Skip to content

…अन ती वयाच्या ४० व्या वर्षी लग्नाला तयार झाली!

सारिपाट


विनया कविटकर


आज स्नेहा खूप आनंदात होती . आज ती दहा वर्षानंतर परत एकदा बोहल्यावर चढणार होती. चाळीशीतही नवरीच्या वेषात खूप सुंदर दिसत होती. तिने स्वतःला छान मेंटेन ठेवलं होतं. स्वतः चे रुप आरश्यात न्याहाळता न्याहाळता ती भूतकाळात गेली. नकळत आनंदाश्रूची जागा अश्रूंनी घेतली . तिचे मन भूतकाळातील आठवणींमध्ये भरकटत गेले.

स्नेहा आईवडील आणि दोन भाऊ यांच्या सोबत बी. ई. एस. टी. च्या वसाहतीत राहत होती. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असुनही ती खूप साधी राहत होती . केसांची एक वेणी , आणि पंजाबी सूट . कसलेही नखरे नव्हते की कसली फँशन नाही . स्वभावाने मात्र तत्वावेती. तिची स्वतःची अशी काही तत्व होती. स्वतःच्या मतांवर ठाम असायची. सगळ्यांना समजून घ्यायची , कोणाला दुखवायची नाही आणि कोणालाही तीच्या मुळे त्रास होणार नाही याची काळजी ती नेहमी घेत असे.

स्नेहा कॉलेज मध्ये असताना त्यांच्याच कॉलनीतील एक मुलगा तिच्या प्रेमात पडला होता. त्याचं नाव महेश , रूपाने साधा , काळा , जाड आणि उंची कमी. सुरूवातीला तिच्या मागे यायचा, बोलायचा प्रयत्न करायचा तेव्हा तिने तिच्या भावाला सगळं सांगितलं, तिच्या दादाने महेशला जाब विचारला आणि त्याला मारलंही. परंतु काही दिवसांनी महेश पुन्हा तिच्या मागे मागे येऊ लागला. पण तो तिला कसलाही त्रास द्यायचा नाही . त्यामुळे काही दिवसांतच स्नेहालाही तो आवडू लागला. त्याच्याविषयी आपुलकी वाटू लागली.

ती त्याच्याशी बोलायची अधूनमधून पण तीने महेशला होकार दिला नव्हता. तिला तिच्या बाबांच्या मर्जीशिवाय काहीही करायचे नव्हते. महेश वेगळ्या जातीचा असल्यामुळे तिचे बाबा कधीही लग्नाला तयार होणार नाहीत हे तिला माहिती होते. काळ लोटत होता तसेच तिचे महेशवरचे प्रेमही द्रुढ होत होते.

ती त्याच्यासोबत कधीही कुठेही फिरायला गेली नव्हती. कधीतरी चहा व्ह्यायचा. तेवढा वेळच ते दोघे फक्त बोलायचे. तिला बाबांना दुखवायचे नव्हते. त्यामुळे ती महेशला होकार न देताच मनातल्या मनात त्यांच्यासाठी झुरत होती. तिच्या बाबांना हे जाणवत होतं. तिनेही बाबांना थोडीफार कल्पना दिली होती. अशीच पाच सहा वर्षे गेली.

स्नेहाचे शिक्षण पूर्ण होऊन ती नोकरीला लागली. शेवटी तिच्या बाबांना स्नेहाची होणारी कुचंबणा पहावेना. त्यांनी स्नेहाला लग्नाची परवानगी दिली. वैदिक पद्धतीने लग्न पार पडले. ती फार खूश होती. पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही.

लग्नाच्या पहिल्या रात्रीच महेश दारू पिऊन घरी आला. महेशचा तो अवतार पाहून स्नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला फार मोठा धक्का बसला. तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. त्यानंतर हाच प्रकार रोज होऊ लागला. हळूहळू त्याचे एकेक नवीन दुर्गुण समोर येऊ लागले. काही दिवसांतच तिला कळले की तो कर्जबाजारी आहे. त्यांने नोकरीही सोडली. घरी देणेकरी येऊ लागले.

एकदा तर त्याला कोणी गुंडांनी गाडीत घालून नेलं आणि बेदम झोडलं होतं. त्यात तिच्या पगारावर घर चालले होते. पण एकटीच्या पगारात घरखर्च भागत नव्हता. कधी धान्य नसायचं तर कधी सिलेंडर संपलेला असायचा. अनेकदा तिला समोसा खाऊन दिवस काढावा लागतं होता. जोडीदाराच्या साथीशिवाय घर आणि नोकरी सांभाळताना स्नेहाची फारच तारांबळ उडत होती.

