Skip to content

खरंच संघर्षातुन पुढे जीवन जगण्याची मजा काही औरच..

बॅड पॅच एक संघर्ष……….


कन्हैया गालापुरे
नाशिक


प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच’ येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते…नड येते आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!! हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो… आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो… आयुष्य नकोसं करुन सोडतो… अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो… कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:

१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं… आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते. अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो, काय बोलतो, काय करतो, काय निर्णय घेतो हे आपलं आपल्याला समजू शकतं…

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही… पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं…

असाच एक बॅडपॅच माझ्या आयुष्यात आला, मागच्या वर्षी.

२०१७ साल माझ्यासाठी फार खडतर होतं, नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक गोड बातमी समजली नवीन पाहुणा घरात येणार आणि दुसरी दुःखद मला थोडा पोटाचा त्रास चालू झाला होता पण किरकोळ असेल म्हणून एवढं लक्ष नाही दिलं. औषधाने फरक पडत नव्हता म्हणून चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेण्याचं ठरवलं स्कोपी केली आणि लक्षात आलं की डाव्या बाजूला एक गाठ आहे रिपोर्ट नॉर्मल आले ऑपरेशन झालं पण त्रास काही कमी झाला नाही यात दोन तीन महिने निघून गेले, परत स्कोपी केली तेव्हा कळलं की उजव्या बाजूला पण मोठी गाठ आहे ती टेस्टिंगला पाठवली आणि रिपोर्ट आला, वाचून काय करावं ते कळत नव्हतं घरचे सगळे टेंशन मध्ये बायकोला या परिस्थितीत सांगावं का नाही कारण रिपोर्ट मध्ये मला कॅन्सर आहे असं दिसतं होतं आणि पूर्ण मोठं आतडे काढावं लागणार होतं, वाटलं संपलं आता सगळं आता मी काही राहात नाही किंवा अजुन चार पाच वर्षे जगेल, सगळी स्वप्नं अर्धवट काय करावं सुचत नव्हतं. विचार केला मलाच का हा आजार, मी कधी कोणाचं वाईट केलं नाही पण माझ्याच वाटेला का एवढ्या कमी वयात एवढं दुःख. सगळेजण आपल्या परीने उपचार सुचवत होते कोणी होमिओपॅथी, कोणी आयुर्वेदिक, कोणी कुठलासा बाबा.

पण बहिणीने धीर दिला ती म्हणाली होईल सगळं ठीक आपण लवकरात लवकर उपचार करूया, नाशिक ऐवजी मुंबईला टाटा हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करण्याचं नक्की झालं, फेऱ्या चालू झाल्या, तिथली गर्दी पाहून वाटलं आपला नंबर लागेल ना? पण बहिणीने जिद्द सोडली नाही तिने त्या दिवसात कुठेच लक्ष दिलं नाही मुलं बाळ, नौकरी, घरदार सगळं बाजूला ठेवून तिने फक्त माझ्या कडे लक्ष दिलं, आई वडील आणि बायकोने घर सांभाळलं.

28 जून ला माझं ऑपरेशन झालं जवळपास 10 तास मी ऑपरेशन थेटर मध्ये होतो आणि पुढचे 13 दिवस हॉस्पिटलमध्ये. जणू नवा जन्मच झाला. सगळ्यांनी खूप मदत केली माझ्या काही नातेवाईकांनी व्हाट्सएपच्या माध्यमातून मेसेज टाकला आणि आर्थिक मदत केली ऑफिसमधून पण खूप मदत झाली बॉसची आणि सहकार्याची सुद्धा आर्थिक आणि भावनिकही. नातेवाईक आणि मित्रांची ही खूप मोठी मदत झाली.

लढाई चालू होती पण कुठेतरी नैराश्य आलं होतं, किमोचे साईड इफेक्ट जाणवत होते त्रास खूप होता आणि दिवाळीत घरात एका गोंडस “परी” च आगमन झालं थोडं वातावरण बदललं पण मनात कुठेतरी नैराश्य होतंच अशात “म टा” मध्ये बातमी आली वंदना अत्रेचं कॅन्सर रुग्णांसाठी शिबीर होत ते दोन दिवस केलं आणि मला माझ्यात चाललेल्या घुसमटीच उत्तर मिळाले, “मलाच का हा आजार” आणि त्यानंतर नवीन उमेदीने ऑफिस जॉईन केलं. सगळ्याची साथ आणि आशीर्वाद होतेच पाठीशी.

परत एकदा मनापासून सगळ्यांचे आभार आणि खास करून बहीण आणि जिजाजी.

खरंय संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच……


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!