Skip to content

‘टेन्शनलेस हेल्थी लाईफ’ साठी एक रहस्यमय टीप…!!!

आता जगा आयुष्यभर टेन्शन फ्री लाइफ …..लॉकडाऊन नंतरही!


प्राची पाटील


जाणून घ्या फक्त ही एक रहस्यमय टीप…….!!!!!!

It’s not stress that kills you… It’s your reaction to it….

नमस्कार मंडळी ….! कसे आहात
सगळे …???? मला माहिती आहे

खरंतर या , lockdown च्या काळात असा प्रश्न विचारणे धाडसीपणा ठरेल.

सर्वत्र फक्त कोरोना चे थैमान ….मृत्यूचे तांडव …बेरोजगारी आणि या सर्व अनिश्चिततेचे सावट घेऊन घरात गेल्या अनेक दिवसापासून संयमाच्या कसोटीला पुरेपूर उतरून घरात जायबंदी झालेले आपण. ….

कुणाला आपली नोकरी कायम राहील की नाही याची चिंता ….तर कुणाला पगाराची चिंता ….कुणाला पोरा बाळांच्या शिक्षणाची चिंता ….कुणाला कर्ज हप्ते कसे फेडायचे याची चिंता….तर कुणाला संसाराच्या जमाखर्चाची चिंता….

परंतु आज मी तुम्हाला जी १ जबरदस्त टिप सांगणार आहे ती जर तुम्ही उपयोगात आणली तर या सर्व चिंतेतून आणि तणावातून तुम्ही कायमचे मुक्त व्हाल…..

मंडळी ,वास्तविक पाहता हा तणाव एखादी घटना किंवा आजूबाजूचे लोक…त्यांचे वागणे ..यातूनच उत्पन्न होतो अर्थात आजकालच्या आभासी जगात तर एखादे नोटिफिकेशन, एखादा ई-मेल ..लाइक्सची संख्या…या गोष्टीदेखील तणावा साठी पुरेशा ठरतात..हा भाग निराळा ..!!

सर्वसाधारणपणे तणाव हा एखाद्या घटनेशी संबंधित असतो मग ती भूतकाळातली असो अथवा भविष्य काळातली काल्पनिक घटना असो किंवा लोकांच्या वागण्याशी संबंधित असो ….. परंतु खरंतर जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा त्या घटनेला काहीच अर्थ नसतो ….

Event has no meaning… You gave meaning to that event.

घटनेला अर्थ आपण देत असतो आणि तो सुद्धा कसा…. तर फक्त आपल्या मेंदूएवढा….कारण

प्रत्येकाचं जग, केवढं तर ते फक्त त्याच्या मेंदू एवढं..

लहानपणापासून आपण ज्या वातावरणात वाढलेले असतो… आपल्या परिसरातल्या श्रद्धा रुढी-परंपरा …आजूबाजूचा लोकांची मानसिकता ..पाप -पुण्य..नैतिकता अनैतिकता …सत्य-असत्यता या आपल्याला सांगण्यात आलेल्या संकल्पना आणि आपले वैयक्तिक अनुभव विचार ,भावना, स्वभाव या सर्वांचा प्रभाव आपल्या , belief system वर होत असतो .जसे जसे आपण मोठे होत जातो तसतसे आपली ही ,belief system खूप दृढ होत जाते…..

आपल्या ज्ञानेंद्रियांनी मेंदू पर्यंत पोचवलेल्या संवेदनांचा अर्थ आपला मेंदू लावतो खरा …पण फक्त आणि फक्त आपल्या या belief system चौकटी पुरता …!

म्हणून एखादी घटना घडते परंतु त्याचे दहा लोकांनी लावलेले दहा अर्थ निघतात…उदा.हा lockdown काळचं घ्या ना …..

