Skip to content

करिअरचा एक चुकीचा निर्णय…मुलांचं पुढचं आयुष्य बरबाद करतोय!

करिअरचा एक चुकीचा निर्णय…मुलांचं पुढचं आयुष्य बरबाद करतोय!


विलास अशोक जाधव

(शिक्षक)


राम नुकताच १० वी पास झाला होता. त्याला आदर्श नागरिका सोबत एक चित्रकार व्हायच होत. मात्र जगात चित्रकारा पेक्षा मान, सन्मान, पैसा हा इंजिनिअर ला जास्त. आणि म्हणुनच त्याच्या पालकाना वाटत होत राम ने इंजिनिअरिंग कराव. आणि इंजिनिअरिंग करायच तर विज्ञान शाखेला प्रवेश घ्यावा लागणार.

मात्र रामला कला शाखेत प्रवेश घ्यायचा आहे.पालकांची इच्छा वेगळी, कधी पालकांना विरोध करायची सवयच नाही. आपलेच पालक आहेत ते काय वाईट करणार आहेत का ? या सारखे सल्ले द्यायला बाकिचे तयार. पालक देखील शिकलेले सुशिक्षित बोलण्यात पटाईत त्यांचा हात धरणार कोणी नाही. शेवटी ते पालक अनुभव हा त्यांनाच.

पालकां समोर मुलांचा अनुभव हा काय असणार.आपल्या मुलाला दोन्ही बाजु दाखवुन आपलीच बाजु कशी योग्य हे पटवुन देण्यात त्याचे पालक हुशार. अदृश्य असणार्‍या मन, ईच्छा, आणि समाधान या गोष्टी किती पटवुन देणार तो राम. पैसा, मान, सन्मान, पालक ह्या दृश गोष्टी समोर रामच काय चालणार. अगदी पालकांनी असही सांगितल तुला कला शाखेलाच जायच आहे ना. मग आपली…. १२वी नंतर घाल, कर पुढच शिक्षण कला शाखेत. आता कला शाखा घेतलीस तर नंतर विज्ञान शाखा घेता येणार नाही.

त्याला विज्ञान शाखा घ्यायचीच नाहीय तर तो नंतर तरी का विचार करेल, मात्र पालकांनी त्यांच ऐकाव म्हणुन ह्या ईतर गोष्टी देखील त्यांनी सांगितल्या. सांगत होते ते सत्य होत मात्र त्याची राम ला गरज नव्हती.
पालकांना हे माहित होत की आता जर आपण एकजुटीने आपला निर्णय पटवुन दिला आणि आपण आपल्या मनासारख करायला लावल तर ह्याच एकजुटीने पुढे देखील आपल्या मनासारख करुन घेवु शकतो यावर पालकांचा विश्वास होता.

शेवटी घरातील सर्वांनी एकजुट करुन इंजिनिअरिंग कस योग्य हे पटवुन देयच अस ठरल त्यासाठी वेळ स्थळ ठरवल गेल. पक्षातुन ऐनवेळी एखादा आमदार फुटुन समोरच्या पक्षात जावु नये म्हणुन पक्षश्रेष्टी ज्याप्रमाणे मेहनत घेतात भावनिक करतात अगदी त्याप्रमाणे आदल्या दिवशी खबरदारी घेण्यात आली. ठरल्या प्रमाणे सर्वजन बसले, प्रत्येक जन आपआपली मत मांडत होते.

एकीचे बळ ही गोष्ट राम शाळेत शिकला होता, आता तो त्याचा अनुभव घेत होता. एका काठीने साप मरत नसेल तर काठ्या वाढवुन त्याला मारल जात. पण काही करुन सापाला मारायच हे पक्क ठरलेल असत. राम देखील आपली विज्ञान शाखेत जायची इच्छा नाही हे सांगत होता. मात्र त्याला काय करायच हे त्याने आपल्या पालकांना अगोदरच एकांतात सांगितले होते. कोणत्या गोष्टी कोणा जवळ सांगाव्या हे त्याच्या बुद्धी नुसार त्याने सांगितल्या होत्या. नाती गोती असावी पण काहि गोष्टी नातेवाईका पेक्षा फक्त पालकांना सांगायच्या असतात. राम ऐकत नाही पाहुन समोर बसलेल्या नातेवाईकांचा आवाज वाढु लागला. शेवटी हतबल झालेला राम एकजुटी समोर शरण आला. सापाला सर्व बाजुनी काठ्यानी (माणसांनी) घेरल होत आता अगांत कितीही बळ असल तरी उपयोग नव्हत.

शेवटी रामची ईच्छा नसताना विज्ञान शाखेला प्रवेश घ्यावा लागला. मन लागत नसताना तिथे बसाव लागत होत. एक — एक तासिका एका — एका दिवसा एवढी वाटु लागली. आणि एक — एक दिवस एका — एका वर्षा एवढा भासत होता. सर्वच मनाविरुद्ध घडत होत जी स्वप्न बघितली होती ती तो पुर्ण करु शकत नव्हता. इंजिनिअरिंगचे विषय त्या ठिकाणची भाषा सर्व नकोस वाटत होत. काॅलेज चे शिक्षक बाकिचे विद्यार्थी यात कोणातच मन रमत नव्हत. ना कोणाविषयी प्रेम आपुलकी वाटत होती. ना स्वतः विषयी प्रेम वाटत होत, स्वतःच्या तब्बेतीचे तीन तेरा वाजत होते तरी स्वतः कडे लक्ष नव्हता. स्वतःच्या जिवाची पर्वा नव्हती, ना जेवणा कडे लक्ष ना कशात काही फक्त एक जिवंत माणुस म्हणुन जगत होता. जे स्विकारल आहे म्हणुन काॅलेजचे दिवस भरत होता.

