Skip to content

तुमच्या मुलांना त्यांचा ‘आज’ जगू द्या!!!

आपल्या मुलांना त्यांचा ‘आज’ जगू द्या!!!


मिनल मोरे

वाडा, पालघर


काल जॉब वरून आली आणि अंगणात बसली. त्यावेळी बडबड ऐकू आली. बघितलं तर स्मिता ची मम्मी तिला ओरडत होती.. मी विचारलं, तर म्हणतात खूप हैराण करतात या मुली. रोज अभ्यास घेते, क्लासेस लावले आहेत. शाळेत सुद्धा तेच शिकवतात. पण स्मिताच्या काहीच डोक्यात राहत नाही. तिच्यासाठी आम्ही कुठे बाहेर पण जात नाही. टीव्ही सुद्धा बंद ठेवतो. तिच्यासमोर इतर गप्पा सुद्धा मारत नाहीत. आम्ही घरातले एवढं करून पण पोरीच्या डोक्यात काहीच शिरत नाही.

आता तुम्हाला वाटेल बोर्डाची परीक्षा देत असेल ना स्मिता. तर असं काहीच नाही स्मिता आता इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे. आश्चर्य वाटलं ना कदाचित काही जणांना नसेल आश्चर्य वाटलं. कारण आपण मूल जन्माला येण्याआधीच त्यांचं करिअर कशात करायचं हे ठरवणारे पालक… मुलांकडून बेस्ट ग्रेडची अपेक्षा आपण करतो. पण अशी अपेक्षा करताना आपण त्यांना योग्य वातावरण देतो का?

त्यांना त्यांचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आपण देतो का?

बस झालं गं मम्मी कंटाळा आला अभ्यास करून आता मी मस्त खेळायला जाते शेजारच्या मुलांसोबत!! असं कधी ऐकलं का तुम्ही???

सकाळी मुल उठलं की झोपेतच त्यांना आंघोळ करायला लावायची… तसेच त्याला घाईत तयार करून शाळेत पाठवायचं…शाळेतून आले की जेवण होत नाही तर लगेच शाळेचा होमवर्क नंतर जरा आराम करावा त्यांनी तर लगेच क्लास असतोच की तयार….

क्लास वरून घरी येत नाही तर चहा-बिस्कीट खाल्लं की लगेच क्लास होमवर्क… त्यानंतर जरा वेळ मिळतो त्यांना. पण आपण नाहीना सांगत त्यांना की वेळ आहे, तर जा तुला आवडते तर पेंटिंग कर, क्राफ्टींग कर, मुलांसोबत खेळ.

आपण हेच सांगतो, चल आता आपण रिविजन घेऊ. सतत सततचा अभ्यास, शाळा, क्लासेस नेहमी हेच busy schedule असलं की मुलांचे लक्ष लागत नाही, ना अभ्यासात, नाही खाण्यापिण्यात.

कितीही अभ्यास केला तरी त्यांच्या डोक्यात तो राहतच नाही. कारण तोचतोपणा सतत असेल तर कंटाळा येतो सर्वांचा.

आपणही जॉब वर जातो पण मनात कुठेतरी स्ट्रेस असतोच ना. असं वाटतेच ना आपल्याला ही कंटाळा आलाय या जोबचा सतत उठा जॉब वर जा.

घरी बायकांना सकाळ संध्याकाळ स्वयंपाक, धुणी भांडी हे सर्व करताना त्यांनाही वाटते की कंटाळा आलाय रोज उठा आणि हेच काम करा. नकोसे वाटते सर्व…

आपण मोठी माणसं आपल्या बोलण्यातून आपला कंटाळा व्यक्त करतो पण लहान मुलं मात्र आपल्या भीतीमुळे ते सुद्धा व्यक्त करू शकत नाही.

मग यावर उपाय काय?

सुंदर उपाय आहे. एक दिवस सर्व काम बाजूला सारून, एक दिवस जॉब वर सुट्टी घेऊन बंद खोलीच्या बाहेर पडून बघा. मुलाला छान चित्रपट दाखवा, समुद्रकिनारी फिरवा, एका सुंदर गार्डन मध्ये घेऊन जा त्यांना.. मनसोक्त खेळू द्या बागडू द्या. सतत शाळा क्लासेस अभ्यास आणि या सर्वात चालणारी स्पर्धा… खरंच यामुळे मुलांची बुद्धी कृत्रिम होते. प्रत्येक गोष्ट करताना भीती आणि दबाव यामुळे पुर्वीसारखे मुलांचे स्वच्छंदी जग आता नाहीसे होत चालले आहे.

मुलांना मोकळ्या मनाने विचार करता येत नाही. फक्त पालकांच्या दबावाने अभ्यास करतात पण तो सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही. कारण हेच की त्यांचा बंद पडणारा मेंदू. जर त्याला सक्रिय करायचा आहे तर एक दिवस एक पालक म्हणून आपल्या मुलांना मोकळा वेळ दिला पाहिजे. अभ्यासासोबतच त्यांच्यातील इतर कलांना आपण प्रोत्साहन द्यायला हवं तेव्हाच तर आपल्या मुलांची बुद्धी आवडीने काम करेल.

एक दिवस नक्कीच इतका मोकळा वेळ द्या मुलांना की मुलांच्या मागे सतत ओरडायची, घरातला टीव्ही सतत बंद ठेवायची आणि बोर्डाच्या परीक्षा असल्यासारखं घरातलं वातावरण ठेवायची आपल्याला काहीच गरज पडणार नाही.

एक पालक म्हणून मुलाच्या भविष्याचा विचार करताना त्यांना त्यांच्या वर्तमानात जगण्याची मोकळीक द्या.

ज्यामुळे तो स्वतः स्वतःचं भविष्य सुंदर घडवेल आणि त्याचा आज तो जगेल.!!


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.



Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!