Skip to content

एक मन म्हणतं ‘करूया’…दुसरं मन म्हणतं ‘नको करायला’ !!

“मन”


मिनल झवर


“तोरा मन दर्पण कहलाये
भले बुरे सारे कर्मो को
देखे और दिखाये”

सगळ्यांना एकच असतं? बहुतेक नाही…सगळ्यांना दोन मनं असतात…एक समजदार,परिपक्व सगळ्यांना समजून चालणारे, घाबरणारे… थोडक्यात व्यावहारिक मन…

दुसरं मन म्हणजे.. फक्त स्वतःच ऐकणारे. मला काय आवडतं, मला काय वाटतं, माझी काय इच्छा आहे, माझ्यासाठी काय चांगलं आहे….फक्त मी आणि माझं करणारे मन..

आणि सगळेच ह्या दोन्ही मनाच्या भांडणात गोंधळतात. ह्याला सांभाळू का त्याला काहीच समजत नाही…

एक मन म्हणतं, नको आता असं वागायला हे चांगलं नाही वाटत. दुसरं म्हणते, अरे पण मला आवडतं ना असं करायला मग करू दे.

एक म्हणतं, नाही आपण असं बोललो तर समोरच्याला राग येईल, दुसरे म्हणतं, पण बोललो नाही तर मला राग येईल.

समजदार मन म्हणत आता नको काही घ्यायला, थोडी बचत करायचीय. तेव्हड्यात दुसरं म्हणतं, अरे कशासाठी आपण कमावले ना मग आपल्यासाठी खर्च करायचे.

एक मन म्हणतं, नको आता.. लग्न झालं आता कशाला हे सगळं..
दुसरं हट्टी मन म्हणतं,अरे पण मला हे खूप आधी पासून पाहिजे होतं, आता करायला भेटतय तर का नाही??

ह्या दोन्ही मनाच्या भांडणात आपण खूपदा फसतो, चुकतो, गोंधळतो…काय चूक काय बरोबर, दोन्ही मनं आपल्याशी बोलतात हे कर हे करू नको…पण जास्त वेळा आपण मनाचे हट्टच पुरवतो. जिद्दी मन आपल्याला भुरळ घालते, नको ते करायला लावते आणि त्याचे नको ते परिणाम समजदार मनाला झेलावे लागतात..आणि तो जास्त अनुभवी होत जातो…

मनाला आवरणे, कंट्रोल मध्ये ठेवणे हे दुसर्यांना सांगणं खूप सोप्प आहे. आपल्या स्वतःच्या मनाला काबू करणे खूप कठीण. आपल्याला त्याची गुलामी करायची की त्याला आपला गुलाम बनवायचं हे तुमच्या खंबीर निर्णयावर अवलंबून असतं. कोणत्याही एका मनाच्या बोलण्यानुसार कृती करायच्या आधी, जर त्याचे काय परिणाम होतील ह्याचा एकदा नीट विचार केला तर बऱ्याच नको वाटणाऱ्या गोष्टींवर मात करू शकाल. फक्त जिद्दी मनाला आवरणं आणि चांगल्या मनाला घेऊन चालणं हे जमलं पाहिजे…

“मन के माने हार है मन के माने जीत”
आजमावून बघा…शेवटी म्हणतात ना…

“मन” का हो तो भला और “मन” का ना हो तो ज्यादा भला…


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!