महेश कधी कधी रात्रीचा तर रात्रीचा उठून स्नेहाच्या हातपाया पडत असे. पण ते तेवढ्या पुरतेच असायचे. सुधारणा तर काही होत नव्हती, सवयी सुटत नव्हत्या. तरीही तिने दोन वर्षे त्याच्या घरी काढली. तिच्या सहनशक्तीचा अंत होत चालला होता. तिला हा रोजचा त्रास जीवघेणा वाटत होता. सगळं असह्य झालं होतं.

आता ती मनोमन काही ठरवू लागली होती. तिने काही महत्वाचे कागदपत्र ऑफीसमध्ये नेऊन ठेवले. एक कपड्यांची पिशवी शेजारी ठेवली. आणि एक दिवस कामावरूनच तिच्या भावाच्या घरी निघून गेली. अल्पावधीतच घटस्फोटही झाला . आता ती महेशच्या जाचातून मुक्त झाली होती. पण आताही तिला नवीन संकट समोर दिसत होते. तिला दादा वहिनीच्या घरात स्वतःला जुळवून घ्यायचे होते . आईबाबा इकडचे घर विकून गावी रहायला गेले होते. त्यामुळे भावाच्या घरी राहण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.

आईबाबा अधूनमधून इकडे येऊन जाऊन असायचे. भावाचे लग्न झाले होते. तिच्यामुळे दादा वाहिनीला कोणताही त्रास होऊ नये याची ती पुरेपूर काळजी घेत होती. कितीही राग आला , संताप झाला तरीही डोकं शांत ठेऊन घरात शांतता राखण्याचा प्रयत्न करीत होती. तरीही कधीतरी वहिनीशी काही न काही कुरबुरी होतच असायच्या. तिचा दादा लक्ष देऊन होता. त्यामुळे स्नेहाला त्याचा आधार वाटत असे. दिवस सरता सरता दहा वर्षे निघून गेली.

या काळात तिने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. बरीचशी स्थळे पाहिली पण कुठे जमत नव्हते. एखादे मूल असेल तरीही ती जमवून घ्यायला तयार होती. पहिल्या लग्नात एवढा मोठा धोका मिळाल्या मुळे आता तिची एकच अट होती की त्याची आर्थिक परिस्थिती तरी चांगली असली पाहिजे , कमीत कमी खाण्याची तरी तदाद होणार नाही.

स्वभाव कसा निघेल काही सांगून शकत नाही, हे एकच म्हणणे होते. स्थळे बघणं , होकार , नकार चालू होते , अशातच संजयचे मागणे आले. तेही घटस्फोटित होते. ते दुबईला नोकरी करत होते. त्यांची आई इकडे मुम्बईत राहत होती. संजयचा अजून तीन चार वर्षे नोकरी करून नंतरच मुम्बईत स्थायिक होण्याचा विचार होता. स्नेहानेही त्यांना होकार दिला. शेवटी तिला तिच्या हक्काचं घर मिळणार होतं. जिथे तिला टोकणारं कोणी नसेल. ती खूप आनंदात होती. लग्न ठरवून संजय परत दुबईला गेले. या काळात त्यांचे मोबाईल वरून , वॉटसअप वरून गप्पा , विचारांची देवाणघेवाण होतं होती. एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या नवीन नात्याचे प्रेमात रूपांतर प्रेमात होऊ लागले. दोघेही सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागले. लग्नाची तारीखही ठरली. आणि आज तो दिवस उजाडला होता.

स्नेहा डोळ्यातील अश्रू पुसत भूतकाळातून बाहेर आली. कटू आठवणी मनातून बाजूला सारून नवीन आणि सुंदर आठवणींसाठी जागा तयार केली. आणि आता ती नवीन आव्हान स्वीकारायला तयार झाली होती. एकाच जीवनाच्या दुसऱ्या सारिपाटावर नवीन आयुष्याच्या नवीन खेळाला सामोरे जाण्यास सज्ज झाली होती.

अंधारलेल्या रात्री सरल्यावर येणारा उषःकाल हा नवीन सुखाची चाहूल घेऊन येत असतो. गरज असते ती थोड्या संयमाची. हे स्नेहाने तिच्या उदाहरणाने पटवून दिले होते.


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

3 thoughts on “…अन ती वयाच्या ४० व्या वर्षी लग्नाला तयार झाली!”

  1. Ho asehi valan yet aste jivnal kadhihi kalpna keleli naste te.
    Snehacha je Navin aayushyachi suruwat Keli khup chhan

  2. दिनकर हिरे

    नमस्कार,
    आपला लेख उत्तम लिखाण आणि मांडलेले विचार या मुळे मनाला भावला पण जीवनात असे असंख्य समस्या असतात त्यातील ही एक म्हणता येईल.
    सय्यम आणि वेळ हे अश्या समस्येवर औषधासारखे काम करतात असे मला वाटते…
    धन्यवाद आपल्या शब्दांकन साठी..

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!