या काळात कितेक जण आळसावलेले किंवा सुस्तावले आहेत आणि रडत रडत हातपाय गाळून दिवस ढकलत आहेत..,परंतु त्याच वेळी काही लोक असेही आहेत ज्यांना या मंदीमध्ये देखील संधी दिसते आहे दिवसातील प्रत्येक क्षण न् क्षण पुरेपूर वापरून ते या संधीचे सोने करीत आहेत ….!!!!

तुम्हीसुद्धा त्यांच्यापैकीच एक होऊ शकता गरज आहे ती फक्त एक दृष्टिकोन बदलण्याची…

दृष्टीचा इलाज होऊ शकतो परंतु दृष्टिकोनाचा इलाज होऊ शकत नाही.

सर्वप्रथम तुम्ही तुमची मन:स्थिति बदला परिस्थिती आपोआपच बदलेल…

Your vision.. decides your decision….

फक्त गरज आहे ती नेहमीच्या सरधोपट विचारसरणीची निसरडी पायवाट सोडून चैतन्यमय अशा सकारात्मक राजमार्गावर चालण्याची कारण ….

जब ,बदलती है
तब बदल जाते है नजारे…

आपल्याला आपल्या आयुष्याचे worrier व्हायचे आहे की,

warrior ….????

हे आता फक्त तुमच्या हातात आहे.

तुमचा एक दृष्टिकोन आयुष्याशी फाईट करायचे की फ्लाइट करायचे हे ठरवणार आहे ….वाईट दशेपासून स्वतःला वाचवायचं असेल तर हीच वेळ आहे आपल्या विचारांना नवी दिशा देण्याची…

हा लेख वाचून झाल्यानंतर एका कागदावर तुम्ही तुम्हाला भेडसावणाऱ्या सर्व समस्या लिहून काढायच्या आहेत आणि त्या सर्व समस्यांवर आत्तापर्यंत ज्या दृष्टीने कधीच विचार केला नव्हता त्या दृष्टीने आता विचार करायचा आहे … रोज सकाळी फक्त काही वेळ या कृतीला द्या. …नक्कीच नवनवीन यशाचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील …

हो पण एकच अट आहे की विचार करताना तो अत्यंत आनंदी आणि सकारात्मक मनाने विचार करावा आणि विचार करून झाल्यानंतर डोळे बंद करून ती समस्या आपण सोडवली आहे असे काल्पनिक चित्र आपल्या डोळ्यासमोर आणावे आणि नंतर ती गोष्ट सृष्टीवर सोडून द्यावी उर्वरित दिवसात आनंदी उत्साही मनाने आणि सकारात्मक ऊर्जेने त्यादृष्टीने प्रयत्न करावे… तुमची ही सकारात्मक उर्जा आनंदी आणि यशस्वी जीवन तुमच्याकडे नक्कीच खेचून आणेल….

लेख आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका कारण तुमचा प्रेमळ प्रतिसाद हीच माझी ऊर्जा…


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

क्लिक करून सामील व्हा!

??

3 thoughts on “‘टेन्शनलेस हेल्थी लाईफ’ साठी एक रहस्यमय टीप…!!!”

  1. Abhijeet Dattatray Borude

    अप्रतिम… खरंच खूप खूप खूप खूप भारी आहे ही वेबसाईट सोबतच यावरील सर्व लेखक आणि लेख…मी महिन्यांपासून यावरील सर्व लेख वाचत आहे .. खरंच जीवनात यशस्वी होण्यासाठी तसेच आपल्या जीवनातील प्रवास सुखकारक होण्यासाठी वाचन हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.. जशी खूप भारी म्हण आहे”वाचाल तर वाचाल ‘ तसंच मला एक म्हण बोलायला आवडेल ” वाचन हे एक मोठे यशस्वी आणि सुखी जीवनाचे शस्त्र आहे ” खरंच सर्व लेख उत्तमच आहे सोबतच मी याची लिंक व्हॉटस ॲप वर शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतो… मनःपूर्वक धन्यवाद.. आपलं मानसशास्त्र आणि सर्व लेखकांना…??

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!