Skip to content

ती एक चुक आणि….

ती एक चुक आणि…


शशी वेळेकर
(समुपदेशक)


आजही तो दिवस आठवतो. त्या दिवशी सर्वकाही व्यवस्थित होते मोठा मुलगा सकाळीच कॉलेज ला गेला होता, माझा सकाळचा चहा नाश्ता झाला, मी कामावर जाण्याच्या तयारीत होतो. अचानक थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली, हाताला मुंग्या यायला लागल्या, शरीर पूर्ण घामाघूम झाले आणि अवघ्या काहीच क्षणात मी जमिनीवर कोसळलो.

पुन्हा शुद्ध आली तेव्हा कळाले की मी ICU मध्ये होतो, तेथून बाहेर आल्यानंतर मला सांगितले की heart attack आला होता. मी डॉक्टर ला विचारले की मी तर जास्त तेलकट पदार्थ खात नाही, फास्ट फूड पण खात नाही, मला तर दारूच पण व्यसन नाही तर नेमका कशामुळे झालं मला सांगा.

“हो येणारच” कारण तुमचे तंबाखू आणि गुटखा खाण्याचे प्रमाणचा इतके जास्त आहे. आजपर्यंत तर मला इतकेच माहिती होते की तंबाखू आणि गुटखा खाल्ल्यामुळे तोंडाचा कॅन्सर होतो, पण आज कळले की heart attack येण्याचे कारण तंबाखू सुद्धा असू शकते.

आयुष्याच्या जमापुंजुचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सर्वात मोठे नुकसान तर माझ्या शरीराचे झाले होते आणि आता ही झीज भरून काढण्याचा कोणताच मार्ग नव्हता, मात्र शरीराचे आणखीन नुकसान होऊ नये यासाठी फक्त एक पर्याय होता तो म्हणजे हे सर्व व्यसन सोडून देणे. मोठ्या मुलाच्या शिक्षणासाठी ठेवलेले सर्व पैसे संपले आणि मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढावे लागेल, पुन्हा कधी कामावर जायला मिळेल याची पण खात्री नव्हती. या सर्व समस्या फक्त माझ्या तंबाखू आणि गुटखा खाण्याच्या सवयीमुळे निर्माण झाल्या. ती एक चूक आणि सर्व काही संपलं असच वाटते.

आज या घटनेला ६ वर्ष झालेली असावी तरी सुद्धा काही बदललेले नाही, त्यावेळी ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्यापैकी जवळ जवळ अर्ध्या समस्या तशाच आहेत. आता या वयात कोणते अधिक काम करायला सुद्धा जमणार नाही, आहे तेच काम माझ्यानी होत नाही.

आजही मी स्वतःसहित त्या सर्वांना दोष देतो की ज्यांनी मला तंबाखू गुटखा खाण्याची सवय लावली ते मित्र, जो दुकानदार तंबाखू गुटखा विकतो, जी कंपनी तंबाखू गुटखा बनवते, आणि जे लोकं तंबाखूची शेती करतात हे सर्व लोक आणि मी स्वतः या सर्वाला जबाबदार आहे आणि आमच्या सर्वांच्या ह्या चुकांमुळे माझ्या संपूर्ण परिवाराला त्रास सहन करावा लागत आहे.

मित्रानो तुमच्या सोबत असं काही घडू नये तुमच्या परिवारा सोबत असं काही घडू नये म्हणून माझी विनंती आहे की जितक्या लवकरात लवकर हे व्यसन सोडता येईल तितक्या लवकर सोडवून घ्या.

तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाविषयी काही महत्त्वाच्या बाबी पुढील प्रमाणे.

तंबाखूविषयी समाजात असलेले काही गैरसमज

१) तंबाखू खाल्ल्यानंतर अन्न पचन होते.
२) तंबाखू खाल्ल्याने दातांचे दुखणे बरे होते.
३) तंबाखू खाल्ल्यानंतर एकाग्रता वाढते.
४) तंबाखू खाल्ल्यामुळे रात्रभर जागण्यास मदत होते.
५) तंबाखू खाल्ल्यामुळे काम करण्यास ऊर्जा मिळते.
६) तंबाखू खाल्ल्यामुळे पोट साफ होते.
या सारखे अनेक गैरसमज समाजात आहे व आपण सुद्धा यासारख्या गैरसमजुतीला बळी पडतो.

तंबाखूमुळे होणारे आजार

१) तोंडाचा / घशाचा कॅन्सर
२) Heart Attack
३) High Blood Pressure
४) लकवा मारणे.
५) रोग प्रतिकाशक्ती कमी होणे.
६) दात खराब होणे/ हिरड्या कमजोर होणे.
७) नजर कमी होणे.
८) स्मरणशक्ती कमी होणे.
९) नपुंसकता येणे (पुरुषांमध्ये) / वंध्यत्व येणे ( स्त्रियांमध्ये)

तोंडाचा कॅन्सर होण्यापूर्वीची काही लक्षणे

१) तोंडामध्ये ४ पेक्षा कमी बोटं जाणे.
२) तोंडामध्ये लाल डाग होणे.
३) तोंडामध्ये पांढरा डाग होणे.

तंबाखूविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी पुढीप्रमाणे

१) तंबाखूत ७००० प्रकारचे रसायने असतात त्यापैकी ६९ रसायनामुळे आपल्याला तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.
२) तंबाखूत निकोटिन नावाचा पदार्थ असतो ज्यामुळे आपल्याला वारंवार तंबाखू खाण्याची तलफ लागते.
३) भारतात दर ६ तासाला एका व्यक्तीचा मृत्यू तोंडाचा कॅन्सरमुळे होतो आणि त्याचे मुख्य कारण तंबाखू असते.
४) तोंडाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी कमीत कमी ३-४ लाखाचा खर्च येऊ शकतो.


तंबाखू, गुटखा, मावा, खर्रा, बिडी, सिगरेट किंवा कोणतेही तंबाखू जन्य पदार्थ सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

??

क्लिक करा


नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल

SUBSCRIBE करा!

??

क्लिक करून सामील व्हा!

??

1 thought on “ती एक चुक आणि….”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!