काही महिन्यानी परिक्षा सुरु झाली. मात्र रामला त्याचे विषय देखील माहित नव्हते. तो फक्त शरिराने काॅलेजला जात होता. त्यामुळे तिथे काय शिकवतात त्याकडे त्याचे कधी लक्षच नव्हते. शेवटी जे व्हायचे तेच झाले राम सर्व विषयात नापास झाला. यापुर्वी कधीच कोणत्या विषयात नापास झाला नव्हता.आणि अशा परिस्थितीत जगत असताना स्वतःला सावरत त्याने काॅलेजचे ६ महिने पुर्ण केले.

आपल स्वप्न विसरला नव्हता. मात्र त्याने ठरवल स्वतः मधे बदल करायचा. आपण आज जिंवत आहोत हे जग पाहु शकतो ते आपल्या आई — बाबांमुळे. मग आपण त्यांच्यासाठी जगुशकत नाही का ? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांनी मनात काहोर माजवल.

आपल्या आई वडिलांना काय हव असत आपल्याकडुन, आपल्या चेहर्‍यावर आनंद. बस मग आपण आपल दुःख लपवुन त्यांच्यासाठी चेहर्‍यावर आनंद आणु शकत नाही का ? जगाच दुःख आपल्यालाच आहे असा चेहरा घेवुन बसण्या पेक्षा आई — बाबांशी बोलले बर ना ! तस ठरवुन तो जगु लागला. सुरवातीला जमत नव्हत पण हळु हळु जमु लागल.

चेहर्‍यावर आंनद ठेवु लागला. त्यामुळे वर्गातील १—२ मुले बोलु लागली.चेहर्‍यावर आंनद असेल तरच कोणीतरी येयील आवाज देईल हे समजल. सुखात सोबती खुप असतात. लोकही अशीच आहेत लग्नात नाचायला पुढे आणि प्रेताच्या वेळी मागे. सुखात पुढे दुखात मागे. राम आता स्वतःसाठी जगायच सोडुन दुसर्‍यांसाठी जगु लागला. जमत नसताना, ईच्छा नसताना दिवसभर चेहर्‍यावर आनंद ठेवुन रात्र रात्र रडत असायचा.

हळुहळु स्वतःला सावरत जिवन जगु लागला.सर्व नकारात्मक विचारावर विजय मिळवुन सकारात्मक विचार करु लागला. संथ गतीने प्रगती करु लागला. कसा बसा इंजिनिअरींग पास झाला. पास झाल्यामुळे चेहर्‍यावर आनंद नव्हता तर पालकांच समाधान झाल आणि ते आपण केल. आपली स्वप्न , आपली ईच्छा मारुन त्यांच मन राखल. आता तरी त्यांनी त्यांच ऐकत नाही अस बोलु नये हिच अपेक्षा. आज राम आणि त्याचे पालक ही समाधानी आहेत.

पालकांनो, असे अनेक राम केवळ पालकांच्या इच्छाखातर आपली स्वप्न बाजूला ठेऊन दिशाहीन मार्ग स्वीकारतात आणि आहे त्या स्थितीत स्वतःला ऍडजस्ट करतात. तसेच काही मुलं किंवा पालक अभिरुची, कल, क्षमता, बुद्धिमत्ता लक्षात न घेता केवळ मार्केट ट्रेंड पाहून डोळे झाकून ऍडमिशन घेतात. म्हणून अशा सर्व मुलांना येणाऱ्या काळात स्वतःला ठीकठिकाणी फार सामावून घ्यावे लागते.

ज्यातून मुलांचा मानसिक त्रास वाढतो आणि तो त्रास घरात प्रवेश करतो.

पुढे उदरनिर्वाहासाठी वाट्टेल ती नोकरी पत्करावी लागते.

म्हणजे एका चुकीच्या निर्णयाने व्यक्तिगत, सामाजिक, कौटुंबिक, वैवाहिक जीवनावर त्याचे नकारार्थी पडसाद पडतात.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.



Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!
***

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


क्लिक करून सामील व्हा!

??

1 thought on “करिअरचा एक चुकीचा निर्णय…मुलांचं पुढचं आयुष्य बरबाद करतोय!”

  1. ह्या राम च्या जागी मीच आहे असे वाटतयं….१० वीला चांगले मार्क्स पडले..मला आर्ट्स ला जावून इतिहास चे संशोधन व समाजशास्त्राच्या अभ्यास करायचा होता..पण आधी १२ वी सायन्स कर.. नंतर पुढे बघू म्हणून सायन्स केले..तिथे अभ्यास करून मार्क्स मिळवले तर आता इंजिनिअर हो म्हणून मागे..मला तर त्यात intrest नव्हता पण आधी option B thev .. म्हणून engg.केले..तिथे नापास झालो..म्हटले सोडून देतो..तर इतके पैसे वाया घालवणार का..म्हणून कसे बसे पास झालो…आता जॉब कर म्हणून मागे…korona chya काळात जॉब गेला.. आता काय तर मलाच नावे ठेवतात..वाटते सोडून जावे कुठेतरी

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!