“मार रट्टा कर घोकंपट्टी “
( इंग्रजी विषय शिक्षक) पुणे.
21 व्या शतकाला कुणी विज्ञानयुग तर कुणी संगणकाच युग म्हणून गौरवलं , पण मी म्हणतोय हे स्पर्धेचं य़ुग आहे ,अगदी जीवघेणी स्पर्धा !
उषा:काल होता होता कधी स्पर्धेची काऴरात्र झाली ! तशातच पुन्हा म्हणायच आयुष्याच्या पेटवा रे मशाली.
कशा पेटतील मशाली?
जळत्या निखार्यावर उभा आहे इथे प्रत्येकजण !
हा स्पर्धेचा निखारा एखाद्याचं आयुष्य तावून सलाखून काढतो तर काहींच्या बाबतीत कवी सुरेश भट यांना ,
“इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते”
हे सांगण्याची वेळ येते.
काऴाबरोबर बदलायच का इतरांबरोबर नुसतच मेंढरासारख धावायचं ? मनात राहीलेल्या सुप्त इच्छा लेकरांनवर लादायच्या , आणि त्या पुर्ण करण्यासाठी त्यांना गर्दीत फरफटत ओढत नेयायचं !
आणि समाजात आपणच आपली पाठ थोपटून घेयायची की , पोरगं Engg , Medical , M. B. A. करतय . मुलांची इच्छा मात्र गुलदस्त्यातच !
आता शिक्षणक्षेत्रात तर इंग्लीश मेडीयम किंवा सेमी इंग्लीश कधी प्रतिष्ठेच्या यादीत जावून बसलेत कळालच नाही ?
माझ्या दर्शनच्या प्रवेशानिमित्त एका शाळेत जाण्याचा योग आला , सेमीत ज्यांच्या मुलांना प्रवेश मिळाला अशा पालकांचा चेहर्यावर जग जिंकल्याचा आनंद ओसांडून वाहत होता अन ज्यांच्या मुलांना प्रवेश मिळाला नाही ते पालक मात्र हाताशपणे पाहात होत एकमेकांकडे ! आणि त्यात मीही होतो.
आम्ही शिकलेले पालक खरचं मुलांच्या बाबतीत एवढे कर्तव्यदक्ष आहोत ? का एका गर्दीचा हिस्सा बनू पाहतोय? का हे अर्थिक सुबत्तेच लक्षण मानायच ? का आर्थिक पाठबळ नसतांनाही
,’हम भी कुछ कम नही ‘
हे दाखवण्याचा आटापिटा करायचा?
मी पोस्ट ग्रँज्युएट झालो पण शेवट पर्यंत माझ्या अडाणी आईवडीलांना हे कऴाल नाही की मी काय शिकतोय .
आज इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी विषयांचा इतका सुळसुळाट झालाय की बस्स !
आणि धनाढ्या लोकांनी पालकांच्या खिशातील अर्थ चा अर्थपुर्ण अभ्यास करून ‘ मागणी तसा पुरवठा ‘ या युक्तीप्रमाणे गल्ली पासून दिल्ली पर्यंत नुसतेच इंग्रजी पंडीत तयार करण्याचे झगमगीत कारखाणे सुरू करण्याचा एकच सपाटा लावलाय ! पण हे इंग्रजी पांडित्य नसून नुसतीच वरून आलेली इंग्रजी ज्ञानाची सुज आहे हे कऴेल त्यावेळेस वेळ ऩिघून गेलेली असेल .
बालमानसशास्रज्ञ प्रा. रमेश पानसे सर व आनंदमय शाऴांचे प्रवर्तक पी.बी शितोऴे काका या दोन्ही विचावंतांचे बालकांविषयीचे विचार प्रत्येक बालकांच्या पालकांना विचार करायला लावणारे आहेत .
बालकांच मातृभाषेच ज्ञान जर परिपुर्ण असेल तर मुलं जगातील कोणतीही भाषा विनाअडथळा आत्मसात करु शकतात .
पण आम्ही सुज्ञ जागरुक पालक मुलांची अवस्था
‘ ना घर का ना घाट का ‘
अशी बालवयापासून इतर भाषेचा डोस पाजून करुन ठेवतो.
सेमीच्या बाबतीतही तसच होत . गणित आणि विज्ञानाच्या संकल्पणा शालेय जीवनात मातृभाषेतून ज्या स्पष्ट होतील त्या इतर भाषांच्या अर्धवट ज्ञाऩामुळे खरच स्पष्ट होतील का?
का मार रट्टा कर घोकंपट्टी , हे नवीन बीज रुजू पाहतय !
आज मी नौकायानवार विचार मांडतोय आणि माझीच नौका पाण्यात बुडत चाललीय, य़ाच्याएवढी शोकांतिका कुठली असू शकते ??
कारण माझीच मुलं सेमी च्या वाटेची वाटसरू आहेत.
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.

ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
क्लिक करून सामील व्हा!
??


Kalachi garj bnun basla ha lekh.atishay sulabh ani sundar shabdat madni aahe,chan vatala
अतिशय मार्मिक लेखन.