्येक वर्षी…. सुख-दुःखाचं गणित मांडावं लागतं. किती वेळा सुख (फायदा) आलं अन् किती वेळा दुःख (नुकसान) आलं. ह्याचा ताळेबंद बरोबर मांडता आला की आयुष्य एकदम सुखकर होऊन जातं.
खरंतर आयुष्याच्या ताळेबंदात सुखापेक्षा दुःखच अधिक वेळा येतं. पण त्याचाच सामना करायला आपल्याला जमलं पाहिजे. एकदा का त्याचा प्रतिकार करण्याची शक्ती आपल्यात बळावली की मग सुखापेक्षा दुःखच भारी वाटायला लागतं कारण, त्यातूनच खूप काही शिकायला मिळतं. जे दुःख शिकवून जातं, ते सुख नाही शिकवत. दुःखात आपण अधिक परिपक्व होतो. सुख जर सतत आयुष्यात येत राहिलं तर, त्याची सारखी पुनरावृत्ती व्हावी अशीच लालसा मनात येत राहते. आता हे ‘मन’…. हे मन असते कुठे, वसते कुठे, त्याचं नेमकं वसतिस्थान कुठचं, ते आतापर्यंत कुणालाही ठाऊक नाही. कुणी म्हणतं मेंदूत असतं, कुणी म्हणतं हृदयात असतं. पण आहे मात्र खास.. भारी आहे ना..!! अदृश्य असूनही आपल्यावर केवढा मोठा वचक आहे महाशयांचा….!!
अवकाशाचा अभ्यास जसा वैज्ञानिकांना ग्रहणात उत्तमरीत्या करता येतो तसाच माणसाला मनाचा अभ्यास दुःखात उत्तमरीत्या जमतो. कधी कधी आयुष्याच्या मागे वळून पाहाताना कितीतरी दुःखाच्या मालिका नजरेआडून जात असतात. आणि कदाचित त्या दुःखांचा खंबीर पणे सामना करु शकलो म्हणूनच आज हे सुखाचे दिवस पाहायला मिळत आहेत. पण… पण ह्या सुखाला कवटाळून आपण बसलो तर मात्र माज चढायला जास्त वेळ नाही लागायचा. त्यामुळे कुठच्याही परिस्थितीत सुखाने माजून न जाता, आपली राहणी साधी ठेऊन, जरी आकाशाला स्पर्श करून आलात तरीही आपले पाय घट्ट जमिनीवरच रोवून ठेवायचे म्हणजे सुख-दुःखाचा ताळेबंद जुळून येतो.. ❤️
तटस्थपणे एकाग्रतेने हे दोन्ही भोग भोगले की आपल्या अंतर्मनातील ग्रंथी वाढीला लागतात, त्या वाढीतच मजा असते, जीवनाचं सार्थक असतं हे मग लक्षात यायला लागतं.
त्रयस्थपणे एकाग्रतेच्या अवस्थेत राहण्यात किती सुख असतं ह्याची कल्पना अनुभवल्याशिवाय नाही कळत. या अवस्थेत सगळी सुखही अधिक उत्कट होतात आणि दुःखही थोडी बोथट होतात हेही मग कळायला लागतं. असं केल्यानं आपल्या ‘स्व’ अस्तित्वाच्या सुखाचा अनुभव घेत छानपैकी जगता येतं अन् आयुष्याचा ताळेबंद टॅली करता येतो.
सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
***
लिहून आणि वाचून दडलेल्या भावना मोकळ्या होतात
—– इतर लेख वाचा —–
________________________________________
मानसिक आजार व उपचार
________________________________________
प्रेरणादायी लेख/कथा
________________________________________
मुलांचं करीअर काउंन्सिलिंग
________________________________________
लैंगिक शिक्षण
________________________________________
वैवाहीक जीवन
________________________________________
सामाजिक जीवन
________________________________________
पालक – बालक

______________________________________________________
फेसबुक पेज फेसबुक ग्रुप YouTube संचालक WhatsApp
फेसबुक पेज फेसबुक ग्रुप YouTube संचालक WhatsApp
_______________________________________________________
आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”